राहा नंतर दुसऱ्यांदा आई होण्यावर आलिया भट्ट म्हणाली…, कपूर कुटुंबात येणार नवा पाहुणा?

Alia Bhatt on second baby: कपूर कुटुंबात येणार नवा पाहुणा? आलिया भट्ट हिच्या एका वक्तव्याने चाहते अवाक्... लेक राहा हिच्या जन्मानंतर आलिया भट्ट हिचं दुसऱ्यांदा आई होण्यावर वक्तव्य..., सर्वत्र आलिया हिच्या खासगी आयुष्याच्या चर्चा...

राहा नंतर दुसऱ्यांदा आई होण्यावर आलिया भट्ट म्हणाली..., कपूर कुटुंबात येणार नवा पाहुणा?
Follow us
| Updated on: Oct 12, 2024 | 11:06 AM

अभिनेत्री आलिया भट्ट हिने फार कमी वेळात बॉलिवूडमध्ये स्वतःचं स्थान निर्माण केलं आहे. आलियाचा प्रत्येक सिनेमा पाहण्यासाठी चाहते चित्रपटगृहात मोठी गर्दी करतात. आता देखील आलियाचा ‘जिगरा’ सिनेमा लवकरच चाहत्यांच्या भेटीस येणार आहे. अभिनेत्री सध्या सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. पण सिनेमाच्या प्रमोशन दरम्यान अभिनेत्रीने केलेलं वक्तव्य सध्या तुफान चर्चेत आलं आहे. आलियाने दुसऱ्या बाळाबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे. त्यामुळे कपूर कुटुंबात पुन्हा नव्या पाहुण्याचं आगमन होणार का? अशी चर्चा देखील चाहत्यांमध्ये रंगली आहे.

आलिया भट्ट म्हणाली, ‘अपेक्षा आहे की आणखी सिनेमांमध्ये काम करू. फक्त अभिनेत्री म्हणून नाही तर, निर्माती म्हणून देखील काम करायचं आहे. योजनेत आणखी मुलं, वेग-वेगळ्या जागांवर फिरायला जायचं आहे. स्वस्थ, आनंदी, शांत आणि निसर्गाने भरलेले जीवन… या सर्व गोष्टी हव्या आहेत…’

दरम्यान, दुसऱ्या बाळाच्या वक्तव्यानंतर आलिने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. आलिया हिच्या खासगी आयुष्याबद्दल सांगायचं झालं तर, अनेक वर्ष अभिनेता रणबीर कपूर याला डेट केल्यानंतर आलियाने अभिनेत्यासोबत लग्न केलं एप्रिल 2022 मध्ये आलिया – रणबीर यांनी लग्न केलं आणि नोव्हेंबर 2022 मध्ये लेक राहा कपूर हिचं जगात स्वागत केलं.

मुलीच्या जन्मानंतर आलिया – रणबीर यांनी लेक राहा हिचा चेहरा चाहत्यांना दाखवला नव्हता. पण जेव्हा आलिया – रणबीर यांनी राहाचा चेहरा चाहत्यांना दाखवला तेव्हापासून सर्वत्र फक्त आणि फक्त राहा हिच्या क्यूटनेसची चर्चा असते. आलिया – रणबीर देखील लेकीबद्दल अनेक गोष्टी चाहत्यांना सांगत असतात.

लेक राहाला कोणाता सिनेमा दाखवणार आलिया?

आलिया म्हणाली, ‘मला असं वाटतं ‘स्टूडेंट ऑफ द ईयर’ सिनेमा मला राहाला दाखवायला आवडेल. माझा पहिला सिनेमा आहे. सिनेमातील माझं अभिनय मला फार आवडलं नाही. पण सिनेमात गाणी भरपूर आहेत. त्यामुळे मला असं वाटतं माझ्या लेकीला सिनेमा आवडेल.’

हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार
हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार.
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार.
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?.
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे.
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर...
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर....
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल.
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर.
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला.
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी.
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं.