योगी भेटीचा अक्षयकुमारला फटका? ठाकरे सरकारची वक्रदृष्टी?; ‘सूर्यवंशी’चं काय होणार?

अभिनेता अक्षय कुमार सध्या त्याच्या चित्रपटांच्या चित्रीकरणात व्यस्त असला तरी भाजपच्या असलेल्या त्याच्या जवळकीमुळे त्याला त्रास होण्याची शक्यता आहे. (Akshay kumar yogi Adityanath meeting is the reason for uddhav thackeray to put sooryavanshi release in trouble)

योगी भेटीचा अक्षयकुमारला फटका? ठाकरे सरकारची वक्रदृष्टी?; 'सूर्यवंशी'चं काय होणार?
Follow us
| Updated on: Feb 12, 2021 | 9:01 AM

मुंबई: अभिनेता अक्षय कुमार सध्या त्याच्या चित्रपटांच्या चित्रीकरणात व्यस्त असला तरी भाजपच्या असलेल्या त्याच्या जवळकीमुळे त्याला त्रास होण्याची शक्यता आहे. त्यातच त्याने उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याशी चर्चा करणं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना काही पटलेलं दिसलं नाही. त्यामुळेच अक्षयच्या आगामी ‘सूर्यवंशी’ या चित्रपटाचं प्रदर्शन रखडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. ठाकरे सरकारकडून सूर्यवंशीच्या प्रदर्शनात अडथळे आणले जाऊ शकतात, असं सांगितलं जात आहे. (Akshay kumar yogi Adityanath meeting is the reason for uddhav thackeray to put sooryavanshi release in trouble)

एप्रिलमध्ये सिनेमा प्रदर्शित होणार?

चित्रपटगृहे पूर्ण क्षमतेने सुरू करण्याची परवानगी देण्यात आली आहे. मात्र महाराष्ट्र सरकार अद्यापही त्यावर विचार करत आहे. मात्र, सिनेमागृहपूर्ण क्षमतेने उघडल्यावरच ‘सूर्यवंशी’ रिलीज करण्यात यावा असं चित्रपटांच्या निर्मात्यांना वाटत आहे. महाराष्ट्रात सिनेमागृहे शंभर टक्के सुरू झाल्यावरच सिनेमाला फायदा होईल. त्याआधी सिनेमा रिलीज केल्यास मोठं नुकसान होणार असल्याने चित्रपट निर्माते चिंतीत आहेत. रिलायन्स इंटरटेनमेंट बॅनर्सखाली हा सिनेमा तयार करण्यात आला आहे. रोहित शेट्टी यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. या सिनेमात करण जौहर, अक्षय कुमार आणि अक्षयची आई अरुणा भाटिया यांचा पैसा गुंतलेला आहे. हा सिनेमा होळीच्या सुमारास रिलीज करण्याचा निर्मात्यांचा प्रयत्न होता. नंतर एप्रिलमध्ये हा सिनेमा प्रदर्शित करण्याचं ठरलं. पण सिनेमागृह अद्याप शंभर टक्के सुरू न झाल्याने ‘सूर्यवंशी’चं प्रदर्शन रखडणार असल्याचं सांगण्यात येतं.

‘मास्टर’ची छप्पर फाडके कमाई

सिनेमाच्या प्रदर्शनाबाबत रिलायन्स इंटरटेन्मेंटच्या वितरकांशीही चर्चा सुरू आहे. मात्र, अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. देशातील सर्वात मोठं कमाईचं साधन असलेल्या मुंबईतच सिनेमागृह पूर्ण क्षमतेने सुरू नाही झाल्यास या सिनेमाचं मोठं आर्थिक नुकसान होणार आहे. दुसरीकडे राज्यात 50 टक्के सिनेमागृह सुरू असतानाही दाक्षिणात्य सिनेमा ‘मास्टर’ रिलीज झाला. अर्ध्या क्षमतेने सिनेमागृह सुरू असतानाही या सिनेमाने कोट्यवधीचा व्यवसाय केला. या सिनेमाने चार दिवसातच 100 कोटींचा आकडा पार केला. जर ‘मास्टर’ ही कमाई करू शकते, तर अक्षयकुमारने घाबरण्याचं कारण नाही, असं सांगितलं जात आहे.

अक्षय ‘बच्चन पांडे’मध्ये व्यस्त

अक्षय कुमार सध्या त्याच्या इतर सिनेमांमध्ये व्यस्त आहे. अक्षय सध्या जैसलमेरमध्ये असून ‘बच्चन पांडे’ या सिनेमाच्या शुटिंगमध्ये व्यस्त आहे. या सिनेमात कृती सेनन, जॅकलीन फर्नांडिस, अर्शद वारसी, पंकज त्रिपाठी आणि प्रतिक बब्बर यांच्या प्रमुख भूमिका आहेत. जानेवारीपासून या सिनेमाचं चित्रीकरण सुरू झालं आहे. या चित्रीकरणावेळी काही अडचणी निर्माण झाल्याने आता उत्तर प्रदेशात उरलेल्या सिनेमाचं चित्रीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. (Akshay kumar yogi Adityanath meeting is the reason for uddhav thackeray to put sooryavanshi release in trouble)

संबंधित बातम्या:

Nagpur Corona Update | नागपुरात पुन्हा कोरोनाचा ब्लास्ट, 24 तासात 500 नवे रुग्ण

Sushant Singh Rajput suicide case | एनसीबीकडून ‘त्या’ अफवेचे खंडन, केला मोठा खुलासा

Preetam : प्रेमाचा अनोखा रंग दाखवणारा ‘प्रीतम’ लवकरच चित्रपटगृहात, 19 फेब्रुवारीला होणार प्रदर्शित

(Akshay kumar yogi Adityanath meeting is the reason for uddhav thackeray to put sooryavanshi release in trouble)

'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.