नजर लागू नये म्हणून आलिया भट्टने केला हा उपाय, रेड कार्पेटवर देसी लूक

आलिया भट्टचे फोटो सोशल माडियावर चर्चेत आहेत. तिचे चाहत्यांनी तिच्या नव्या लूकचे कौतूक केले आहे. पण आलियाने नजर लागू नये म्हणून केलेला उपाय देखील चर्चेत आहे. आलियाचा हा देसी लूक चर्चेत असला तरी सोबतच तिचा हा उपाय देखील चर्चेत आहे. पाहा नजर लागू नये म्हणून काय केलंय तिने.

नजर लागू नये म्हणून आलिया भट्टने केला हा उपाय, रेड कार्पेटवर देसी लूक
Follow us
| Updated on: May 08, 2024 | 4:00 PM

Alia Bhatt : अभिनेत्री आलिया भट्ट आई झाल्यानंतर ही फिटनेस तिने कायम ठेवला आहे. सध्या ती मेट गाला 2024 च्या लूकमुळे चर्चेत आहे. आलियाचे  अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. नजर लागू नये म्हणून अनेक जण वेगवेगळे उपाय करतात. यामागे आलिया भट्ट देखील मागे नाही. तिने देखील नजर लागू नये म्हणून एक उपाय केला आहे. तिचा एक फोटो खूप वेगाने व्हायरल होत आहे. ज्यामध्ये तिने कानामागे काळा टिक्का लावला आहे.

आलियाचा लूक चर्चेत

बॉलिवूडमधील सर्वात लोकप्रिय अभिनेत्रींपैकी आलिया भट्ट एक आहे. त्यामुळे तिचा लूक नेहमीच चर्चेत असतो. आलिया भट्टचा मेट गाला लूक आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तिने 6 मे रोजी ‘मेट गाला 2024’ या मेगा फॅशन इव्हेंटमध्ये भाग घेतला होता. सलग दुसऱ्या वर्षी आलियाने यामध्ये भाग घेत फॅशन कौशल्य दाखवले आहे. आलियाचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यंदा आलिया पारंपरिक लूकमध्ये दिसली.

मेट गालाच्या कार्पेटवर आलियाने डिझायनर सब्यसाचीच्या आउटफिटमध्ये एन्ट्री केली. अभिनेत्रीने फ्लोरल प्रिंटेड साडी घातली होती, ज्यामध्ये ती राजकुमारी सारखीच दिसत होती. आलियाने नजर लागू नये म्हणून एक देसी युक्तीही केली होती. तिच्या हा लूक पाहिल्यानंतर अनेक बॉलिवूड स्टार्स आणि चाहत्यांनीही तिचे कौतुक केले आहे.

मेट गाला कार्पेटवर आलिया भट्ट एथनिक लूकमध्ये खूपच सुंदर दिसत होती. त्यामुळे तिला नजर लागू नये म्हणून तिने कानाच्या मागे काळा टिक्का देखील लावला होता. तिचा हा फोटो देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

साडी बनवण्यासाठी 2 महिन्यांहून अधिकचा कालावधी

आलिया भट्टची ही सुंदर साडी बनवण्यासाठी डिझायनर सब्यसाचीला 2 महिन्यांहून अधिक काळ लागला आहे. याचा खुलासा खुद्द अभिनेत्रीने वोगशी बोलताना केलाय. आलियाने सांगितले की, तिची साडी 1965 तासांत तयार झाली. इतकंच नाही तर 163 कारागिरांच्या मेहनतीने ती बनवण्यात आली आहे.

आलिया भट्टच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर ती लवकरच ‘जिगरा’मध्ये दिसणार आहे. यासोबतच ती करण जोहरच्या ‘लव्ह अँड वॉर’ या चित्रपटातही दिसणार आहे. या चित्रपटात तिच्यासोबत विकी कौशल आणि रणबीर कपूर दिसणार आहेत.

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.