आलिया भट्टची परदेशात गडगंज संपत्ती, महागडं कार कलेक्शन, अनेक व्यवसाय आणि बरंच काही…

Alia Bhatt | वयाच्या 31 व्या वर्षी आलिया भट्ट गडगंज संपत्तीची मालकीण... परदेशात संपत्ती, मुंबईत आलिशान घरे, कार कलेक्शन, अंबानींसोबत व्यवसाय... आलियाच्या संपत्तीचा आकडा थक्क करणारा... सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त आलिया भट्ट हिच्या संपत्तीची चर्चा...

आलिया भट्टची परदेशात गडगंज संपत्ती, महागडं कार कलेक्शन, अनेक व्यवसाय आणि बरंच काही...
Follow us
| Updated on: Mar 15, 2024 | 10:46 AM

मुंबई | 15 मार्च 2024 : अभिनेत्री आलिया भट्ट हिला आज कोणत्याही ओळखीची गरज नाही. फार कमी काळात आलियाने बॉलिवूडमध्ये स्वतःचं स्थान पक्क केलं आहे. आज आलिया हिचा वाढदिवस असल्यामुळे सर्वत्र फक्त आणि फक्त आलिया हिची चर्चा रंगली आहे. सांगायचं झालं तर, आलियाने बॉलिवूडमध्ये स्वतःचे वेगळी ओळख तर निर्माण केलीच आहे. पण वयाच्या 31 व्या आलिया गडगंज संपत्तीची मालकीण झालं आहे. फक्त भारतात नाहीतर, परदेशात देखील आलिया हिची संपत्ती आहे.

रिपोर्टनुसार, एका सिनेमासाठी आलिया जवळपास 10 कोटी मानधन घेते. शिवाय जाहिराती आणि अन्य व्यवसायातून देखील अभिनेत्री गडगंज पैसा कमावते. भारतातील श्रीमंत अभिनेत्रींच्या यादीत आलिया भट्ट हिचं नाव अव्वल स्थानी आहे. आलिया भट्ट हिचे संपत्ती 517 कोटी रुपये आहे. आज आलिया तिच्या कुटुंबासोबत रॉयल आयुष्य जगते.

परदेशातील आलिया भट्ट हिची संपत्ती…

एका मुलाखतीत आलियाने लंडन याठिकाणी स्वतःचं घर घेण्याची इच्छा व्यक्त केली होती. 2018 मध्ये आलियाने परदेशात स्वतःचं आलिशान घर घेण्याचं स्वप्न पूर्ण केलं आहे. लंडनच्या कोव्हेंट गार्डनमध्ये 25 कोटी रुपयांचे घर खरेदी करत आलियाने स्वतःचं स्वप्न पूर्ण केलं आहे.

हे सुद्धा वाचा

2020 मध्ये कोविड-19 साथीच्या काळात आलियाने बांद्रा येथे घर खरेदी केलं. ज्याची किंमत सुमारे 40 कोटी रुपये आहे. तिचे घर वास्तू पाली हिल्स कॉम्प्लेक्सच्या पाचव्या मजल्यावर आहे, त्याच बिल्डिंगमध्ये सातव्या मजल्यावर आलियाचा पती-अभिनेता रणबीर कपूर याचंही घर आहे. आलियाचे जुहू येथे दुसरे घर आहे, जेथे तिची बहीण राहते.

आलिया भट्ट हिचं कार कलेक्शन

आलिया फक्त 3 आलिशान घरांची मालकीण नाही तर तिच्याकडे आलिशान कारचं कलेक्शनही आहे. अभिनेत्रकडे अडीच कोटी रुपयांची रेंज रोव्हर आणि बीएमडब्ल्यू 7 सीरिज आहे. तिच्याकडे तीन ऑडी देखील आहेत, त्यापैकी दोन एसयूव्ही आहेत आणि दुसरी सेडान ऑडी A6 आहे.

आलिया भट्ट हिचे व्यवसाय

आलिया भट्ट हिने उद्योग विश्वात देखील पदार्पण केलं आहे. आलिया ॲड-मम्मा नावाच्या प्रसिद्ध कपड्यांच्या ब्रँडची मालकीण आहे. एवढंच नाहीतर, कपड्यांच्या व्यवसायासाठी आलियाने ईशा अंबानी यांच्यासोबत हात मिळवणी केली आहे. आलिया भट्ट 2019 पासून इटर्नल सनशाइन प्रॉडक्शन नावाच्या प्रॉडक्शन हाऊसच्या मालकीची आहे. आलिया कायम तिच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यामुळे चर्चेत असते.

'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट.
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?.
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक.
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला.
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह.
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट.
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले.
धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांवर अजित पवार कधी मौन सोडणार?
धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांवर अजित पवार कधी मौन सोडणार?.
सुरेश धस यांनी अजितदादांकडे धनंजय मुंडेंचे नेमके कोणते पुरावे दिले?
सुरेश धस यांनी अजितदादांकडे धनंजय मुंडेंचे नेमके कोणते पुरावे दिले?.
वाल्मिक कराडमागे ईडीचाही फेरा? संपत्तीवरून सुरेश धसांचे आरोप काय?
वाल्मिक कराडमागे ईडीचाही फेरा? संपत्तीवरून सुरेश धसांचे आरोप काय?.