मिर्झापूर 2 मुळे अली फजलचा ‘भाव वाढला’, आता नव्या प्रोजेक्टसाठी घेतोय मोठं मानधन!

मिर्झापूर (Mirzapur) या वेब सीरीजने अल्पावधीच प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. चाहते पहिल्या आणि दुसऱ्या हंगामानंतर आता तिसऱ्या हंगामाची आतुरतेने वाट पाहत आहेत.

मिर्झापूर 2 मुळे अली फजलचा 'भाव वाढला', आता नव्या प्रोजेक्टसाठी घेतोय मोठं मानधन!
Follow us
| Updated on: Jan 05, 2021 | 7:15 PM

मुंबई : मिर्झापूर (Mirzapur) या वेब सीरीजने अल्पावधीच प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. चाहते पहिल्या आणि दुसऱ्या हंगामानंतर आता तिसऱ्या हंगामाची आतुरतेने वाट पाहत आहेत. या वेब सीरीजमध्ये गुड्डू भैयाचे पात्र चाहत्यांना अधिकच आवडले आहे. ज्यानंतर अली फजलची (Ali Fazal)  मागणी खूप वाढली आहे. यामुळे अली फजलच्या फिमध्ये मोठी वाढ करण्यात आली आहे.(Ali Fazal’s honorarium increased by 30 to 40 per cent due to Mirzapur 2)

अलीने त्याच्या फिमध्ये जवळपास 30 टक्कांपेक्षाही अधिक वाढवली आहे. एका सूत्राने सांगितले की, “मिर्झापूरमध्ये अली फजलने चमकदार कामगिरी केली. यामुळे अलीने एक चांगले स्थान निर्माण केले आहे. त्यामुळे त्याची फी वाढणे निश्चितच होते. सुमारे 30-40% फी त्याने वाढविली आहे. अली फजलने बॉलिवूडसह हॉलिवूडमध्येही आपले स्थान निर्माण केले आहे. अली गद्दार, आर्मी हॅमर, केनेथ ब्रेनाग आणि कलाकारांसमवेत तो हॉलिवूड चित्रपट केनेथ ब्रेनागच्या ‘डेथ ऑन द नाईल’ मध्ये दिसणार आहे. याशिवाय अली फुकरे 3 देखील दिसणार आहे.

‘मिर्झापूर 2’मध्ये पंकज त्रिपाठी, दिव्येंदु शर्मा, श्वेता त्रिपाठी, अली फजल या कलाकारांच्या अभिनयाने प्रेक्षकांना पुन्हा एकदा भुरळ पाडली होती. कथेत रंजकता आणण्यासाठी दुसऱ्या पर्वात काही नवीन कलाकार देखील घेतले होते.. ‘मिर्झापूर’ प्रमाणेच ‘मिर्झापूर 2’मध्येही कालीन भैय्याच्या जादूने प्रेक्षक खुर्चीशी खिळून राहिले होते. ‘मिर्झापूर 2’ प्रदर्शित झाल्यांनतर सोशल मीडियावरदेखील या वेब सीरीजची हवा पाहायला मिळाली होती.

पहिल्या पर्वाच्या शेवटच्या भागात मुन्ना त्रिपाठीने,  बबलू पंडित आणि स्वीटी यांना ठार मारले होते. गुड्डू पंडित आणि गोलू हे दोघे अद्याप जिवंत होते. यांच्या जिवंत असण्यामुळेच आता मिर्झापूरमध्ये सुडाच्या भावनेने सगळा गदारोळ माजणार आहे. मुन्ना आणि त्याचे वडील कालीन भैय्या यांच्याकडून गुड्डू पंडित, भाऊ आणि त्याची पत्नी यांच्या हत्येचा बदला घेणार असे दाखवण्यात आले होते.

संबंधित बातम्या : 

Kangana Ranaut | ‘मिर्झापूर 2’ बघून निकिता तोमर हत्याकांड घडल्याचा दावा, कंगना रनौतची पुन्हा बॉलिवूडवर टीका!

Mirzapur 2 Controversy | ‘मिर्झापूर 2’ पुन्हा वादात अडकण्याची शक्यता, प्रसिद्ध लेखकाकडून कायदेशीर कारवाईचा इशारा!

(Ali Fazal’s honorarium increased by 30 to 40 per cent due to Mirzapur 2)

ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.