Alia Bhatt | आलियाने पोस्ट केला रणबीरसोबत मुलगी राहाचा फोटो; लगेच डिलिट केल्यानंतर उचललं हे पाऊल

रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांनी गेल्या वर्षी एप्रिलमध्ये लग्नगाठ बांधली होती. लग्नाच्या दोन महिन्यांनंतर जूनमध्ये आलियाने गरोदर असल्याचं जाहीर केलं होतं. त्यानंतर 6 नोव्हेंबर 2022 रोजी तिने मुलगी राहा कपूरला जन्म दिला.

Alia Bhatt | आलियाने पोस्ट केला रणबीरसोबत मुलगी राहाचा फोटो; लगेच डिलिट केल्यानंतर उचललं हे पाऊल
Ranbir Kapoor and Alia BhattImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Apr 25, 2023 | 11:46 AM

मुंबई : अभिनेत्री आलिया भट्ट आणि रणबीर कपूरची मुलगी राहा कपूर हिचे फोटो पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. आलियाने गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात मुलीला जन्म दिला. मात्र आजवर तिने तिचा चेहरा माध्यमांना, पापाराझींना दाखवला नाही किंवा सोशल मीडियावरही पोस्ट केला नाही. सोमवारी तिने रणबीरचा मुलीसोबतचा एक फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केला. मात्र काही क्षणांतच तिने तो डिलिट केला. तोपर्यंत सोशल मीडियावर तो फोटो व्हायरल झाला होता. पुन्हा काही वेळाने तिने तोच फोटो इन्स्टाग्रामवर अपलोड केला.

आलियाने पोस्ट केलेल्या या फोटोमध्ये रणबीर आणि त्याच्या बाजूला स्ट्रोलरमध्ये बसलेली राहा पहायला मिळतेय. रणबीर राहाकडे एक हात पुढे करून बघताना दिसतोय. मात्र यात राहा पाठमोरी असल्याने तिचा चेहरा दिसत नाही. या फोटोच्या कॅप्शनमध्ये तिने लिहिलं, ‘6 नोव्हेंबरपासून मी सर्वोत्कृष्ट फोटोग्राफर बनली आहे. माझं जग..’ या फोटोला पंधरा लाखांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत.

हे सुद्धा वाचा
View this post on Instagram

A post shared by Alia Bhatt ? (@aliaabhatt)

रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांनी गेल्या वर्षी एप्रिलमध्ये लग्नगाठ बांधली होती. लग्नाच्या दोन महिन्यांनंतर जूनमध्ये आलियाने गरोदर असल्याचं जाहीर केलं होतं. त्यानंतर 6 नोव्हेंबर 2022 रोजी तिने मुलगी राहा कपूरला जन्म दिला. “पालक म्हणून आम्ही राहाच्या प्रायव्हसीला शक्य तितकं जपण्याचा प्रयत्न करतोय. एका सामान्य मुलीप्रमाणे ती लहानाची मोठी व्हावी, अशी आमची इच्छा आहे. सामान्य मुलींप्रमाणेच तिने शाळेत जावं. इतर मुलामुलींमध्ये तिने स्वत:ला वेगळं समजू नये, असं आमचं मत आहे”, असं रणबीरने करीना कपूरच्या टॉक शोमध्ये बोलून दाखवलं होतं.

आलिया आणि रणबीर ‘ब्रह्मास्त्र : पार्ट वन शिवा’मध्ये एकत्र झळकले होते. अयान मुखर्जीने या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं होतं. त्यानंतर गेल्या महिन्यात रणबीरचा ‘तू झुठी मैं मक्कार’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला. दुसरीकडे आलियाचा ‘रॉकी और रानी की प्रेमकहानी’ हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. यामध्ये ती रणवीर सिंगसोबत मुख्य भूमिका साकारणार आहे.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.