Akshay Kumar | ‘या’ लोकांना पाहताच अक्षय कुमार थरथर कापला, अभिनेत्याने केला धक्कादायक खुलासा, चाहते हैराण
अक्षय कुमार हा कायमच चर्चेत राहणारा अभिनेता आहे. अक्षय कुमार याची जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. अक्षय कुमार याने एक अत्यंत मोठा काळ बाॅलिवूडमध्ये गाजवला आहे. काही दिवसांपूर्वीच त्याच्या वेलकम 3 चित्रपटाचा टिझर रिलीज झालाय.
मुंबई : बाॅलिवूडचा खिलाडी कुमार अर्थात अक्षय कुमार (Akshay Kumar) हा कायमच चर्चेत असतो. अक्षय कुमार याची जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. अक्षय कुमार असा एकमेंव बाॅलिवूड अभिनेता आहे, ज्याचे एका वर्षाला तब्बल चार चित्रपट (Movie) प्रेक्षकांच्या भेटीला येतात. अक्षय कुमार हा कायमच आपल्या फिटनेसकडे देखील प्रचंड लक्ष देतो. कोणत्याही बाॅलिवूडच्या पार्टीला रात्री उशीरापर्यंतही कधीच अक्षय कुमार हा थांबत नाही. अक्षय कुमार त्याच्या चित्रपटामुळे चर्चेत असतो.
अक्षय कुमार याचे चित्रपट गेल्या काही दिवसांपासून सतत फ्लाॅप जाताना दिसत आहेत. काही दिवसांपूर्वीच अक्षय कुमार याचा सेल्फी हा चित्रपट रिलीज झाला. मात्र, या चित्रपटाला काही खास धमाका करण्यात यश मिळाले नाही. या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करतानाही अक्षय कुमार हा दिसला. कोरोनानंतर अक्षय कुमार याच्या चित्रपटाकडे प्रेक्षकांनी पाठ फिरवली.
काही दिवसांपूर्वीच अक्षय कुमार याचा ओएमजी 2 हा चित्रपट रिलीज झाला. मात्र, या चित्रपटाने 150 कोटींची कमाई केली. या चित्रपटाकडून निर्मात्यांना मोठ्या अपेक्षा होत्या, मात्र चित्रपटाला धमाका करण्यात यश मिळाले नाही. अक्षय कुमार हा अभिनय क्षेत्रामध्ये येण्याच्या अगोदर मार्शल आर्टमध्ये धमाकेदार काम करत होता. त्यावेळी अक्षय कुमार याचे नाव राजीव भाटिया असे होते.
त्यावेळी अक्षय कुमार हा मार्शल आर्टसोबतच ज्वेलरी आणि कपड्यांचा व्यवसाय करत होता. मात्र, एकदा अक्षय कुमार याच्यासोबत असे काही घडले की, त्यादिवशाची आठवण आताही झाली की, अक्षय कुमार थरथर कापण्यास लागतो. एक मुलाखतीमध्ये अक्षय कुमार याने याबद्दल मोठा खुलासा हा केलाय. अक्षय कुमार याचे बोलणे ऐकून सर्वचजण हैराण झाले.
अक्षय कुमार म्हणाला की, मी अभिनयामध्ये येण्याच्या अगोदर ज्वेलरी आणि कपड्यांचा व्यवसाय करत होतो. त्यामध्ये मला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी कपडे आणि ज्वेलरी घेऊन जाण्याचे काम होते. एकदा मी रेल्वेने प्रवास करत असताना रेल्वे ही चंबलच्या परिसरात येताच काही दरोडेखोर हे आमच्या डब्यामध्ये पोहचले. यावेळी ते प्रवाशांना मारहाण करत होते.
हा सर्व प्रकार पाहून मी घाबरून गेलो. कारण ते प्रवाशांच्या माैल्यवान वस्तूंची चोरी करत होते. मी खूप जास्त घाबरलो आणि मला काय करावे हेच कळत नव्हते. ज्यावेळी ते दरोडेखोर माझ्या सीटजवळ आले. त्यावेळी मी झोपण्याचे नाटक केले. मात्र, सुदैवाने त्यांनी मला उठवण्याचा प्रयत्न केला नाही आणि ते माझ्या जवळून निघून गेले. मी त्यावेळी त्यांचा विरोधही करू शकत नव्हतो. जीव वाचवण्यासाठी झोपणेच योग्य असल्याचे सांगतानाही अक्षय दिसला.