Akshay Kumar याला कतरिना कैफच्या बेडरुममधून चोरायची आहे ‘ही’ खास गोष्ट

कतरीना कैफ हिच्या बेडरुममधील 'ही' खास गोष्ट अक्षय कुमार याला प्रचंड आवडते; अखेर खिलाडी कुमारने मनातील भावना व्यक्त केल्याच... सध्या सर्वत्र अभिनेत्याची चर्चा...

Akshay Kumar याला कतरिना कैफच्या बेडरुममधून चोरायची आहे 'ही' खास गोष्ट
Follow us
| Updated on: Jul 07, 2023 | 11:38 AM

मुंबई | अभिनेता अक्षय कुमार आणि अभिनेत्री कतरिना कैफ यांनी अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत चाहत्यांच्या मनावर राज्य केलं. दोघांच्या जोडीला चाहत्यांनी डोक्यावर देखील घेतलं. आजही अक्षय आणि कतरिना यांच्या जोडीची आणि सिनेमांची चर्चा रंगलेली असते. अक्षय आणि कतरिना यांनी ‘वेलकम’, ‘नमस्ते लंडन’ आणि ‘सिंग इज किंग’ सिनेमात दमदार भूमिका साकारत चाहत्यांच्या मनात घर केलं. एक काळ असा होता, जेव्हा चाहते कायम अक्षय आणि कतरिना यांच्या आगामी सिनेमांच्या प्रतीक्षेत असायचे. एवढंच नाही तर, दोघांनी मुलाखतींच्या माध्यमातून एकमेकांबद्दल अनेक गोष्टी सांगितल्या. ज्यामुळे दोघांमधील नातं देखील चाहत्यांच्या समोर आलं.

दरम्यान, दिग्दर्शक करण जोहर याने ‘कॉफी विथ करण’ शोमध्ये अभिनेता अक्षय कुमार याला अभिनेत्री प्रियांका चोप्रा आणि अभिनेत्री कतरिना कैफ हिच्या बेडरुममधून कोणती गोष्ट चोरायला आवडेल असा प्रश्न विचारला.. यावर खिलाडी कुमार याने दिलेल्या उत्तराचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

अभिनेता म्हणाला, ‘प्रियांका चोप्रा हिच्या बेडरुममधून कोणती गोष्ट चोरायची असेल, तर मी तिचं स्वतःचं सीडी अल्बम चोरेल.. तर कतरिना हिच्या बेडरुममधून काही चोरायचं असेल तर मी तिचा फॅमेली फोटो चोरेल. कारण तिची फॅमेली फार मोठी आहे.’ असं अभिनेता म्हणाला..

कतरिना हिच्या कुटुंबाबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्रीला सहा बहिणी आणि एक भाऊ आहे. अभिनेत्रीचं कुटुंब झगमगत्या विश्वापासून दूर असलं तरी, कतरिना हिच्या लोकप्रियतेमुळे कामय चर्चेत असतं. कतरिना हिच्या भावंडांचे फोटो कायम सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. एवढंच नाही तर, कतरिना कायम तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत असते.

कतरिना कैफ हिने ९ डिसेंबर २०२१ मध्ये अभिनेता विकी कौशल याच्यासोबत मोठ्या थाटात लग्न केलं. अनेक वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर दोघांनी लग्न करण्याचा विचार केला. पण लग्नाआधी कधीही दोघांच्या रिलेशनशिपच्या चर्चा रंगल्या नाहीत. आज कतरिना बॉलिवूडमध्ये सक्रिय तर आहे, पण अभिनेत्री विकीसोबत वैवाहिक आयुष्याचा आनंद देखील घेत आहे.

विकी आणि कतरिना कैफ यांचे फोटो देखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असतात. शिवाय कौशल आणि कैफ कुटुंबाला कायम एकत्र बाहेर जाताना स्पॉट केलं जातं. दोन्ही कुटुंबाचे फोटो देखील चाहत्यांच्या पसंतीस पडत असतात. विकी आणि कतरिना देखील एकमेकांच्या कुटुंबाबद्दल अनेक गोष्टी सांगत असतात.

कामासाठी मराठी मुलं नकारली, कंपनीच्या मालकाला विचारला जाब
कामासाठी मराठी मुलं नकारली, कंपनीच्या मालकाला विचारला जाब.
मुंडेंना दिलेल्या इशाऱ्यावर सदावर्तेंचं उत्तर, 'पावशेर पिऊन धमक्या...'
मुंडेंना दिलेल्या इशाऱ्यावर सदावर्तेंचं उत्तर, 'पावशेर पिऊन धमक्या...'.
बीड हत्या प्रकरणाचं पुणे कनेक्शन, तीन आरोपींपैकी दोघांना पुण्यातून अटक
बीड हत्या प्रकरणाचं पुणे कनेक्शन, तीन आरोपींपैकी दोघांना पुण्यातून अटक.
'आकाचे आका तुम्हाला जेलवारी...', सुरेश धस यांचा धनंजय मुंडेंवर निशाणा
'आकाचे आका तुम्हाला जेलवारी...', सुरेश धस यांचा धनंजय मुंडेंवर निशाणा.
...तर धनंजय मुंडेंना रस्त्यावर फिरू देणार नाही, जरांगेंचा सभेतून इशारा
...तर धनंजय मुंडेंना रस्त्यावर फिरू देणार नाही, जरांगेंचा सभेतून इशारा.
लाडक्या बहिणीचे पैसे लेकाला! चूक मान्य, पैसे केले परत, मात्र पुन्हा...
लाडक्या बहिणीचे पैसे लेकाला! चूक मान्य, पैसे केले परत, मात्र पुन्हा....
'लई अवघड हाय...', मिटकरींकडून फोटो शेअर अन् बजरंग सोनावणेंवर निशाणा
'लई अवघड हाय...', मिटकरींकडून फोटो शेअर अन् बजरंग सोनावणेंवर निशाणा.
बीड हत्येतील तिन्ही फरार आरोपी दोन दिवस भिवंडीत अन् नंतर...
बीड हत्येतील तिन्ही फरार आरोपी दोन दिवस भिवंडीत अन् नंतर....
नारायण राणेंची 45 लाखांची फसवणूक? पोलिसांकडून चौघांना अटक, प्रकरण काय?
नारायण राणेंची 45 लाखांची फसवणूक? पोलिसांकडून चौघांना अटक, प्रकरण काय?.
रत्नागिरीचं पालकमंत्रीपद उदय सामंत यांना मिळणार, भाजपची सहमती?
रत्नागिरीचं पालकमंत्रीपद उदय सामंत यांना मिळणार, भाजपची सहमती?.