Akshay Kumar | अक्षयला भेटण्यासाठी चाहत्याने बॅरिकेडवरून मारली उडी, बॉडीगार्डने दिला धक्का अन्..

मुंबईतील एका कार्यक्रमात दोघांनी 'सेल्फी'चं प्रमोशन केलं. या कार्यक्रमादरम्यान एका चाहत्याने बॅरिकेडवरून उडी मारून अक्षयला भेटण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यानंतर जे झालं, त्याची क्वचितच कोणी कल्पना केली असेल.

Akshay Kumar | अक्षयला भेटण्यासाठी चाहत्याने बॅरिकेडवरून मारली उडी, बॉडीगार्डने दिला धक्का अन्..
Akshay KumarImage Credit source: Twitter
Follow us
| Updated on: Feb 20, 2023 | 2:20 PM

मुंबई : बॉलिवूडचा ‘खिलाडी’ अर्थात अभिनेता अक्षय कुमार सध्या त्याच्या ‘सेल्फी’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. अभिनेता इमरान हाश्मीसोबत तो या चित्रपटाचं जोरदार प्रमोशन करतोय. नुकतेच हे दोघं मुंबई मेट्रोच्या सफरीला निघाले होते. त्यानंतर मुंबईतील एका कार्यक्रमात दोघांनी ‘सेल्फी’चं प्रमोशन केलं. या कार्यक्रमादरम्यान एका चाहत्याने बॅरिकेडवरून उडी मारून अक्षयला भेटण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यानंतर जे झालं, त्याची क्वचितच कोणी कल्पना केली असेल.

अक्षयला भेटण्यासाठी चाहत्याने बॅरिकेडवरून मारली उडी

अक्षय कुमार आणि इमरान हाश्मी यांच्या ‘सेल्फी’ या चित्रपटात एक स्टार आणि त्याच्या चाहत्याची कहाणी दाखवण्यात आली आहे. मात्र या चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वीच नेटकऱ्यांनी रिअल लाइफमध्ये एक फिल्मी सीन पहायला मिळाला. मुंबईतील एका कार्यक्रमात अक्षय कुमार त्याच्या चित्रपटाचं प्रमोशन करत होता. याठिकाणी जमलेल्या चाहत्यांचं मनोरंजन करण्यासाठी दोघांनी डान्ससुद्धा केला. सर्वकाही ठीक चाललं होतं, मात्र अचानक अक्षयला भेटण्यासाठी गर्दी नियंत्रणाबाहेर गेली.

हे सुद्धा वाचा

पहा व्हिडीओ

अक्षयची एक झलक पाहण्यासाठी, त्याच्याशी हात मिळवण्यासाठी चाहते आतूर झाले. यादरम्यान एका चाहत्याने बॅरिकेडवरून उडी मारून अक्षयला भेटण्याचा प्रयत्न केला. मात्र अक्षयसमोर उभ्या असलेल्या बॉडीगार्ड्सनी त्याला धक्का देऊन मागे हटवलं. त्यानंतर तो चाहता जमिनीवर पडला. त्याला पाहताचक्षणी अक्षयने बॉडीगार्ड्सना थांबवलं आणि त्या चाहत्याला जाऊन मिठी मारली. हे सर्व पापाराझींनी त्यांच्या कॅमेऱ्यात कैद केलं. हाच व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

चाहत्यांप्रती असलेलं प्रेम पाहून खिलाडी कुमारवर नेटकरी खुश झाले. सोशल मीडियावर अक्षयच्या या वागणुकीची जोरदार चर्चा होत आहे. त्यावर विविध कमेंट्सचा वर्षाव होत आहे. ‘हा व्हिडीओ पाहिल्यानंतर दोन गोष्टी मनात आल्या आहेत. एक म्हणजे अक्षयचे चाहते त्याच्यावर किती प्रेम करतात आणि दुसरं म्हणजे अक्षय त्याच्या चाहत्यांवर किती प्रेम करतो आणि त्यांचा किती आदर करतो’, असं एकाने लिहिलं.

अक्षय कुमार आणि इमरान हाश्मी यांचा ‘सेल्फी’ हा चित्रपट येत्या 24 फेब्रुवारी रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटातील गाणी आधीच सोशल मीडियावर हिट ठरत आहेत. त्यामुळे ही नवी जोडी मोठ्या पडद्यावर काय कमाल करते, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.