Alia bhatt हिची सर्वांसमोर चप्पल उचलणं रणबीर कपूरला पडलं महागात; व्हिडीओ तुफान व्हायरल

रणबीर कपूर याने सर्वांसमोर उचलली पत्नी आलियाची चप्पल, त्यानंतर चाहत्यांनी उपस्थित केले असे प्रश्न, सध्या सर्वत्र आलिया आणि रणबीर यांच्या व्हिडीओची चर्चा..

Alia bhatt हिची सर्वांसमोर चप्पल उचलणं रणबीर कपूरला पडलं महागात; व्हिडीओ तुफान व्हायरल
Follow us
| Updated on: Apr 22, 2023 | 3:36 PM

मुंबई : बॉलिवूडमध्ये अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री आलिया भट्ट यांची ओळख बेस्ट कपल म्हणून आहे. अनेक वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर रणबीर आणि आलिया यांनी गेल्या वर्षी लग्न केलं. त्यांना एक मुलगी देखील आहे. आलिया आणि रणबीर यांना अनेक ठिकाणी एकत्र स्पॉट करण्यात येतं. शिवाय दोघांचे अनेक फोटो आणि व्हिडीओ देखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असतात. नुकताच दोघे पामेला चोप्रा यांच्या निधनानंतर आदित्य चोप्रा यांच्या घरी पोहोले होते. याचदरम्यानचा आलिया आणि रणबीर यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. त्यांच्या व्हिडीओवर अनेकांनी लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव देखील केला आहे.

रणबीर कपूर आणि आलिया भट्ट शुक्रवारी संध्याकाळी आदित्य चोप्रा याच्या घरी पोहोचले होते. दोघेही अतिशय कॅज्युअल लूकमध्ये दिसले. आलियाने पांढरा लखनवी कुर्ता घातला होता तर रणबीर पांढऱ्या टी-शर्ट आणि निळ्या जीन्समध्ये दिसला. घरात प्रवेश करण्यापूर्वी आलियाने दाराच्या पायरीवरची चप्पल काढली. आलियाने दारात चप्पल काढल्यामुळे रणबीरने तिची चप्पल उचलली आणि आतल्याबाजूला ठेवली.

हे सुद्धा वाचा

आलिया आणि रणबीर कपूर यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. सध्या सर्वत्र दोघांच्या व्हिडीओची चर्चा आहे. व्हिडीओ पाहिल्यानंतर काही नेटकरी अभिनेत्याचं कौतुक करत आहेत, तर काहींनी मात्र अभिनेत्यावर निशाणा साधला आहे. सोशल मीडियावर अनेकांनी आलिया आणि रणबीर यांचा बेस्ट कपल म्हणून उल्लेख केला आहे. सध्या सर्वत्र आलिया आणि रणबीर यांचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

एक नेटकरी दोघांच्या व्हायरल व्हिडीओवर कमेंट करत म्हणाला, ‘चप्पल चोरीला गेली तर, पतीचं नुकसान होईल… तो स्मार्ट आहे…’ अन्य एक युजर कमेंट करत म्हणाला, ‘चप्पल चोरीला गेली तर…’ आलिया आणि रणबीर कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. सोशल मीडियावर कायम दोघांची चर्चा रंगलेली असते.

आलिया आणि रणबीर यांच्याबद्दल सांगायचं झालं तर, दोघांच्या लग्नाला एक वर्ष पूर्ण झालं आहे. ‘ब्रह्मास्त्र’ सिनेमाच्या शुटिंग दरम्यान दोघांमध्ये प्रेम बहरलं. अनेक वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर १४ एप्रिल २०२२ मध्ये आलिया आणि रणबीर यांनी लग्न केलं. लग्नानंतर ६ नोव्हेंबर रोजी अभिनेत्रीने गोंडस मुलीला जन्म दिला. त्यांच्या मुलीचं नाव राहा कपूर असं आहे.

'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.