Akshay Kumar : अभिनेता अक्षय कुमार या मतदारसंघातून निवडणूक लढवणार?
Akshay kumar : बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार राजकारणात येणार असल्याची चर्चा सुरु आहे. अभिनेता अक्षय कुमारच्या राजकारणात येण्याच्या चर्चांवर अनेकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. पण अक्षय कुमार जर राजकारणात आला तर कुठल्या मतदारसंघातून लढू शकतो याची देखील चर्चा सुरु आहे.
Loksabha Eletion 2024 : बॉलिवूडचा मिस्टर खिलाडी अक्षय कुमार राजकारणात उतरणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. अक्षय कुमार हा भाजपच्या तिकीटावर आगामी लोकसभा निवडणूक लढवू शकतो, अशा बातम्या येत आहेत. लोकसभा निवडणुकीची उत्सुकता अधिकच वाढली आहे. निवडणुकीसाठी प्रत्येक पक्षाने जोरदार तयारी सुरु केली आहे. देशाची राजधानी दिल्लीत आम आदमी पार्टी आणि काँग्रेसने युती करून लोकसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. तेथे भाजपकडून मोठे उमेदवार रिंगणात उतरवले जाऊ शकतात.
दिल्लीत काँग्रेस-आपची युती
दिल्लीत आप ४ जागांवर तर काँग्रेस ३ जागांवर निवडणूक लढवणार आहे. भाजप दिल्लीत नव्या चेहऱ्यांच्या जोरावर निवडणूक जिंकण्याचा प्रयत्न करु शकते. त्यामुळे भाजप बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारला दिल्लीतून उमेदवारी देऊ शकते. अशी चर्चा आहे.
एका वृत्तपत्राच्या बातमीनुसार, बॉलीवूड अभिनेता अक्षय कुमार याला दिल्लीच्या चांदनी चौक मतदारसंघातून निवडणुकीचं तिकीट दिलं जाऊ शकतं. भाजप हा अक्षय कुमारच्या संपर्कात असून त्याबाबत चर्चा सुरु असल्याचं बोललं जात आहे. मात्र याची कुठेही अधिकृत घोषणा झालेली नाही.
अक्षय कुमारच्या नावाची चर्चा
भाजप नेते डॉ. हर्षवर्धन यांनी 2014 आणि 2019 मध्ये दोन वेळा या जागेवर विजय मिळवला आहे. त्यामुळे आता या मतदारसंघातून अक्षय कुमारच्या नावाची चर्चा आहे. अक्षय कुमारने अनेक सिनेमांमध्ये काम केले आहे. त्याची एक वेगळी ओळख आहे. त्याचा फायदा भाजपला होऊ शकतो. पण तो राजकारणात येणार का याबाबत अनेकांच्या मनात शंका आहेत.
सध्या अक्षय कुमार बडे मियाँ छोटे मियाँमध्ये सिनेमात व्यस्त आहे. तो या सिनेमात टायगर श्रॉफसोबत दिसणार आहे. हा चित्रपट 9 एप्रिल रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.
लोकसभा निवडणुकीच्या तयारीला सगळेच पक्ष आता लागले आहे. बरेच ठिकाणी उमेदवार निश्चित झाले आहेत. भाजपने यंदा अब की बार ४०० पार असा नारा दिला आहे. एनडीएला ४०० हून अधिक जागा मिळतील असा विश्वास भाजपने व्यक्त केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भाजपने पुन्हा एकदा कंबर कसली आहे.