Highest Fees | ‘अक्षय कुमार’ ठरला बॉलिवूडमधील सर्वात महागडा अभिनेता!

बॉलिवूडचा खिलाडी कुमार अर्थात अक्षय कुमार हिंदी चित्रपटसृष्टीचा सर्वात महाग सुपरस्टार बनला आहे.

Highest Fees | 'अक्षय कुमार' ठरला बॉलिवूडमधील सर्वात महागडा अभिनेता!
Follow us
| Updated on: Dec 28, 2020 | 1:38 PM

मुंबई : बॉलिवूडचा खिलाडी कुमार अर्थात अक्षय कुमार (Akshay Kumar) हिंदी चित्रपटसृष्टीचा सर्वात महाग सुपरस्टार बनला आहे. आता तो त्याच्या एका चित्रपटासाठी 135 कोटी शुल्क घेणार आहे. बॉलिवूड हंगामाच्या वृत्तानुसार, अक्षयने 2022 मध्ये प्रदर्शित होणाऱ्या चित्रपटांसाठी फी वाढविली आहे. 2020 च्या सुरूवातीस त्याने 102 कोटी शुल्क घेण्याची घोषणा केली होती. नंतर त्याने ते वाढवून 123 कोटी केले. कोरोनापूर्वी त्यांचा सूर्यवंशी हा चित्रपट रिलीज होण्यास तयार होता पण लॉकडाऊनमुळे तो चित्रपट प्रदर्शित होऊ शकला नाही. (Akshay Kumar became the most expensive actor in Bollywood)

अक्षयचा लक्ष्मी हा चित्रपट आधीच तयार होता तो ओटीटी प्लॅटफॉर्म हॉटस्टारवर प्रदर्शित झाला. अक्षय कुमार बॉलीवूडचा असाच एक स्टार आहे. ज्याचे एका वर्षामध्ये किमान चार चित्रपट प्रदर्शित होतात. आणि सर्व चित्रपट देखील हिट होतात. यामुळे अशा स्थितीत अक्षय कुमारकडे बरेच चित्रपट येत आहेत. अक्षय कुमारच्या आगामी चित्रपटांमध्ये सूर्यवंशी, अतरंगी रे, प्रथमराज, मिशन लायन, राम सेतु आणि रक्षा बंधन या चित्रपटांचा समावेश आहे.

‘राम सेतू’चे चित्रीकरण

अक्षय कुमारला त्याच्या आगामी चित्रपटाचे चित्रीकरण उत्तर प्रदेशात करायचे होते. याकरता परवानगी मागण्यासाठी आणि सहकार्य करण्याची विनंती करण्यासाठी अक्षय कुमारने योगी आदित्यनाथ यांची भेट घेतली होती. दोघांमध्ये ‘राम सेतू’ चित्रपटाविषयी चर्चा झाली. तर, योगी आदित्यनाथ यांनी अक्षयला अयोध्येत चित्रीकरणाचे आमंत्रण दिले होते.

या भेटी दरम्यान त्यांनी अक्षय कुमारची खूप प्रशंसा केल्याचे देखील म्हटले जात आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले की, अक्षय कुमारने आपल्या ‘टॉयलेट एक प्रेम कथा’ या चित्रपटातून समाज प्रबोधन केले. तसेच, अक्षयचे चित्रपट नेहमीच समाजाला प्रेरणा देणारे ठरत असल्याचे म्हणत योगी आदित्यनाथ यांनी अक्षय कुमारचे कौतुक केले होते.

संबंधित बातम्या : 

Fee Hike | ‘ब्रह्मास्त्र’साठी रणबीरने मागितले जास्त पैसे?, वाचा काय आहे सविस्तर प्रकरण…

Kangana Ranaut | कंगनाची मुंबईवारी, पुन्हा रंगणार ‘सामना’?

(Akshay Kumar became the most expensive actor in Bollywood)

मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?.
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन.
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?.