Akshay Kumar: ‘मिस्ट्री गर्ल’सोबत अक्षय कुमारच्या मुलाचे फोटो व्हायरल; सुंदरतेची होतेय जोरदार चर्चा

कोण आहे नाओमिका सरन? जिच्यासोबत अक्षय कुमारचा मुलगा आरवचे फोटो झाले व्हायरल

Akshay Kumar: 'मिस्ट्री गर्ल'सोबत अक्षय कुमारच्या मुलाचे फोटो व्हायरल; सुंदरतेची होतेय जोरदार चर्चा
Akshay Kumar: 'मिस्ट्री गर्ल'सोबत अक्षय कुमारच्या मुलाचे फोटो व्हायरलImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Jan 09, 2023 | 8:13 AM

मुंबई: बॉलिवूड सेलिब्रिटींसोबतच त्यांची मुलं सोशल मीडियावर बरीच चर्चेत असतात. स्टारकिड्सचे लूक, त्यांच्या मित्रमैत्रिणी, खासगी आयुष्य याविषयी जाणून घेण्यासाठी चाहते फार उत्सुक असतात. बॉलिवूडचा खिलाडी अर्थात अभिनेता अक्षय कुमारचा मुलगा आरव सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चेत आहे. यामागचं कारण म्हणजे मिस्ट्री गर्लसोबत व्हायरल झालेले आरवचे फोटो. या फोटोंमध्ये आरवसोबत दिसत असलेली ही तरुणी कोण, असा प्रश्न नेटकऱ्यांना पडला आहे. विशेष म्हणजे तिच्या सौंदर्याचीही तेवढीत चर्चा होत आहे.

नाओमिका नावाच्या या तरुणीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर आरवसोबतचे फोटो पोस्ट केले आहेत. हा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. या सेल्फी फोटोमध्ये आरवने निळ्या रंगाचा शर्ट आणि गळ्यात नेकलेस घातला आहे. तर नाओमिकाने पांढऱ्या रंगाचा फ्लोरल टॉप आणि त्यावर गळ्यात नेकलेस घातला आहे.

हे सुद्धा वाचा

या दोघांच्या फोटोंवर नेटकऱ्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. ‘मला वाटतं की या दोघांनी अभिनयविश्वात पदार्पण करावं’, असं एकाने लिहिलं. तर ‘दोघांचे डोळे खूपच सुंदर आहेत’ अशा शब्दांत दुसऱ्या युजरने कौतुक केलं.

View this post on Instagram

A post shared by Naomika Saran (@naomika14)

कोण आहे ही मिस्ट्री गर्ल?

आरवसोबतच्या या फोटोमधील ही तरुणी त्याची चुलत बहीण आहे. नाओमिका सरन असं तिचं नाव आहे. नाओमिका ही ट्विंकल खन्नाची बहीण आणि अभिनेत्री रिंकी खन्नाची मुलगी आहे. ती 18 वर्षांची आहे तर आरव 20 वर्षांचा आहे. रिंकीने बॉलिवूडमध्ये काम केलं होतं.

1999 मध्ये ‘प्यार में कभी कभी’ या चित्रपटातून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. त्यानंतर तिने ‘जिस देश में गंगा रहता है’ आणि ‘मुझे कुछ कहना है’ यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केलं. मात्र गेल्या बऱ्याच काळापासून ती बॉलिवूडपासून दूर आहे. रिंकीने 2003 मध्ये व्यावसायिक समीर सरनशी लग्न केलं. 2004 मध्ये नाओमिकाचा जन्म झाला.

उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.