सलग चार फ्लॉप चित्रपटांनंतर अक्षय कुमारने बदलला प्लॅन; घेतला मोठा निर्णय

अक्षय कुमारचा नवीन गेम प्लॅन; व्हिडीओ पाहून चाहत्यांची वाढली उत्सुकता

सलग चार फ्लॉप चित्रपटांनंतर अक्षय कुमारने बदलला प्लॅन; घेतला मोठा निर्णय
Follow us
| Updated on: Nov 09, 2022 | 6:26 PM

मुंबई- या वर्षभरात आतापर्यंत अभिनेता अक्षय कुमारचे चार चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित झाले. मात्र या चारही चित्रपटांना प्रेक्षकांचा अपेक्षित असा प्रतिसाद मिळाला नाही. अक्षयचा पाचवा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. मात्र त्याचीही फारशी चर्चा झाली नाही. एकानंतर एक चित्रपट बॉक्स ऑफिसवर आपटल्याने आता अक्षयने आपला गेम प्लॅन बदलला आहे. काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न तो करतोय आणि त्याचीच घोषणा नुकतीच त्याने सोशल मीडियाद्वारे केली. अक्षयच्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

बच्चन पांडे, रक्षाबंधन, सम्राट पृथ्वीराज आणि राम सेतू हे चार चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित झाले. तर ‘कटपुतली’ हा अक्षयचा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित झाला. या चारही चित्रपटांच्या अपयशामुळे निर्मात्यांना मोठं नुकसान सोसावं लागलं.

हे सुद्धा वाचा

अक्षयने बुधवारी सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट केला. यामध्ये त्याने मोठी घोषणा केली आहे. “काहीतरी नवीन करण्याची जी मजा आहे, त्याची गोष्टच निराळी आहे. गेल्या काही काळापासून मी त्या गोष्टीवर काम करतोय. लवकरच त्याविषयीची माहिती मिळेल”, असं अक्षय या व्हिडीओत म्हणाला.

View this post on Instagram

A post shared by Akshay Kumar (@akshaykumar)

अक्षयच्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी मजेशीर कमेंट्स केले आहेत. ‘आता हेरा फेरी करून टाक’, असं एका युजरने लिहिलं. तर ‘अक्षयचे पुढील प्रोजेक्ट्स हे हेरा फेरी 3, आवारा पागल दिवाना 2 आणि वेलकम 3 हे असतील’, असं दुसऱ्याने म्हटलं. ‘एकवेळ काहीच काम करू नकोस, पण रिमेक बनवणं बंद कर’, असा टोलाही एका नेटकऱ्याने लगावला. कमेंट बॉक्समध्ये अनेकांनी ‘हेरा फेरी’च्या घोषणेचा अंदाज वर्तवला. मात्र हा नवीन प्रोजेक्ट काय असेल, ते अद्याप कोणालाच ठाऊक नाही.

काही दिवसांपूर्वीच अक्षय मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करणार असल्याची मोठी घोषणा झाली. महेश मांजरेकर दिग्दर्शित ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ या चित्रपटात अक्षय कुमार हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत दिसणार आहे. त्याचा फर्स्ट लूकसुद्धा प्रदर्शित करण्यात आला होता.

Non Stop LIVE Update
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या...
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या....
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?.
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला.
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका.
'राणे पिता-पुत्र हे गाडग्यासारखे..', ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची टीका
'राणे पिता-पुत्र हे गाडग्यासारखे..', ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची टीका.
भाजपच्या किती जागा येणार?,कोण होणार CM?; विनोद तावडेंनी थेट सांगितलं..
भाजपच्या किती जागा येणार?,कोण होणार CM?; विनोद तावडेंनी थेट सांगितलं...
डोंबिवलीत भाजपचं कार्यालय फोडल, कोणी केल्ला हल्ला? घटना CCTV मध्ये कैद
डोंबिवलीत भाजपचं कार्यालय फोडल, कोणी केल्ला हल्ला? घटना CCTV मध्ये कैद.
एकनाथ शिंदेंच्या आमदारानं पैसे वाटले? विधानसभेच्या तोंडावर अडचणी वाढल्
एकनाथ शिंदेंच्या आमदारानं पैसे वाटले? विधानसभेच्या तोंडावर अडचणी वाढल्.
पंकजा मुंडेंकडून भाऊ धनंजय मुंडेंना खास गिफ्ट, सभेतून काय केली घोषणा?
पंकजा मुंडेंकडून भाऊ धनंजय मुंडेंना खास गिफ्ट, सभेतून काय केली घोषणा?.
पवार कुटुंबातील कटुता भविष्यात दूर होणार? अजित पवारांचं मोठं वक्तव्य
पवार कुटुंबातील कटुता भविष्यात दूर होणार? अजित पवारांचं मोठं वक्तव्य.