‘पंडीतने एका मुलीला आणलं आणि…’, आलिया भट्ट आहे रणबीर कपूरची दुसरी बायको, खुद्द अभिनेत्यानेच सांगितलं सत्य
Ranbir Kapoor: 'पंडीतने एका मुलीला आणलं आणि...', आलिया भट्ट आहे रणबीर कपूर याची दुसरी पत्नी, तर अभिनेत्याची पहिली पत्नी कोण? अनेक वर्षांनंतर रणबीरने सांगितलं सत्य

Ranbir Kapoor: बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर कायम त्याच्या वक्तव्यांमुळे चर्चेत असतो. सोशल मीडियावर रणबीर कपूरचे पत्नी आलिया भट्ट आणि लेक राहा कपूर हिच्यासोबत फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत असतात. रणबीर आणि आलिया यांच्या नात्याबद्दल सांगायचं झालं तर, दोघांनी अनेक वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर लग्न करण्याचा निर्णय घेतला. लग्नानंतर आलिया लेक राहा हिला जन्म दिला आणि आता रणबीर आणि आलिया लेक राहा हिच्यासोबत आनंदी आयुष्य जगत आहेत. सोशल मीडियावर देखील तिघांचे अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत असतात.
पण नुकताच झालेल्या मुलाखतीत रणबीर याने त्याच्या खासगी आयुष्याबद्दल मोठा खुलासा केला आहे. ज्यामुळे चाहत्यांना देखील मोठा धक्का बसला आहे. आलिया भट्ट ही माझी दुसरी पत्नी आहे… असं वक्तव्य रणबीर कपूर याने केलं. ज्यामुळे अभिनेत्याची पहिली पत्नी कोण असा प्रश्न चाहत्यांच्या मनात उपस्थित झाला.
मुलाखतीत रणबीर कपूर म्हणाला, ‘मी याला मुर्खपणा म्हणणार नाही. जेव्हा मी माझ्या करियरला सुरुवात केली होती, तेव्हा एक मुलगी माझ्या घरी आली होती. ती मुलगी एकटी नव्हती तर तिच्यासोबत एक पंडीत देखील होते. त्यांनी सोबत लग्नासाठी लागणारं सामाण देखील आणलं होतं. मुलीने माझ्या घराच्या गेट बाहेर माझ्यासोबत लग्न केलं. पण तेव्हा मी घरी नव्हतो… ‘
View this post on Instagram
पुढे रणबीर म्हणाला, ‘मी तेव्हा बाहेर होतो. मी घरी आल्यानंतर मला सर्वकाही एका गार्डने सांगितलं. मी गेटवर पाहिलं तर कुंकू लागलेलं होतं आणि सर्वत्र फुले विखुरलेली होती. यामुळे ती मुलगी माझी पहिली पत्नी झाली. मी अद्याप तिला भेटलेलो नाही. पण लवकरच भेटण्याची इच्छा आहे. यामुळे आलिया भट्ट माझी दुसरी पत्नी झाली…’ असं देखील रणबीर म्हणाला.
आलिया आणि रणबीर यांचं लग्न
आलिया आणि रणबीर 2022 मध्ये लग्न केलं. फार कमी लोकांच्या उपस्थितीत दोघांचं लग्न पार पडलं. लग्नानंतर दोघांचे अनेक फोटो आणि व्हिडीओ देखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले. आता मुलीच्या जन्मानंतर देखील आलिया आणि रणबीर चाहत्यांना कपल गोल्स देत असतात. दोघांचे अनेक फोटो आणि व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.