Alia Bhatt Life style : अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) कायम तिच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यामुळे कायम चर्चेत असते. पण गेल्या काही दिवसांपासून आलिया तिच्या प्रायव्हसीमुळे चर्चेत आहे. रॉयल आयुष्य जगणारी आलिया अनेक ठिकाणी महागड्या ड्रेसमध्ये दिसते. आलिया कायम तिच्या महागड्या ड्रेस, बॅग आणि ज्वेलरीमुळे चर्चेत असते. नुकताच अभिनेत्री एका पुरस्कार सोहळ्यात उपस्थित राहिली होती. या सोहळ्यात आलियाने घातलेल्या गाऊनची चर्चा सध्या तुफान सुरु आहे. हिरव्या रंगाच्या एका गाऊनसाठी आलिया हिने मोठी रक्कम मोजली आहे.
पुरस्कार सोहळ्यात आलियाने जो हिरव्या रंगाचा ड्रेस घातला होता, या ड्रेसची किंमत सुमारे 1 लाख 71 हजार 740 रुपये आहे. आलियाचा हा ड्रेस दिसायला साधा असला तरी त्याची किंमत फार मोठी आहे. याआधी देखील आलिया तिच्या महागड्या ड्रेसमुळे चर्चेत आली होती. नव्या वर्षाचं स्वागत करण्यासाठी आलियाने एक खास ड्रेस घातला होता. त्या ड्रेसची किंमत तब्बल 75 हजार 500 एवढी होती. तेव्हा आलिया तिच्या फॅशनमुळे चर्चेत आली होती.
दिग्दर्शक करण जोहर दिग्दर्शिक ‘स्टूडन्ट ऑफ द ईअर’ सिनेमातून आलियाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. करणची स्टूडन्ट ते माफिया क्विन गंगुबाई काठिवाडी पर्यंतचा आलियाचा प्रवास चाहत्यांच्या कायम लक्षात राहिल. नुकताच आलिया हिला ‘गंगुबाई काठियावाडी’ सिनेमासाठी सर्वोकृष्ट अभिनेत्री पुरस्कारने सन्मानित करण्यात आलं. पुरस्कार सोहळ्यात आलियाने डीपनेक आणि हाय स्लिट गाऊल घातला होता.
अभिनेत्री आलिया भट्ट हिच्या सिनेमांबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्रीने आतापर्यंत अनेक हिट सिनेमे दिले आहेत. आता अभिनेत्री ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सिनेमात आलिया हिच्या सोबत अभिनेता रणवीर सिंग मुख्य भूमिकेत दिसणार आहे. शिवया आलियाचा पहिला हॉलिवूड सिनेमा ‘हार्ट ऑफ स्टोन’ लवकरच प्रदर्शित होणार आहे. (Alia bhatt film)
आलिया भट्ट कायम सोशल मीडियावर सक्रिय असते. आलिया तिच्या आयुष्यातील कोणतीही महत्त्वाची गोष्ट सोशल मीडियावर पोस्ट करत चाहत्यांना कळवत असते. लग्नाच्या दोन महिन्यानंतर आलियाने सोनोग्राफीचा फोटो शेअर करत चाहत्यांना आनंदाची बातमी दिली. त्यानंतर आलियाने ६ नोव्हेंबर २०२२ मध्ये मुलीला जन्म दिला आलिया आणि अभिनेता रणबीर कपूर यांच्या मुलीचं नाव राहा कपूर असं आहे.