Alia Bhatt | ‘नो फोटो पॉलिसी’नंतर देखील आलियाच्या लेकीची पहिली झलक समोर! पाहा व्हिडीओ
आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांच्या मुलीची पहिली झलक समोर ! आलियाच्या कडेवर दिसली राहा कपूर... क्यूट व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्हीही म्हणाल...
मुंबई : बॉलिवूडमध्ये सध्या प्रत्येक सेलिब्रिटी त्यांच्या मुलांसाठी ‘नो फोटो पॉलिसी’ कायम ठेवत आहे. अभिनेत्री अनुष्का शर्मा, सोनम कपूर यांच्यासोबतच अभिनेत्री आलिया भट्ट आणि अभिनेता रणबीर कपूर यांनी देखील त्यांच्या मुलीसाठी ‘नो फोटो पॉलिसी’ कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. पण ‘नो फोटो पॉलिसी’नंतर देखील आलियाची लेक राहा कपूर हिचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये राहा आई आलियाच्या कडेवर दिसत आहे. सध्या सर्वत्र आलिया आणि राहाच्या व्हिडीओची चर्चा रंगत आहे. व्हिडीओमध्ये आलिया भट्ट हिने पांढऱ्या रंगाचा टीशर्ट घातला असून लेक राहाचा चेहरा लपवत जाताना दिसत आहे. सध्या सर्वत्र आलिया आणि राहा यांच्या व्हिडीओची चर्चा रंगत आहे. आलिया आणि रणबीर यांच्या लेकीचा व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या तुफान व्हायरल होत आहे. शिवाय चाहते व्हिडीओवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव देखील करत आहेत.
नुकताच आलिया भट्ट हिचे आजोबा नरेंद्रनाथ राजदान यांचं निधन झालं. वयाच्या ९३ व्या वर्षी नरेंद्रनाथ राजदान यांनी अखेरचा श्वास घेतला. नरेंद्रनाथ राजदान यांच्या निधनानंतर घरी परतत असताना आलियाला लेक राहा हिच्यासोबत स्पॉट करण्यात आलं. सध्या सर्वत्र राहा हिची चर्चा होत आहे. राहाच्या जन्मानंतर तिची एक झलक पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.
View this post on Instagram
अभिनेत्री आलिया भट्ट हिने ६ नोव्हेंबर २०२२ मध्ये गोंडस मुलीला जन्म दिला. मुलीच्या जन्मानंतर खास अंदाजात आलिया आणि रणबीर यांनी लेकीचं नाव राहा कपूर ठेवलं. लेकीच्या जन्मानंतर अनेक ठिकाणी आलिया आणि रणबीर त्यांच्या लेकीबद्दल बोलत असतात. आलिया आणि रणबीर हिचा सांभाळ करताना येणारा अनुभव कायम चाहत्यांसोबत शेअर करत असतात.
आलिया आणि रणबीर यांनी १४ एप्रिल २०२२ मध्ये आलिया आणि रणबीर यांनी लग्न केलं. ठराविक पाहुण्यांच्या उपस्थितीत दोघांचा विवाहसोहळा पार पडला. लग्नानंतर दोघांचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले. त्यानंतर लग्नाच्या दोन महिन्यांनंतर आलियाने सोनोग्राफीचा फोटो शेअर करत चाहत्यांना आई होणार असल्याची माहिती दिली.
आलिया हिच्याबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्री बॉलिवूडच्या टॉप अभिनेत्रींपैकी एक आहे. ‘स्टुडंट ऑफ द ईअर’ सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलेल्या आलियाने ‘गंगूबाई काठियावाडी’ पर्यंतचा टप्पा गाठला. अभिनेत्रीच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचं आणि कुटुंबाचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते..