Akshay Kumar | अक्षय कुमार-योगी आदित्यनाथ भेट, उत्तर प्रदेशातील फिल्मसिटी नव्हे ‘या’ खास विषयावर चर्चा!

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अक्षय कुमार सोबत उत्तर प्रदेशमधील गौतमबुद्ध नगर येथील यमुना एक्सप्रेस वे जवळ तयार होणाऱ्या फिल्मसिटीबाबत चर्चा केली, असे म्हटले जात होते.

Akshay Kumar | अक्षय कुमार-योगी आदित्यनाथ भेट, उत्तर प्रदेशातील फिल्मसिटी नव्हे ‘या’ खास विषयावर चर्चा!
Follow us
| Updated on: Dec 02, 2020 | 2:52 PM

मुंबई : बॉलिवूडचा खिलाडी कुमार अर्थात अभिनेता अक्षय कुमार (Akshay Kumar) याने काल (1 डिसेंबर) उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांची भेट घेतली. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ दोन दिवसाच्या महाराष्ट्र दौऱ्यावर आले आहेत. त्यांची भेट मुंबईतील ट्रायडेंट हॉटेलमध्ये झाली. योगी यांनी अक्षय कुमारची भेट घेतल्यानंतर ट्विटरवर या भेटीबाबत माहिती दिली. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अक्षय कुमार सोबत उत्तर प्रदेशमधील गौतमबुद्ध नगर येथील यमुना एक्सप्रेस वे जवळ तयार होणाऱ्या फिल्मसिटीबाबत चर्चा केली, असे म्हटले जात होते. मात्र, या भेटी दरम्यान अशी कुठलीच चर्चा झाली नसल्याचे कळते आहे (Akshay Kumar Meets Yogi Adityanath to discuss about upcoming film Ram setu’s shooting in UP).

अक्षय कुमार आणि योगी आदित्यनाथ यांच्या भेटीत फिल्मसिटी नव्हे तर, अक्षयचा आगामी चित्रपट ‘रामसेतू’ बद्दल चर्चा झाल्याचे कळते आहे. अक्षय कुमारचा आगामी चित्रपट ‘राम सेतू’चे चित्रीकरण उत्तर प्रदेशमध्ये करण्याबाबत या दोघांमध्ये चर्चा झाल्याचे ‘पिपिंगमून’ या वेबसाईटने म्हटले आहे.

‘राम सेतू’चे चित्रीकरण

अक्षय कुमारला त्याच्या आगामी चित्रपटाचे चित्रीकरण उत्तर प्रदेशात करायचे आहे. याकरता परवानगी मागण्यासाठी आणि सहकार्य करण्याची विनंती करण्यासाठी अक्षय कुमारने योगी आदित्यनाथ यांची भेट घेतल्याचे कळते आहे. दोघांमध्ये ‘राम सेतू’ चित्रपटाविषयी चर्चा झाली. तर, योगी आदित्यनाथ यांनी अक्षयला अयोध्येत चित्रीकरणाचे आमंत्रण दिले आहे.

या भेटी दरम्यान त्यांनी अक्षय कुमारची खूप प्रशंसा केल्याचे देखील म्हटले जात आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले की, अक्षय कुमारने आपल्या ‘टॉयलेट एक प्रेम कथा’ या चित्रपटातून समाज प्रबोधन केले. तसेच, अक्षयचे चित्रपट नेहमीच समाजाला प्रेरणा देणारे ठरत असल्याचे म्हणत योगी आदित्यनाथ यांनी अक्षय कुमारचे कौतुक केले आहे (Akshay Kumar Meets Yogi Adityanath to discuss about upcoming film Ram setu’s shooting in UP).

(Akshay Kumar Meets Yogi Adityanath to discuss about upcoming film Ram setu’s shooting in UP)

योगी आदित्यनाथ यांचा महाराष्ट्र दौरा

योगी आदित्यनाथ आज (2 डिसेंबर) बॉम्बे स्टॉक एक्सचेंजला जाणार आहेत. त्यानंतर ते दुपारी गुंतवणुकदार आणि चित्रपट निर्मात्यांशी चर्चा करणार आहेत. उद्योगपतींशी चर्चा केल्यानंतर योगी आदित्यनाथ पत्रकार परिषद घेतील.

दरम्यान, योगी आदित्यनाथ यांच्या उत्तर प्रदेशमध्ये फिल्मसिटी निर्माण करण्याच्या निर्णयाचे उत्तर प्रदेश आणि आजूबाजूच्या राज्यातील कलाकारांकडून समर्थन केले जात आहे. नव्या फिल्मसिटीच्या निर्माणामुळे हिंदी कलाकारांच्या रोजगाराचा प्रश्न सुटेल, अशी काही कलाकारांनी आशा आहे. योगी आदित्यनाथ यांच्या या पावलामुळे नवोदित कलाकारांना बॉलिवूडमध्ये जाण्यासाठी जास्त संघर्ष करावा लागणार नाही, अशी अनेकांना आशा आहे.

(Akshay Kumar Meets Yogi Adityanath to discuss about upcoming film Ram setu’s shooting in UP)

संबंधित बातम्या : 

उत्तर प्रदेशातील फिल्मसिटी देशाची नवी ओळख, मुंबईत योगी सरकारची जाहिरातबाजी

कितीही प्रयत्न केले तरी बॉलिवूड वेगळं केलं जाणार नाही; सुप्रिया सुळेंचा इशारा

बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?.
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन.
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?.
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'.
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?.