आईच्या निधनानंतर सुरु झालं अक्षय कुमार याचं ‘बॅडलक’! भावुक होत अभिनेता म्हणाला…

...म्हणून म्हणतात का 'स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी...', आईच्या निधनानंतर सुरु झालं खिलाडी कुमार याचं 'बॅडलक', आईचं नाव घेताच अभिनेत्याच्या डोळ्यात पाणी

आईच्या निधनानंतर सुरु झालं अक्षय कुमार याचं 'बॅडलक'! भावुक होत अभिनेता म्हणाला...
Follow us
| Updated on: Feb 26, 2023 | 2:12 PM

Akshay Kumar : ‘स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी…’ आईचा (mother) चेहरा पाहिला तरी दिवसभराचा थकवा क्षणात दूर होतो. देव सगळीकडे आपल्यासोबत राहू शकत नाही, म्हणून देवाच्या रुपात प्रत्येकाच्या आयुष्यात आई-वडील असतात असं म्हणतात. आईला आपण आयुष्यातील प्रत्येक गोष्ट सांगतो. ज्यामुळे आयुष्यात जगायचं आणि लढायचं कसं? हे कळंत… सर्वसामान्यच नाही सेलिब्रिटी देखील आईसोबत असलेलं नातं सर्वांना सांगतात. अभिनेता अक्षय कुमार देखील कायम त्याच्या आईबद्दल चाहत्यांना सांगायचा. अक्षय कुमार याच्यासाठी 2022 हे वर्ष काही खास गेले नाही. पण नव्या वर्षातील पहिला सिनेमा देखील अपयशी ठरल्यानंतर सर्वत्र चर्चा रंगल्या आहेत. गेल्या वर्षी देखील अभिनेत्या एकामागे एक अनेक सिनेमे फ्लॉप ठरले. अशात आईच्या निधनानंतर अक्षय कुमार याचं ‘बॅडलक’ सुरु झालं आहे का? अशी चर्चा रंगत आहे. (Akshay Kumar mother)

एका कार्यक्रमात अक्षय याला विचारलं, ‘अक्षय तुझ्याकडे गाडी आहे, बंगला आहे, संपत्ती आहे… हा एक फार जुना डायलॉग आहे. पण पहायला गेलं तर तुझ्याकडे आई नाही? तू आईच्या फार जवळ होतास. जेव्हा आईचं निधन झालं, तेव्हापासून तुझा एकही सिनेमा यशस्वी ठरला नाही..’ प्रश्न ऐकताच अक्षय याला आईची आठवण आली आणि अभिनेत्याच्या डोळ्यात पाणी आलं. (Akshay Kumar relation with mother)

आईच्या निधनानंतर अक्षय कुमार याचं ‘बॅडलक’ सुरु झालं आहे का? यावर अभिनेता म्हणाला, ‘तुम्ही जे बोलत आहात अगदी बरोबर आहे. मी माझ्या आईच्या फार जवळ होतो. आयुष्यात आई – वडिलांचं असणं फार महत्त्वाचं असतं. तुम्ही बरोबर बोलला आहात, जेव्हा मी आईला गमावलं, तेव्हापासून माझ्या आयुष्यात अनेक बदल झाले आहेत.’

हे सुद्धा वाचा

पुढे अभिनेता म्हणाला, ‘ आजही आई कायम माझ्यासोबत आहे. आई आता या जगात नाही, यावर विश्वास बसत नाही. अनेकदा वाटतं याक्षणी आई घरी माझी प्रतीक्षा करत असेल. पण जेव्हा वास्तव लक्षात येतं तेव्हा आणखी दुःख होतं…’ असं देखील अभिनेता म्हणाला. (akshay kumar mother aruna bhatia)

नुकताच अक्षय कुमार याचा ‘सेल्फी’ (selfiee) सिनेमा प्रदर्शित झाला. खिलाडी कुमार अर्थात अक्षय कुमार याचा सेल्फी हा चित्रपट 2023 मधील पहिला रिलीज झालेला चित्रपट (Movie) आहे. अक्षय कुमार याच्यासाठी 2022 हे वर्ष काही खास गेले नाही. पण नव्या वर्षातील पहिला सिनेमा देखील अपयशी ठरल्यानंतर सर्वत्र चर्चा रंगल्या आहेत.

सांगायचं झालं तर, ‘सेल्फी’ सिनेमा मल्याळम सिनेमा ‘ड्रायव्हिंग लायसन्स’चा हिंदी रिमेक आहे. पृथ्वीराज आणि सूरज वेंजारामूडू यांनी ‘ड्रायव्हिंग लायसन्स’ सिनेमात मुख्य भूमिका साकारली होती. तर सिनेमाचा रिमेक ‘सेल्फी’ मध्ये अक्षय कुमार आणि इमरान हाश्मी मुख्य भूमिकेत चाहत्यांच्या भेटीस आले. आता येणाऱ्या दिवसांत सिनेमा किती रुपयांचा गल्ला जमा करतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. (akshay kumar movies latest)

'एक खून करून पोट भरलं नाही?', जरांगे पाटलांचा थेट मुंडेंवर आरोप
'एक खून करून पोट भरलं नाही?', जरांगे पाटलांचा थेट मुंडेंवर आरोप.
'कोल्हेंच्या वक्तव्याची कीव, त्यांनीही...'; मित्रपक्षांकडून टीकास्त्र
'कोल्हेंच्या वक्तव्याची कीव, त्यांनीही...'; मित्रपक्षांकडून टीकास्त्र.
शरद पवार गटात अलबेल नाही? सत्तेत सहभागी होण्यासाठी 2 मतप्रवाह?
शरद पवार गटात अलबेल नाही? सत्तेत सहभागी होण्यासाठी 2 मतप्रवाह?.
वाल्मिक कराड लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष, बावनकुळेंचं समर्थन? म्हणाले..
वाल्मिक कराड लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष, बावनकुळेंचं समर्थन? म्हणाले...
'मुन्नीचं लय प्रेम पण ती बोलना, बोलली तर मुन्नीचे कपडे टराटरा...'
'मुन्नीचं लय प्रेम पण ती बोलना, बोलली तर मुन्नीचे कपडे टराटरा...'.
'EVM म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला',भाजपचा बडा नेता काय म्हणाला?
'EVM म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला',भाजपचा बडा नेता काय म्हणाला?.
'ठाकरे गट झोपेत, काँग्रेसची मोडलेली पाठ..',कोल्हेंच्या वक्तव्यानं खळबळ
'ठाकरे गट झोपेत, काँग्रेसची मोडलेली पाठ..',कोल्हेंच्या वक्तव्यानं खळबळ.
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण.
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर.
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप.