चाहत्याशी गैरवर्तन; बॉडीगार्डवर भडकली आलिया भट्ट,म्हणाली “हात लावू नका…”
आलिया भट्टचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतं आहे. ज्यामध्ये तिचा बॉडीगार्ड सेल्फी घेण्यासाठी आलेल्या एका चाहत्याशी गैरवर्तन करताना दिसत आहे. हे पाहून नेटकऱ्यांनी मात्र प्रचंड संताप व्यक्त केला आहे.
बॉलिवूड अभिनेत्री आलियाची जबरदस्त फॅन फॉलोइंग आहे. आलीया तिच्या चाहत्यांसोबत नेहमीच आपुलकीने आणि शांतपणे वागताना-बोलताना दिसते. पण सध्या सोशल मीडियावर आलियाचा एक व्हिडिओ चांगलाच चर्चेत आला आहे. या व्हिडिओमध्ये आलियाच्या बॉडीगार्डने एका चाहत्यासोबत केलेले कृत्य पाहून नेटकरी प्रचंड संतापले आहेत. मात्र यावेली आलियानेसुद्धा याबाबत राग व्यक्त केल्याचे दिसून आले.
बॉडीगार्डचे चाहत्याशी गैरवर्तन
आलिया तिच्या टीमसोबत एअरपोर्टवरून बाहेर येत असताना अनेक चाहते तिची एक झलक पाहण्यासाठी तिथे थांबले होते. अनेक जण आलियासोबत सेल्फी घेत होते. आणि ती सर्वांना सेल्फी देतही होती. पण ती पुढे जात असताना अचानक एक चाहता तिच्याजवळ सेल्फी घेण्यासाठी म्हणून येऊ लागला तेव्हा तिच्या बॉडीगार्डने त्याच्यासोबत धक्का मारत गैरवर्तन केलं. हे पाहून आलिया देखील चांगलीच संतापली.
चाहत्यांसोबत बॉडीगार्डची सुरु असलेली अरेरावी पाहता आलियाने बॉडीगार्डला चांगलेच सुनावले. आलिया म्हणाली की, ‘हे काय करताय तु्म्ही, असे कुणाला करू नका, कुणालाही हात लावू नका.’ आलियाला तिच्या बॉडीगार्डची ही कृती अजिबात आवडली नसल्याचे दिसून आले. यानंतर आलियाने स्वत: चाहत्याला आपल्याकडे बोलावून त्याच्यासोबत सेल्फी घेतला. आलियाचे हे वागणे पाहून चाहते तिचे कौतुक करत आहेत. तर काहींनी हे फक्त कॅमेरासाठी सुरु आहे अशाही कमेंटस केल्या.
नेटकऱ्यांकडून आलियाचे कौतुक
आलियाने आपल्या चाहत्यांसोबत किंवा पापाराझींसोबत काही गैरवर्तन केल्याचे कधी पाहण्यात आले नाही. उलट ती नेहमी सर्वांना आदरानेच बोलल्याचे दिसून येते. काही महिन्यांपूर्वी एका फोटोग्राफरची चप्पल रस्त्यावर पडलेली आलियाला दिसली तेव्हा तिने लगेचच ती चप्पल हातात उचलून पापराझीच्या पायापर्यंत आणून दिली. आलियाचा हा व्हिडीओसुद्धा सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता. तेव्हाही नेटकऱ्यांनी तिच्या या कृतीचे कौतुकच केले होते.
View this post on Instagram
दरम्यान आलिया आणि रणबीर कपूरने नुकताच त्यांची मुलगी राहाचा वाढदिवस साजरा केला. यानिमित्ताने त्यांनी एका भव्य पार्टीचे आयोजन केले होते, अनेक सिनेकलाकारांनीही पार्टीत हजेरी लावली होती. राहाच्या वाढदिवसाची थीम जंगल सफारीवर आधारित होती. केकपासून डेकोरेशनपर्यंत सर्व काही जंगल सफारीची थीम उभारण्यात आली होती. आलिया भट्टची मुलगी राहा भट्ट आता दोन वर्षांची झाली आहे.