अक्षय कुमार याच्या एक निर्णयामुळे शिल्पा झाली कोट्यवधींची मालकीण!
Shilpa Shetty | अभिनेत्री शिल्पा शेट्टी कायम तिच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यामुळे चर्चेत असते... आता देखील अभिनेत्री एका मोठ्या कारणामुळे चर्चेच आली आहे... सांगायचं झालं तर, एकेकाळी शिल्पा आणि अक्षय यांच्या नात्याच्या चर्चांनी सर्वत्र जोर धरला होता...
अभिनेता अक्षय कुमार गेल्या अनेक वर्षांपासून बॉलिवूडवर राज्य करत आहे. सध्याच्या घडीला देखील अक्षय कुमार याचा बॉलिवूड आणि चाहत्यांमध्ये असलेला बोलबाला कमी झालेला नाही… आज देखील अक्षय कुमार याच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्याबद्दल अनेक गोष्टी जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक असतात. एक काळ असा होता, जेव्हा अभिनेता फक्त त्याच्या सिनेमांमुळेच नाहीतर, रिलेशनशिपमुळे देखील चर्चेत होता. लग्नाआधी अक्षय याने अनेक प्रसिद्ध अभिनेत्रींना डेट केलं आहे. यामध्ये अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिच्या नावाचा देखील समावेश आहे…
एक काळ असा होता जेव्हा फक्त बॉलिवूडमध्येच नाही तर, चाहत्यांमध्ये देखील अक्षय आणि शिल्पा यांच्या नात्याची चर्चा रंगली होती. दोघांच्या जोडीला चाहत्यांनी देखील डोक्यावर घेतलं. पण अक्षय आणि शिल्पा यांचं नातं लग्नापर्यंत पोहोचलं नाही. रिलेशनशिपमध्ये असता अक्षय याने घेतलेल्या निर्णयामुळे अभिनेत्रीला मोठा धक्का बसला. पण त्याचा अभिनेत्रीला मोठा फायदा देखील झाला.
अक्षय आणि शिल्पा यांच्या रिलेशनशिपच्या चर्चांनी सर्वत्र जोर धरला होता. रिपोर्टनुसार, रिलेशनशिप असताना अक्षय याने शिल्पा हिची फसवणूक केली. अशात दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. अक्षय कुमार याच्यासोबत ब्रेकअप झाल्यानंतर अभिनेत्रीच्या आयुष्यात उद्योजक राज कुंद्रा याची एन्ट्री झाली.
शिल्पा आणि राज यांनी देखील अनेक वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर लग्न करण्याचा विचार केला. सांगायचं झालं तर, शिल्पा शेट्टी ही राज कुंद्रा याची दुसरी पत्नी आहे. राज याने पहिल्या पत्नीला घटस्फोट दिल्यानंतर शिल्पा हिच्यासोबत लग्न केलं. आज शिल्पा उद्योजक पती राज कुंद्रा याच्यासोबत रॉयल आयुष्य जगत आहे. आज अभिनेत्री कोट्यवधी संपत्तीची मालकीण आहे. शिल्पा – राज यांची फक्त भारतात नाही तर, परदेशात देखील मोठी संपत्ती आहे.
शिल्पा आणि राज यांनी 22 नोव्हेंबर 2022 मध्ये लग्न केलं. त्यांच्या लग्नात अनेक सेलिब्रिटी देखील उपस्थित होते. लग्नानंतर अभिनेत्री मुलाला जन्म दिला. त्यानंतर अभिनेत्री सरोगसीच्या मदतीने एका मुलीची आई झाली. शिल्पा कायम पती आणि मुलांसोबत सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते.
अक्षय कुमार याचं कुटुंब
अनेक अभिनेत्रींना डेट केल्यानंतर अक्षय कुमार याने अभिनेत्री ट्विंकल खन्ना हिच्यासोबत लग्न केलं. अनेक वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर अक्षय कुमार – ट्विंकल खन्ना यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. 2001 मध्ये दोघांनी लग्न केलं. दोघांना दोन मुलं देखील आहेत. त्यांच्या मुलाचं नाव आरव तर मुलीचं नाव नितारा असं आहे.