अक्षय कुमारने कपिल शर्माला म्हटलं ‘सीरियल किलर’; कॉमेडियनवर लावला मोठा आरोप

अक्षय कुमार त्याच्या 'कटपुतली' चित्रपटाच्या प्रमोशनसाठी कपिल शर्माच्या शोमध्ये आला होता. या एपिसोडचा सेन्सॉर न केलेला व्हिडिओ आता युट्यूबवर आला आहे.

अक्षय कुमारने कपिल शर्माला म्हटलं 'सीरियल किलर'; कॉमेडियनवर लावला मोठा आरोप
'द कपिल शर्मा शो'चा व्हिडीओ व्हायरलImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Sep 17, 2022 | 6:08 PM

कॉमेडियन कपिल शर्माचा (Kapil Sharma) ‘द कपिल शर्मा शो’ पुन्हा एकदा प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाला आहे. यावेळी कपिल शर्मासोबत या शोमध्ये अनेक नवे चेहरे दिसत आहेत. त्यामुळे चाहत्यांमध्ये या कॉमेडी शोची बरीच चर्चा आहे. यंदाच्या सिझनमध्ये अक्षय कुमार (Akshay Kumar) हा कपिल शर्माच्या शोचा पहिला पाहुणा बनला आहे. या पहिल्या एपिसोडचा टीझर नुकताच सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आला आहे. यामध्ये अक्षयने कपिल आणि त्याच्या संपूर्ण टीमसोबत खूप धमाल केल्याचं पहायला मिळतंय. मात्र याचदरम्यान अक्षयने कपिलला सीरियल किलरही (Serial Killer) म्हटलं आहे.

अक्षय कुमार त्याच्या ‘कटपुतली’ चित्रपटाच्या प्रमोशनसाठी कपिल शर्माच्या शोमध्ये आला होता. या एपिसोडचा सेन्सॉर न केलेला व्हिडिओ आता युट्यूबवर आला आहे. ज्यामध्ये अक्षय कुमार आणि कपिल शर्मा एकमेकांची मस्करी करताना दिसत आहेत. या व्हिडीओची सुरुवात कपिल त्याच्या घरातून सेटच्या दिशेने जाताना होते. यानंतर तो त्याचा शो सुरू करताना दिसतो. पण त्यानंतर अक्षय कुमार पुढे येतो आणि तो कपिल शर्माचा शो सुरू करतो. यानंतरच दोघांमध्ये मजामस्ती सुरू होते.

हे सुद्धा वाचा

या व्हिडिओमध्ये कपिल शर्मा अक्षयसोबत त्याच्या ‘कटपुतली’ चित्रपटाबद्दल बोलताना दिसत आहे. तो विचारतो, “अक्षय पाजी कठपुतलीमध्ये एका सायको सीरियल किलरचा शोध सुरू असतो. पण प्रत्यक्षात सीरियल किलर कोण आहे असं तुम्हाला वाटतं?” कपिलचा हा प्रश्न ऐकून अक्षय आधी विचारात पडतो आणि मग म्हणतो, “बघा कोण आहे सीरियल किलर?” यानंतर तो कपिल शर्माकडे बोट दाखवत म्हणतो, “हाच सर्वात मोठा सीरियल किलर आहे. त्यानेच अनेक शो बंद पाडले आहेत.”

अक्षयच्या या विधानाला उत्तर देताना कपिल शर्मा म्हणतो, “आमचंही एक कुटुंब आहे. आम्हालाही ब्रेकची गरज असते.” हे ऐकून अक्षयसह उपस्थितांमध्ये एकच हशा पिकतो. कपिलने मध्यंतरीच्या काळात शोमधून ब्रेक घेतला होता. यादरम्यान तो त्याच्या कुटुंबीयांना वेळ देत होता. त्याच संदर्भ घेत अक्षयने कपिलला मस्करीत टोमणा मारला होता.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.