‘सिंघम अगेन’ चित्रपटाबद्दल मोठे अपडेट, थेट अक्षय कुमार याचा…
बाॅलिवूड अभिनेता अक्षय कुमार हा गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत असणारा अभिनेता आहे. अक्षय कुमार याचे एका मागून एक चित्रपट हे प्रेक्षकांच्या भेटीला येताना दिसत आहेत. मात्र, काही दिवसांपासून अक्षयच्या चित्रपटाकडे प्रेक्षकांनी पाठ फिरवलीये.
मुंबई : बाॅलिवूडचा खिलाडी कुमार अर्थात अक्षय कुमार हा गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. अक्षय कुमार याचे एका मागून एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. मात्र, अक्षय कुमार याचे चित्रपट काही खास धमाका हा करू शकत नाहीत. काही दिवसांपूर्वीच अक्षय कुमार याचा सेल्फी हा चित्रपट रिलीज झालाय. मात्र, या चित्रपटाला फार काही धमाका करण्यात अजिबात यश मिळाले नाही. नुकताच आता सिंघम अगेन चित्रपटातील अक्षय कुमार याचा धमाका करताना व्हिडीओ पुढे आलाय.
अक्षय कुमार हा रोहित शेट्टी याच्या सिंघम अगेन चित्रपटात धमाका करणार आहे. या चित्रपटाबद्दल चाहत्यांमध्ये मोठी क्रेझ ही बघायला मिळतंय. विशेष म्हणजे हा चित्रपट बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित आहे. सिंघम अगेन चित्रपटाचा एक व्हिडीओ रोहित शेट्टी याने सोशल मीडियावर शेअर केलाय. यामध्ये अक्षय कुमार धमाल करताना दिसत आहे.
रोहित शेट्टी याने शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये अक्षय कुमार हा हेलीकॉप्टरमधून उडी मारताना दिसत आहे. हा व्हिडीओ शेअर करत रोहित शेट्टी याने खास पोस्ट देखील सोशल मीडियावर शेअर केली. रोहित शेट्टी याने लिहिले की, पुन्हा एकदा सिंघममध्ये. आम्ही फक्त तेच करत आहोत, जे आमच्या चाहत्यांना हवे आहे.
View this post on Instagram
आता रोहित शेट्टी याने शेअर केलेली ही पोस्ट सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसतंय. चाहते हे या पोस्टवर मोठ्या प्रमाणात कमेंट करत आहेत. विशेष म्हणजे लोकांना हा व्हिडीओ प्रचंड आवडलाय. अक्षय कुमार याच्या सिंघम अगेन चित्रपटाकडून चाहत्यांना मोठ्या अपेक्षा या नक्कीच आहेत. कारण त्याचे चित्रपट सतत फ्लाॅप जात आहेत.
काही दिवसांपूर्वीच अक्षय कुमार याने हेरा फेरी 3 चित्रपटाला अगोदर नकार दिला. मात्र, काही दिवसांनी अचानकपणे अक्षय कुमार याने हेरा फेरी 3 ला होकार दिला. अगोदर थेट एका कार्यक्रमात बोलताना अक्षय कुमार हा म्हणाला की, मला चित्रपटाची स्क्रीप्ट अजिबात आवडली नसल्याने मी चित्रपटाला नकार दिला, अक्षय कुमार याचे हे बोलणे ऐकून लोक हैराण झाले.