बिग बॉसच्या घरात गर्लफ्रेंडशी लग्न करण्याचा अभिनेत्याचा पश्चात्ताप; म्हणाला “स्वत:लाच चाबकाने मारून घ्यावंसं..”

घटस्फोटाच्या पाच वर्षांनंतर 2016 मध्ये अलीने अनम मर्चंटशी लग्न केलं. मात्र त्याचं दुसरं लग्नसुद्धा फार काळ टिकलं नाही. 2021 मध्ये त्याने अनमलाही घटस्फोट दिला. दुसऱ्या लग्नाविषयी त्याने सांगितलं, "ते आमचं अरेज्ड मॅरेज होतं. या लग्नातसुद्धा एकमेकांच्या पसंत-नापसंतीविषयी बरेच मतभेद होते."

बिग बॉसच्या घरात गर्लफ्रेंडशी लग्न करण्याचा अभिनेत्याचा पश्चात्ताप; म्हणाला स्वत:लाच चाबकाने मारून घ्यावंसं..
Ali Merchant, Sara KhanImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Jun 16, 2023 | 3:52 PM

मुंबई : अभिनेता आणि डीजे अली मर्चंटला बिग बॉस या शोमुळे खूप प्रसिद्धी मिळाली. 2011 मध्ये बिग बॉसच्या चौथ्या सिझनमध्ये त्याने भाग घेतला होता. विशेष म्हणजे हे सिझन बिग बॉसच्या घरातील एका लग्नामुळे गाजलं होतं. अली मर्चंटने प्रसिद्ध टेलिव्हिजन अभिनेत्री सारा खानशी बिग बॉसच्या घरात लग्न केलं होतं. मात्र त्याच्या काही महिन्यांनंतर लगेचच दोघांचा घटस्फोट झाला. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तो लग्नाविषयी मोकळेपणे व्यक्त झाला. यावेळी त्याने सारा खानशी लग्न करण्याचा पश्चात्ताप होत असल्याचं म्हटलं आहे. “आज मी जेव्हा त्या क्षणांचा विचार करतो, तर मला स्वत:लाच चाबकाने मारून घ्यावंसं वाटतं”, असं वक्तव्य अली मर्चंटने केलं आहे.

लग्नाविषयी तो पुढे म्हणाला, “ती सर्वांत मूर्खपणाची गोष्ट होती. त्या नात्यात एकमेकांविषयी समजुतदारपणा नव्हता, सामंजस्य नव्हतं. आम्ही एकमेकांविषयी नीट विचार न करताच लग्नबंधनात अडकलो होतो. शो संपल्यानंतर लगेचंच आम्हीसुद्धा विभक्त झालो. कारण लग्नाचा निर्णयच आम्ही खूप घाईत घेतला होता. 2011 याच वर्षी आम्ही घटस्फोट घेतला.”

हे सुद्धा वाचा

घटस्फोटाच्या पाच वर्षांनंतर 2016 मध्ये अलीने अनम मर्चंटशी लग्न केलं. मात्र त्याचं दुसरं लग्नसुद्धा फार काळ टिकलं नाही. 2021 मध्ये त्याने अनमलाही घटस्फोट दिला. दुसऱ्या लग्नाविषयी त्याने सांगितलं, “ते आमचं अरेज्ड मॅरेज होतं. या लग्नातसुद्धा एकमेकांच्या पसंत-नापसंतीविषयी बरेच मतभेद होते. त्याचवेळी मी माझ्या करिअरवर लक्ष केंद्रीत करत होतो, मात्र आर्थिक समस्या वारंवार उद्भवत होत्या. त्यामुळे आम्ही दोघांनी एकमेकांच्या समंतीने विभक्त होण्याचा निर्णय घेतला.”

View this post on Instagram

A post shared by Sara Khan (@ssarakhan)

दोन घटस्फोटानंतरही अली मर्चंटने आयुष्यात जोडीदार असावा, अशी इच्छा व्यक्त केली आहे. “प्रत्येकाला साथीदाराची गरज असते. सध्या मी माझ्या करिअरमध्ये चांगलं काम करतोय. अभिनेत्यासोबत मी डीजेसुद्धा आहे. त्याचसोबत मी संगीत निर्मातासुद्धा झालोय. आता मला अशा एका रिलेशनशिपमध्ये राहायचं आहे, जिथे मी आणि माझी पार्टनर एकमेकांना समजून घेऊ शकू. आमच्यात चांगला संवाद असेल”, असं तो म्हणाला.

गेल्या काही वर्षांत अली मर्चंटने ओटीटीवरही काम केलं. ‘लिबास’ या वेब सीरिजमध्ये तो नुकताच झळकला होता. टीव्ही मालिकांपेक्षा वेब सीरिजमध्ये काम करायला आवडत असल्याचं त्याने स्पष्ट केलं. त्याने आतापर्यंत ‘विक्रम बेताल की रहस्य गाथा’, ‘बंदिनी’, ‘आहट’ आणि ‘शपथ’ यांसारख्या मालिकांमध्ये भूमिका साकारल्या आहेत.

'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.