VIDEO: असं व्हयं.. अन् पुढे अक्षय कुमार सोलापुरच्या पोरीसोबत मराठीत बोलत राहिला, परीक्षार्थिंनो तुम्हीही ऐका सल्ला

देशातील विविध ठिकाणच्या चाहत्यांशी तो स्वत: फोनवर बोलतोय. या संवादाचा व्हिडीओ त्याने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट केला आहे. सोलापूरच्या (Solapur) एका विद्यार्थिनीसोबत अक्षयने मराठीत गप्पा मारल्या. त्याचसोबत परीक्षेची तयारी करणाऱ्या या विद्यार्थिनीला त्याने एक सल्ला दिला आहे.

VIDEO: असं व्हयं.. अन् पुढे अक्षय कुमार सोलापुरच्या पोरीसोबत मराठीत बोलत राहिला, परीक्षार्थिंनो तुम्हीही ऐका सल्ला
Akshay KumarImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Mar 14, 2022 | 5:21 PM

बॉलिवूडचा खिलाडी अर्थात अक्षय कुमारचा (Akshay Kumar) ‘बच्चन पांडे’ (Bachchhan Paandey) हा चित्रपट येत्या शुक्रवारी (18 मार्च) प्रदर्शित होतोय. अक्षय त्याच्या प्रत्येक चित्रपटाचं प्रमोशन हटके पद्धतीनं करते. ‘बच्चन पांडे’च्या प्रमोशननिमित्तही त्याने अनोखा फंडा वापरला आहे. देशातील विविध ठिकाणच्या चाहत्यांशी तो स्वत: फोनवर बोलतोय. या संवादाचा व्हिडीओ त्याने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट केला आहे. सोलापूरच्या (Solapur) एका विद्यार्थिनीसोबत अक्षयने मराठीत गप्पा मारल्या. त्याचसोबत परीक्षेची तयारी करणाऱ्या या विद्यार्थिनीला त्याने एक सल्ला दिला आहे. ‘बच्चन पांडे’ या चित्रपटात अक्षयसोबत क्रिती सनॉन, जॅकलिन फर्नांडिस, अर्शद वारसी यांच्या भूमिका आहेत.

सोलापूरच्या दिप्ती या विद्यार्थिनीसोबत अक्षयने फोनवरून संवाद साधला. मी सोलापूरची आहे असं म्हटल्यावर अक्षयने तिला मराठी आहेस का असा प्रश्न विचारला. ती हो म्हणताच “आपण मराठीत बोलुया” असं तो म्हणतो. सरकारी परीक्षेसाठी तयारी करत असल्याचं दिप्तीने यावेळी अक्षयला सांगितलं. ते ऐकून तिचा अभिमान असल्याचं अक्षय म्हणाला. त्याचप्रमाणे 18 मार्चला माझा चित्रपट प्रदर्शित होतोय, थिएटरमध्ये जाऊन बघ की, असं तो तिला सांगतो. हे सांगताना तो तिला सल्ला देतो की, “परीक्षा दिल्यानंतर चित्रपट बघायला जा, परीक्षेच्या मधे जाऊ नको.” व्हिडीओच्या शेवटी तो तिला काळजी घेण्यास सांगतो आणि परीक्षेसाठी शुभेच्छा देतो.

View this post on Instagram

A post shared by Akshay Kumar (@akshaykumar)

‘बच्चन पांडे’ हा चित्रपट 2020 मध्ये ख्रिसमसच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार होता. मात्र कोरोना आणि लॉकडाउनमुळे प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली. फरहाद सामजी यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. बच्चन पांडे या चित्रपटाच्या नावाबद्दल प्रेक्षकांना बरंच कुतूहल आहे. नावाप्रमाणेच यामध्ये खरंच अभिषेक बच्चन आणि चंकी पांडे यांच्या भूमिका आहेत की काय, असा प्रश्न दिग्दर्शकांना विचारला असता त्यांनी सांगितलं, “अभिषेक आणि चंकी पांडे हे चित्रपटात केवळ फोटोंच्या स्वरुपात प्रेक्षकांना पहायला मिळतील.” ‘टशन’ या चित्रपटात अक्षय कुमारच्या भूमिकेचं नाव बच्चन पांडे होतं. तेच नाव या चित्रपटाला दिल्याचं अक्षयने सांगितलं.

हेही वाचा:

नेमकं कुठे बिनसलं? आमिरने सांगितलं रिना, किरण रावसोबतच्या घटस्फोटांमागील कारण

‘द काश्मीर फाईल्स’च्या पल्लवी जोशी, विवेक अग्निहोत्रींविरोधात काढण्यात आला फतवा

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.