Alia Bhatt | कोणासाराखी दिसते राहा कपूर? आलिया – रणबीर यांच्या लेकीचा खास व्हिडीओ समोर

करीना कपूर हिच्या घरी जाताना आलिया लेक राहा कपूरसोबत झाली स्पॉट.. व्हिडीओ पाहिल्यानंतर चाहते म्हणाले, 'राहा तर हुबेहूब तिच्या...'

Alia Bhatt | कोणासाराखी दिसते राहा कपूर? आलिया - रणबीर यांच्या लेकीचा खास व्हिडीओ समोर
Follow us
| Updated on: Jun 04, 2023 | 1:51 PM

मुंबई | अभिनेत्री अनुष्का शर्मा, सोनम कपूर यांच्यासोबतच अभिनेत्री आलिया भट्ट आणि अभिनेता रणबीर कपूर यांनी देखील त्यांच्या मुलीसाठी ‘नो फोटो पॉलिसी’ कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. पण ‘नो फोटो पॉलिसी’नंतर देखील पापाराझींनी आलियाला लेक राहा कपूर हिच्यासोबत स्पॉट केलं आहे. अभिनेत्री करीना कपूर हिच्या घरी जाताना आलिया आणि राहा यांना कॅमेऱ्यात कैद करण्यात आलं आहे. सध्या आलिया आणि राहाचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेकांनी कमेंट आणि लाईक्सचा वर्षाव केला आहे. सध्या सर्वत्र आलिया आणि राहाच्या व्हिडीओची चर्चा रंगत आहे. लेकीच्या जन्मापासून रणबीर आणि आलियाने लेक राहाचा चेहरा चाहत्यांनी दाखवला नव्हता. पण आता राहाची एक झलक चाहत्यांना पाहता येणार आहे.

आलिया आपल्या मुलीच्या गोपनीयतेची प्रचंड काळजी घेते. त्यामुळे आजपर्यंत राहाचा चेहरा चाहत्यांना दिसला नाही. मात्र याच दरम्यान आलियाचा मुलगी राहासोबतचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये आलिया एका कॅज्युअल लूकमध्ये दिसत आहे आणि तिची मुलगी राहा तिच्या कडेवर आहे. राहासोबत आलिया करीना कपूरच्या घरी जातानाचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

हे सुद्धा वाचा

राहाची एक झलक पाहिल्यानंतर चाहते ‘राहा तर हुबेहूब तिच्या आई सारखी दिसते..’ असं म्हणत आहेत. अभिनेत्री आलिया भट्ट हिने ६ नोव्हेंबर २०२२ मध्ये गोंडस मुलीला जन्म दिला. मुलीच्या जन्मानंतर खास अंदाजात आलिया आणि रणबीर यांनी लेकीचं नाव राहा कपूर ठेवलं. लेकीच्या जन्मानंतर अनेक ठिकाणी आलिया आणि रणबीर त्यांच्या लेकीबद्दल बोलत असतात. आलिया आणि रणबीर हिचा सांभाळ करताना येणारा अनुभव कायम चाहत्यांसोबत शेअर करत असतात.

आलिया आणि रणबीर यांनी १४ एप्रिल २०२२ मध्ये आलिया आणि रणबीर यांनी लग्न केलं. ठराविक पाहुण्यांच्या उपस्थितीत दोघांचा विवाहसोहळा पार पडला. लग्नानंतर दोघांचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले. त्यानंतर लग्नाच्या दोन महिन्यांनंतर आलियाने सोनोग्राफीचा फोटो शेअर करत चाहत्यांना आई होणार असल्याची माहिती दिली.

राहाच्या जन्मानंतर आलिया आणि रणबीर कायम त्यांच्या लेकीबद्दल बोलताना दिसतात. आलिया हिच्याबद्दल सांगायचं झालं तर अभिनेत्री कायम सोशल मीडियावर सक्रिय असते. तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी आलिया कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असते. त्यामुळे आलिया राहासोबत कधी फोटो किंवा व्हिडीओ कधी पोस्ट करते याच प्रतीक्षेत चाहते आहेत.

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.