Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Alia Bhatt: आलिया भट्ट दुसऱ्यांदा गरोदर? राहा कपूरला भेटणार छोटा भाऊ किंवा बहीण?

आलियाने नुकताच इन्स्टाग्रामवर एक फोटो पोस्ट केला आहे. या फोटोचं कॅप्शन वाचून चाहत्यांना तिच्या गरोदरपणावरून प्रश्न पडला आहे.

Alia Bhatt: आलिया भट्ट दुसऱ्यांदा गरोदर? राहा कपूरला भेटणार छोटा भाऊ किंवा बहीण?
Alia BhattImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Jan 18, 2023 | 1:02 PM

मुंबई: अभिनेता रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांनी गेल्या वर्षी एप्रिलमध्ये लग्नगाठ बांधली. लग्नाच्या दोन महिन्यांनंतर जूनमध्ये आलियाने गरोदर असल्याचं जाहीर केलं. नोव्हेंबर 2022 मध्ये तिने मुलगी राहा कपूरला जन्म दिला. 6 जानेवारी 2023 रोजी रणबीर-आलियाची मुलगी दोन महिन्यांची झाली. आतापर्यंत त्यांनी राहाचा चेहरा चाहत्यांना दाखवलेला नाही. आलियाने नुकताच इन्स्टाग्रामवर एक फोटो पोस्ट केला आहे. या फोटोचं कॅप्शन वाचून चाहत्यांना तिच्या गरोदरपणावरून प्रश्न पडला आहे.

इन्स्टाग्रामवर पोस्ट केलेल्या या फोटोमध्ये आलियाच्या हातात फूल पहायला मिळतंय. आलियाने दोन फुलं अशा पद्धतीने हातात धरलं आहे, ज्यावरून ती ‘2’ हा आकडा दाखवण्याचा प्रयत्न करतेय, असा अंदाज वर्तवला जात आहे. यासोबतच तिने कॅप्शनमध्ये लिहिलं आहे, ‘2.0 स्टे ट्युन्ड’.

हे सुद्धा वाचा

फोटो आणि या खास कॅप्शनमुळे आलिया पुन्हा एकदा गरोदर आहे का, असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. ‘दुसरं बाळ येणार आहे का’, असा सवाल एका युजरने केला. तर ‘ब्रह्मास्त्र 2.0’ची घोषणा होणार आहे का, असं दुसऱ्याने म्हटलंय. नेमकी कोणती घोषणा करणार आहेस, याची फार उत्सुकता आहे, असंही नेटकऱ्यांनी कमेंट बॉक्समध्ये लिहिलं आहे.

View this post on Instagram

A post shared by Alia Bhatt ? (@aliaabhatt)

राहाच्या जन्मानंतर दिलेल्या पहिल्या मुलाखतीत आलिया मातृत्वाबद्दल व्यक्त झाली होती. “अवघ्या काही दिवसांत मातृत्वाच्या भावनेनं माझ्यात खूप काही बदल आणले आहेत,” असं ती म्हणाली होती.

आई झाल्यानंतर चित्रपटांच्या निवडीवर काही परिणाम होईल का, असाही प्रश्न तिला या मुलाखतीत विचारण्यात आला होता. त्यावर उत्तर देताना ती पुढे म्हणाली, “ही गोष्ट माझ्या दृष्टीकोनालाही बदलणारी आहे. पहिल्यापेक्षा आता माझं मन खूप मोकळं झालंय असं मला वाटतं. मला माहीत नाही की काय बदल होतील, पण पुढे काय होईल हे पहायला मला आवडेल. या प्रवासासाठी मी खूपच उत्सुक आहे.”

कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला.
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी.
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण.
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार.
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार.
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात.
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत.
दिक्षाभूमीला वंदन करून अभिप्राय वहीत पंतप्रधानांनी दिला विशेष संदेश
दिक्षाभूमीला वंदन करून अभिप्राय वहीत पंतप्रधानांनी दिला विशेष संदेश.
पंतप्रधान मोदींचा नागपूर दौरा; आरएसएसच्या मुख्यालयाला दिली भेट
पंतप्रधान मोदींचा नागपूर दौरा; आरएसएसच्या मुख्यालयाला दिली भेट.
हरीभाऊ बागडेंच्या हेलिकॉप्टरला अपघात; व्हिडिओ व्हारायल
हरीभाऊ बागडेंच्या हेलिकॉप्टरला अपघात; व्हिडिओ व्हारायल.