Akshay Kumar | ‘अंग्रेजी पुत्तर’ म्हणत अक्षय कुमारकडून मुलाला 21 व्या वाढदिवशी ‘ही’ खास सूट
अक्षय कुमार आणि ट्विंकल खन्ना यांचा मुलगा आरव आता 21 वर्षांचा झाला आहे. त्याच्या वाढदिवसानिमित्त अक्षय आणि ट्विंकलने सोशल मीडियावर पोस्ट लिहित भावना व्यक्त केल्या आहेत.
मुंबई | 16 सप्टेंबर 2023 : बॉलिवूडचा खिलाडी अर्थात अभिनेता अक्षय कुमारचा मुलगा आरव त्याचा 21 वा वाढदिवस साजरा करतोय. या खास दिवसानिमित्त वडील अक्षय कुमार आणि आई ट्विंकल खन्ना यांनी मुलासाठी सोशल मीडियावर पोस्ट लिहिली आहे. अक्षयने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर आरवचा फोटो शेअर करत त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्याचसोबत 21 वा वाढदिवस असल्याने त्याने आरवला यापुढे विशेष सूटसुद्धा दिली आहे. सोबतच ट्विंकलनेही आरवचा लहानपणीचा आणि आताचा फोटो पोस्ट करत तिच्या भावना व्यक्त केल्या आहेत.
अक्षय कुमारची पोस्ट-
अक्षयने त्याच्या पोस्टमध्ये लिहिलं, ‘हाय मेरे अंग्रेजी पुत्तर. आज तू 21 वर्षांचा झाला आहेस. मात्र माझ्यासाठी तू नेहमीच तो छोटा आरव असशील, जो खोडकरपणे माझ्या मिठीत यायचा आणि संपूर्ण दिवस माझा तुझ्यामागे जायचा. आता तो कायदेशीरपणे त्या सर्व गोष्टी करू शकतो, जे तू आधीपासूनच करत आहेस असा मी अंदाज व्यक्त करतो. मला तुझ्यावर फार अभिमान आहे आणि मी तुझ्यावर सदैव प्रेम करत राहीन.’
View this post on Instagram
ट्विंकल खन्नाची पोस्ट-
ट्विंकलने तिच्या पोस्टमध्ये लिहिलं, ‘आता तू 21 वर्षांचा आणि तांत्रिकदृष्ट्या बोलायचं झाल्यास, एक प्रौढ माणूस झाला आहेस. मुलाचं संगोपन करणं म्हणजे जणू एखादं घर बांधण्यासारखं आणि त्या घरातील प्रत्येक खोली डिझाइन करण्यासारखंच आहे. तुम्हाला शक्य तितके सर्वोत्तम प्रयत्न तुम्ही करता आणि शेवटी ते घर त्याच्या योग्य मालकाकडे सोपवण्याची वेळ आली आहे. जो त्यांच्या आवडीनुसार फर्निचरची पुनर्रचना करेल आणि बिलंसुद्धा भरतील. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा माझ्या मुला. तू ज्यांना ओळखतोस त्या सर्वांच्या चेहऱ्यावर तुझ्या दयाळू स्वभावामुळे सतत हास्य येऊ दे.’
View this post on Instagram
अक्षय आणि ट्विंकलचा मुलगा आरव हा इतर स्टारकिड्सप्रमाणे प्रकाशझोतात नसतो. एका मुलाखतीत खुद्द अक्षयने सांगितलं होतं की त्याला लाइमलाइटमध्ये राहायला आवडत नाही. आरवने वयाच्या चौथ्या वर्षापासूनच मार्शल आर्ट्स शिकायला सुरुवात केली. इतकंच नव्हे तर त्याने ज्युडो नॅशनल चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक पटकावलं आहे.