अक्षय कुमार याच्या पत्नीने दाऊद इब्राहिमसाठी केलंय मोठं काम? मुलांना देखील माहितीये सत्य

Twinkle Khanna and Dawood Ibrahim | अक्षय कुमार याची पत्नी ट्विंकल खन्ना हिचे दाऊद इब्राहिम याच्यासोबत खास कनेक्शन, डॉनसाठी अभिनेत्रीने केलंय असं काम? अनेक वर्षांनंतर ट्विंकलने सांगितलं नक्की काय आहे सत्य... सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त ट्विंकल खन्ना हिची चर्चा...

अक्षय कुमार याच्या पत्नीने दाऊद इब्राहिमसाठी केलंय मोठं काम? मुलांना देखील माहितीये सत्य
Follow us
| Updated on: Apr 22, 2024 | 8:15 AM

अभिनेता अक्षय कुमार याची पत्नी आणि अभिनेत्री ट्विंकल खन्ना कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. सांगायचं झालं तर, अभिनेत्रीची ओळख मिसेज फनीबोन्स म्हणून देखील आहे. ट्विंकल खन्ना आज अभिनयापासून दूर असली तरी, अभिनेत्री तिच्या पोस्ट आणि वक्तव्यांमुळे कायम चर्चेत असते. आता देखील ट्विंकल मोठ्या कारणामुळे चर्चेत आहे. ट्विंकल खन्ना हिचे भारताचा सर्वात मोठा शत्रू अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याच्यासोबत खास संबंध असल्याच्या चर्चांनी एकेकाळी जोर धरला होता. आता अभिनेत्रीने यावर मौन सोडलं आहे.

ट्विंकल खन्ना हिने एका वृत्तपत्रासाठी लिहिलेल्या स्तंभात सांगितले की, माध्यमे अनेक बातम्या तयार करतात. दाऊत याच्यासोबत रंगलेल्या चर्चांवर देखील अभिनेत्रीने मोठा खुलासा केला आहे. अभिनेत्री म्हणाली, ‘मी अनेक न्यूज चॅनलवर माझ्या नावाचं टिकर पाहिलं आहे… मी दाऊत याच्यासाठी डान्स केला आहे… असं त्यामध्ये लिहिण्यात आलं होतं…’

‘माझ्या मुलांना देखील माहिती आहे की, माझं डान्सींग स्किल डब्ल्यूडब्ल्यूएफचा सामना पाहिल्या सारखं आहे.. दाऊतने माझ्यापेक्षा अधिक चांगल्या डान्सर्स पार्टीसाठी बोलावल्या असतील… पण हे फेक न्यूजचे जग आहे.’ असं म्हणत अभिनेत्री रंगणाऱ्या सर्व चर्चांना पूर्णविराम दिला.

हे सुद्धा वाचा

ट्विंकल – दाऊत यांच्या नात्यावर काय म्हणाला होता अक्षय कुमार?

2010 मध्ये अक्षय कुमारने पत्नी ट्विंकल खन्नाचे दाऊदसोबतचे संबंध नाकारले होते. त्याची पत्नी अंडरवर्ल्ड डॉनने दुबईत आयोजित केलेल्या पार्टीत सहभागी झाली होती. अशा समोर येणाऱ्या सर्व बातम्या खोट्या आहेत. त्यामध्ये काहीही तथ्य नाही.. असं देखील अभिनेता म्हणाला होता…

सांगायचं झालं तर, अनेक वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर अक्षय कुमार – ट्विंकल खन्ना यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. 2001 मध्ये दोघांनी लग्न केलं. दोघांना दोन मुलं देखील आहेत. त्यांच्या मुलाचं नाव आरव तर मुलीचं नाव नितारा असं आहे. अभिनेत्याला अनेकदा कुटुंबासोबत स्पॉट केलं जातं…

ट्विंकल खन्ना हिच्याबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्रीने अभिनयाला रामराम ठोकला आहे. ट्विंकल हिने ‘जब प्यार किसी से होता है’, ‘सीनू’, ‘बादशाह’, ‘जोरू का गुलाम’ आणि ‘लव के लिए कुछ भी करेगा’ यांसारख्या अनेक सिनेमांमध्ये मुख्य भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं आहे.

ट्विंकल खन्ना फक्त अभिनेत्री नाहीतर, उत्तम लेखिका देखील आहे. 2015 मध्ये ट्विंकल हिचं पहिलं पुस्तक ‘मिसेज फनीबोन्स’ प्रकाशित झालं. त्यानंतर ‘द लीजेंड ऑफ लक्ष्मी प्रसाद ‘ हे पुस्तक प्रकाशित झालं. ट्विंकल हिच्या तिसऱ्या पुस्तकाचं नाव ‘पजामास आर फॉरगिविंग’ असून चौथ्या पुस्तकाचं नाव ‘वेलकम टू पॅराडाइज’ असं आहे. ट्विंकल सोशल मीडियावर देखील कायम सक्रिय असते.

मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी.
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर.
बावनकुळेंनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' मंत्र्यांचं नाव समोर
बावनकुळेंनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' मंत्र्यांचं नाव समोर.
गोगावलेंचा 'कोट' रेडी, आज मंत्रिपदाची शपथ, कोणत्या खात्याची अपेक्षा?
गोगावलेंचा 'कोट' रेडी, आज मंत्रिपदाची शपथ, कोणत्या खात्याची अपेक्षा?.
आज मंत्रिमंडळ विस्तार, भाजप-शिवसेने अन् राष्ट्रवादीतून कोण घेणार शपथ?
आज मंत्रिमंडळ विस्तार, भाजप-शिवसेने अन् राष्ट्रवादीतून कोण घेणार शपथ?.
धाकधूक कायम... शपथविधीला काही तास अन् भाजपच्या मंत्र्याना फोन नाही
धाकधूक कायम... शपथविधीला काही तास अन् भाजपच्या मंत्र्याना फोन नाही.
दादांकडून मंत्रिपदासाठी या आमदारांना फोन, राष्ट्रवादीतून कोणाची वर्णी?
दादांकडून मंत्रिपदासाठी या आमदारांना फोन, राष्ट्रवादीतून कोणाची वर्णी?.
1991 नंतर पहिल्यांदाच नागपूरात शपथविधी,त्यावेळी 'नागपूर'च का निवडलं?
1991 नंतर पहिल्यांदाच नागपूरात शपथविधी,त्यावेळी 'नागपूर'च का निवडलं?.
'मोदींचं भाषण बोअर...गणिताच्या तासाची आठवण', काँग्रेस खासदाराचा टोला
'मोदींचं भाषण बोअर...गणिताच्या तासाची आठवण', काँग्रेस खासदाराचा टोला.
दादर स्थानकाजवळील हनुमान मंदिरावरून 'गदा'रोळ, राजकीय वातावरण तापलं
दादर स्थानकाजवळील हनुमान मंदिरावरून 'गदा'रोळ, राजकीय वातावरण तापलं.