Anant Ambani Wedding : अंबानी कुटुंबियांसाठी रणबीर – आलिया करणार मोठं काम, व्हिडीओ व्हायरल
Anant Ambani Wedding : अनंत अंबानी यांच्या लग्नासाठी बॉलिवूड सज्ज, अंबानी कुटुंबियांसाठी आलिया - रणबीर पोहोचले 'या' ठिकाणी, व्हिडीओ तुफान व्हायरल... सोशल मीडियावर सध्या फक्त आणि फक्त रणबीर - आलिया यांची चर्चा
मुंबई | 6 फेब्रुवारी 2024 : देशातील सर्वात श्रीमंत उद्योजक मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांचा लहान मुलगा अनंत अंबानी यांचं लवकरच लग्न होणार आहे. अनंत अंबानी आणि राधिकी मर्चेंट यांच्या लग्नाची तयारी मोठ्या जोमात सुरु आहे. अनंत अंबानी आणि राधिका मर्चेंट यांचं लग्न मार्च महिन्यात होणार आहे. दरम्यान, अनंत अंबानी यांच्या लग्नाबद्दल आणि लग्नापूर्वीच्या विधींबद्दल अनेक अपडेट समोर येत आहेत. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त अनंत अंबानी आणि राधिकी मर्चेंट यांच्या लग्नाची चर्चा सुरु आहे.
अनंत अंबानी आणि राधिकी मर्चेंट यांच्या लग्नात अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री आलिया भट्ट् भन्नाट डान्स करणार आहेत. सोशल मीडियावर आलिया – रणबीर यांचा एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये दोघांसोबत अनंत अंबानी देखील दिसत आहे. व्हिडीओवर चाहते लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत आहेत.
View this post on Instagram
अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा विवाह पुढील महिन्यात मार्चमध्ये आहे. दोघांच्या प्री-वेडिंग सोहळ्याची पत्रिका देखील समोर आली आहेत. अनंत-राधिका यांचे प्री-वेडिंग फंक्शन्स 1 ते 3 मार्च दरम्यान गुजरातमधील जामनगरमध्ये होणार आहेत. आलिया आणि रणबीरही गुजरात याठिकाणी पोहोचले आहेत.
दरम्यान, आलिया आणि रणबीर दोघे अनंत आणि राधिका यांच्या प्री-वेडिंग फंक्शनमध्ये दमदार परफॉर्म करतील अशी देखील चर्चा रंगली आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त अनंत आणि राधिका आणि आलिया आणि रणबीर यांच्या व्हिडीओची चर्चा रंगली आहे. चाहते व्हिडीओवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत आहेत.
शनिवारी संध्याकाळी रणबीर आणि आलिया यांनी मुंबई विमानतळावर स्पॉट करण्यात आलं. इन्स्टाग्रामवर रणबीर कपूरच्या फॅन पेजने हा व्हिडिओ शेअर केला आहे. रणबीर आणि आलिया हे सध्या बॉलिवूडमधील सर्वात लोकप्रिय कपल आहेत. दोघांचा रोमान्स आणि केमिस्ट्री सगळ्यांनाच आवडते.
आलिया रणबीर यांच्या आगामी सिनेमांबद्दल सांगायचं झालं तर, आलिया ‘जिगरा’ सिनेमाच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस येणार आहे. रणबीर कपूर Animal सिनेमानंतर ‘रामायण’ आणि ‘लव एंड वॉर’ सिनेमातून चाहत्याचं मनोरंजन करणार आहे..