Ram Setu: अक्षयचा ‘राम सेतू’ ठरणार ब्लॉकबस्टर? पहा नेटकरी काय म्हणतायत..

Ram Setu Twitter Review: 'राम सेतू' ठरला सर्वोत्कृष्ट दिवाळी गिफ्ट; वाचा ट्विटर रिव्ह्यू

Ram Setu: अक्षयचा 'राम सेतू' ठरणार ब्लॉकबस्टर? पहा नेटकरी काय म्हणतायत..
Ram SetuImage Credit source: Twitter
Follow us
| Updated on: Oct 25, 2022 | 12:51 PM

मुंबई- बॉलिवूडचा खिलाडी अर्थात अभिनेता अक्षय कुमारने (Akshay Kumar) चाहत्यांना दिवाळीनिमित्त मोठी भेट दिली आहे. अक्षयचा बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित ‘राम सेतू’ (Ram Setu) हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट पाहिलेले प्रेक्षक सोशल मीडियावर त्याचं भरभरून कौतुक करत आहेत. चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी राम सेतूवरून बराच वाद निर्माण झाला होता. मात्र आता प्रदर्शनानंतर त्याला प्रेक्षकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळताना दिसतोय. राम सेतू हा दिवाळीचा (Diwali) परफेक्ट गिफ्ट असल्याची भावना चाहत्यांनी ट्विटरवर व्यक्त केली आहे.

चित्रपटातील अक्षयचा वेगळा लूक आणि त्याच्या दमदार अभिनयकौशल्याची चाहत्यांकडून स्तुती होतेय. त्याचप्रमाणे व्हीएफएक्स, पटकथा, क्लायमॅक्स या सर्व गोष्टींनी प्रेक्षक प्रभावित झाले आहेत. या चित्रपटाचं दिग्दर्शक अभिषेक शर्माने केलं आहे. दिवाळीच्या मुहूर्तावर हा चित्रपट प्रदर्शित करून सणाचा आनंद द्विगुणीत केल्याची भावना काही चाहत्यांनी व्यक्त केली आहे.

हे सुद्धा वाचा

राम सेतू या चित्रपटात अक्षय कुमारने पुरातत्व विशेषज्ञाची भूमिका साकारली आहे. अक्षयने या चित्रपटातून जबरदस्त कमबॅक केल्याचं दिसतंय. यामध्ये अक्षयसोबतच जॅकलिन फर्नांडिस आणि नुशरत भरूचा यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.

काही युजर्स या चित्रपटाला पाच पैकी चार स्टार देत आहेत. अक्षय आणि चित्रपटाच्या कथेचं जोरदार कौतुक ट्विटरवर होत आहे. एका नेटकऱ्याने राम सेतूला दिवाळीची सर्वोत्कृष्ट भेट असल्याचं म्हटलंय.

राम सेतू या चित्रपटासोबतच अजय देवगण आणि सिद्धार्थ मल्होत्राचा थँक गॉड हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. बॉक्स ऑफिसवर दोन मोठ्या कलाकारांच्या चित्रपटांची टक्कर होत असल्याने कोणाची कमाई अधिक होणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

Non Stop LIVE Update
निकालाआधीच बच्चू कडूंचा मोठा दावा, 'आमच्याशिवाय सत्ता स्थापन....'
निकालाआधीच बच्चू कडूंचा मोठा दावा, 'आमच्याशिवाय सत्ता स्थापन....'.
परळीत शरद पवार गटाच्या नेत्याला धुतलं, मुंडेंच्या समर्थकांकडून मारहाण?
परळीत शरद पवार गटाच्या नेत्याला धुतलं, मुंडेंच्या समर्थकांकडून मारहाण?.
निवडणुकीच्या एक्झिट पोलनंतर BJP अ‍ॅक्शन मोडवर, कोणाला साधणार संपर्क?
निवडणुकीच्या एक्झिट पोलनंतर BJP अ‍ॅक्शन मोडवर, कोणाला साधणार संपर्क?.
'तू जिंदगी भर याद..',ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखाला जीवे मारण्याची धमकी
'तू जिंदगी भर याद..',ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखाला जीवे मारण्याची धमकी.
राज्यात 65.02 टक्के मतदान, तुमच्या भागात किती जणांनी बजावला हक्क?
राज्यात 65.02 टक्के मतदान, तुमच्या भागात किती जणांनी बजावला हक्क?.
मुंबईत सर्वाधिक मतदान 'या' मतदारसंघात तर सर्वात कमी मतदान कुठे?
मुंबईत सर्वाधिक मतदान 'या' मतदारसंघात तर सर्वात कमी मतदान कुठे?.
सत्ता स्थापनेबाबत महायुतीच्या मंत्र्याचं मोठं वक्तव्य, 'गरज पडल्यास..'
सत्ता स्थापनेबाबत महायुतीच्या मंत्र्याचं मोठं वक्तव्य, 'गरज पडल्यास..'.
खरी शिवसेना कोणाची? शिंदे की ठाकरेंची 'या' 51 जागांवर जनतेचा फैसला
खरी शिवसेना कोणाची? शिंदे की ठाकरेंची 'या' 51 जागांवर जनतेचा फैसला.
बारामतीत काका-पुतण्या कोण पॉवरफुल? या 40 जागा ठरवणार खरी राष्ट्रवादी
बारामतीत काका-पुतण्या कोण पॉवरफुल? या 40 जागा ठरवणार खरी राष्ट्रवादी.
महायुती-मविआमध्ये काँटे की टक्कर,मतदानानंतरच्या एक्झिट पोलचे आकडे काय?
महायुती-मविआमध्ये काँटे की टक्कर,मतदानानंतरच्या एक्झिट पोलचे आकडे काय?.