Alia Bhatt हिच्याकडून तरुणींना मोलाचा सल्ला; म्हणाली, ‘पालकांवर दबाव…’

Alia Bhatt | तुमची मुलगी देखील करते 'या' गोष्टीचा हट्ट? आलिया भट्ट हिने तरुणींना दिला मोलाचा सल्ला... ; वयाच्या १९ व्या वर्षी आलिया हिने अभिनयास सुरुवात केली. तरुणींमध्ये आलिया हिची लोकप्रियता प्रचंड मोठी आहे. अनेक तरुणी आलिया हिला फॉलो करतात.

Alia Bhatt हिच्याकडून तरुणींना मोलाचा सल्ला; म्हणाली, 'पालकांवर दबाव...'
Follow us
| Updated on: Oct 23, 2023 | 2:06 PM

मुंबई | 23 ऑक्टोबर 2023 : अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) हिने बॉलिवूडमध्ये स्वतःचं स्थान भक्कम केलं आहे. प्रत्येक सिनेमात अभिनेत्रीने वेगळी भूमिका साकारत चाहत्यांच्या मनावर राज्य केलं. आज बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी आलिया भट्ट अव्वल स्थानी आहे. वयाच्या १९ व्या वर्षी आलिया हिने अभिनयास सुरुवात केली. आलिया हिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. महत्त्वाचं म्हणजे तरुणींमध्ये आलिया हिची लोकप्रियता प्रचंड मोठी आहे. अनेक तरुणी आलिया हिला फॉलो करतात. एवढंच नाही तर, अनेक तरुणींच्या प्रेरणास्थानी देखील आलिया भट्ट आहे. अशात आलिया हिने तरुणींना एका मोलाचा सल्ला दिला.

सध्या सोशल मीडियावर आलिया भट्ट हिचा एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये आलिया म्हणते, ‘मी लोकांसाठी कधीच तयार होत नाही. दुसरे काय सांगत आहेत यात देखील मला काहीही रस नाही आणि मला ही गोष्ट सतत सांगायची आहे. कारण आता अनेक तरुणींवर प्रभाव पडत असतो. तरुणींना सजायला आवडत आसतं. म्हणून तरुणी आपल्या आई – वडिलांवर दबाव टाकत असतात. मला खरेदी करायची आहे. त्यामुळे मी तरुणींना सांगते असं बिलकूल करु नका.. असं देखील आलिया म्हणाली.

हे सुद्धा वाचा

महत्त्वाची गोष्ट म्हणजे, सेलिब्रिटी त्यांचे कपडे रिपीट करत नाहीत, अशा सर्वत्र चर्चा रंगत आसतात. पण आलिया तिचे एकदा घातलेले कपडे पुन्हा घालते. या गोष्टीचा खुलासा खुद्द अभिनेत्रीने केला होता. सध्या सर्वत्र अभिनेत्रीची चर्चा रंगली आहे. नुकताच आलिया हिला राष्ट्रपती पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं.

पुरस्कार सोहळ्यासाठी देखील अभिनेत्रीने लग्नात नेसलेली साडी पुन्हा नेसली होती. म्हणून आलिया हिने लग्नाची साडी पुन्हा का नेसली? असा प्रश्न अनेकांना पडला होता. अशात चाहत्यांच्या प्रश्नाचं उत्तर खुद्द आलिया हिने सोशल मीडियाच्या माध्यमातून दिलं होतं.

आलिया म्हणाली, ‘एका खास दिवसासाठी खास कपड्यांची गरज असते आणि अनेकदा ते खास कपडे तुमच्याकडे असतात. जे एका दिवसासाठी खास असू शकतात ते अनेकदा देखील खास ठरु शकतात..’ सध्या सर्वत्र आलिया हिच्या पोस्टची चर्चा आहे. आलिया कायम चाहत्यांमध्ये चर्चेत असते.

महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?
महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?.
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य.
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप.
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली.
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला.
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट.
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?.
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक.
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला.
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह.