OMG 2 Teaser| लांब लांब जटा, माथ्यावर भस्म, शंकराच्या भूमिकेत झळकला अक्षय कुमार
‘रख विश्वास तू है शिव का दास’, 'ओएमजी २' सिनेमाचा धमाकेदार टीझर प्रदर्शित... शंकराच्या भूमिकेत दिसणार अभिनेता अक्षय कुमार..
मुंबई | अभिनेता अक्षय कुमार लवकरच ‘ओह माय गॉड 2’ सिनेमाच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस येणार आहे. सध्या सर्वत्र अभिनेत्याच्या सिनेमातील लूकची चर्चा आहे. अभिनेत्याने ‘ओह माय गॉड 2’ सिनेमाची घोषणा केल्यानंतर प्रेक्षक देखील सिनेमाच्या प्रतीक्षेत आहेत. अभिनेत्याचे बॉक्स ऑफिसवर सलग सिनेमे फ्लॉप ठरत असल्यामुळे ‘ओह माय गॉड 2’ कडून खिलाडी कुमारच्या अपेक्षा अधिक आहेत. कारण ‘ओह माय गॉड ’ सिनेमाला प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलं होतं. ‘ओह माय गॉड’ सिनेमात अभिनेता कृष्णाच्या भूमिकेत दिसला, आता खिलाडी कुमार शंकराच्या भूमिकेत झळकणार आहे. ‘ओह माय गॉड 2’ सिनेमाचा टीझर नुकताच प्रदर्शित करण्यात आला आहे.
१ मिनिट २६ सेकेंदाच्या टीझरमध्ये अक्षय कुमार याच्या दमदार एन्ट्रीने चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं. सिनेमाच्या पोस्टरमध्ये लांब लांब जटा, माथ्यावर भस्म आणि गळ्यात रुद्राक्षाच्या माळा घातलेला अक्षय टीझरमध्ये वेगळ्याच अंदाजात दिसत आहे. सध्या सर्वत्र ‘ओह माय गॉड 2’ सिनेमाच्या टीझरची चर्चा रंगत आहे.
२०१२ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘ओह माय गॉड ’ सिनेमा नास्तिक कांजीलाल मेहता याच्या कथे भोवती फिरत होता. पण सिनेमाच्या सिक्वलमध्ये पंकज त्रिपाठी यांची शंकरावर असलेली निस्सिम भक्ती दिसून येत आहेत. पंकज त्रिपाठी सिनेमात कान्ती शरण मुदगल ही व्यक्तीरेखा साकारताना दिसत आहे.
View this post on Instagram
दिग्दर्शक अमित राय दिग्दर्शित ‘ओह माय गॉड 2’ सिनेमा १ ऑगस्टला थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. सिनेमात अक्षय कुमार, पंकज त्रिपाठी यांच्यासोबत यामी गौतम आणि अरुण गोविल यांच्या देखील मुख्य भूमिका आहेत.
अक्षय कुमार याने इन्स्टाग्रामवर सिनेमाचा टीझर पोस्ट केला आहे. सिनेमाचा टीझर पोस्ट करत अभिनेत्याने कॅप्शनमध्ये, ‘रख विश्वास… OMG2 सिनेमाचा टीझर प्रदर्शित झाला आहे…’ असं लिहिलं आहे. सोशल मीडियावर अक्षयच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. अभिनेत्याने साकारलेल्या भूमिका चाहत्यांना आवडलेली आहे. अक्षयच्या पोस्टवर चाहते लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत आहेत.
‘सम्राट पृथ्वीराज’, ‘बच्चन पांडे’, ‘राम सेतु’, ‘सेल्फी’ आणि ‘अतरंगी रे’ सिनेमात वेगवेगळ्या भूमिकेतून अक्षय कुमार चाहत्यांच्या भेटीस आला. पण खिलाडी कुमार चाहत्यांचं मनोरंजन करु शकला नाही. बॉक्स ऑफिसवर अभिनेत्याचे सिनेमे फ्लॉप ठरले. अता अक्षय ‘ओह माय गॉड 2’ सिनेमातून अभिनेता दमदार भूमिकेतून प्रेक्षकांच्या समोर आला आहे.