प्रसिद्ध सेलिब्रिटी किड्सचं घराणेशाहीवर मोठं वक्तव्य; म्हणाली, ‘संधी मिळू शकते, पण…’

अनेकदा सेलिब्रिटी किड्स असल्यामुळे सेलिब्रिटींनी टीकाचा सामना देखील करावा लागला.... 'या' सेलिब्रिटी किड्सचं घराणेशाहीवर मोठं वक्तव्य...

प्रसिद्ध सेलिब्रिटी किड्सचं घराणेशाहीवर मोठं वक्तव्य; म्हणाली, 'संधी मिळू शकते, पण...'
Follow us
| Updated on: Apr 21, 2023 | 6:00 PM

मुंबई : गेल्या काही वर्षांमध्ये अनेक सेलिब्रिटी किड्सने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आहे. अभिनेत्री आलिया भट्ट, सारा अली खान, जान्हवी कपूर, वरुण धवन यांसारख्या सेलिब्रिटी किड्सच्या चर्चा कायम रंगलेल्या असतात. अनेकदा सेलिब्रिटी किड्स असल्यामुळे सेलिब्रिटींनी टीकाचा सामना देखील करावा लागला. एवढंच नाही तर, सेलिब्रिटी किड्सच्या सिनेमांवर अनेकांनी टीका केली. आता देखील एका प्रसिद्ध सिलेब्रिटीच्या मुलीने घराणेशाहीबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे. ‘जवानी जानेमन’ या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी अभिनेत्री पूजा बेदी हिची मुलगी अलाया एफने (Alaya F) हिने घारणेशाहीवर मोठं वक्तव्य केलं आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त अलाया एफने (Alaya F) हिचीच चर्चा रंगत आहे.

एका मुलाखतीत अलाया म्हणाली, ‘माझा लोकांनी कायम नेपोकिड म्हणून उल्लेख केला आहे. सेलिब्रिटी किड असल्यामुळे मला बॉलिवूडमध्ये संधी मिळाली आहे. पण मिळालेल्या संधीसोबत अनेक जबाबदाऱ्यांचा देखील सामना करावा लागतो. विशेषाधिकार मिळाल्यामुळे सुरुवातीला अनेक गोष्टी आपल्यासाठी सोप्या असतात हे सत्य आहे..’

पुढे अभिनेत्री म्हणाली, ‘घराणेशाहीमुळे बॉलिवूडमध्ये संधी मिळू शकेत. पण यश तुमच्या मेहमतीवर आणि नशीबावर अवलंबून असतं. मी लोकांची विचारसरणी बदलू शकत नाही पण माझी कौटुंबिक पार्श्वभूमी तशीच राहील. मी माझ्या कामात काही बदल नक्कीच घडवून आणू शकते. माझे काम माझ्यासाठी अधिक महत्त्वाचं आहे.’

हे सुद्धा वाचा

‘जर मी माझ्या कामात कोणत्याही प्रकराची तडजोड केली, तर मला प्रचंड दुःख होईल. म्हणून मी माझ्या कामावर अधिक लक्ष देते. नेपो किड म्हणण्याऐवजी माझ्या मेहनतीने लोक मला ओळखतील… या प्रयत्नात मी आहे…’ असं देखील अभिनेत्री म्हणाली. अभिनेत्री अलाया एफने (Alaya F) २०२० मध्ये ‘जवानी जानेमन’ या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. त्यानंतर तिने कधीही मागे वळून पाहिलं नाही.

अलाया लवकरच ZEE5 वरील ‘यू टर्न’ सिनेमाच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस येणार आहे. सिनेमात अलाया हिच्यासोबत अभिनेत्री समंथा रुथ प्रभू देखील महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार आहे. सध्या अलाया आगामी ‘यू टर्न’ सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. सध्या सर्वत्र ‘यू टर्न’ सिनेमाची चर्चा रंगली आहे.

अलाया फक्त अभिनय क्षेत्रात नाही तर, सोशल मीडियावर देखील सक्रिय आहे. सोशल मीडियावर तिच्या फोटो आणि व्हिडीओची कायम चर्चा रंगत असते. आलायाच्या प्रत्येक पोस्टवर चाहते कमेटं आणि लाईक्सचा वर्षाव देखील करत असतात.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.