आलिया-रणबीरचा 8 मजल्यांचा बंगला तयार; मुलीसह करणार गृहप्रवेश

मुलीसोबत नव्या घरात आलिया-रणबीरचा होणार गृहप्रवेश; 3 वर्षांपासून सुरू होतं बांधकाम

आलिया-रणबीरचा 8 मजल्यांचा बंगला तयार; मुलीसह करणार गृहप्रवेश
Alia and RanbirImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Nov 09, 2022 | 6:18 PM

मुंबई- अभिनेत्री आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांनी आई-बाबा म्हणून आपल्या आयुष्यातील नव्या प्रवासाला सुरुवात केली. आलियाने रविवारी (6 नोव्हेंबर) मुलीला जन्म दिला. कपूर कुटुंबात सध्या आनंदाचं वातावरण आहे. अशातच ऋषी कपूर आणि नीतू कपूर यांच्या कृष्णा-राज या बंगल्याचं बांधकामसुद्धा पूर्ण झालं आहे. पाली हिलमध्ये असलेल्या या बंगल्याच्या पुर्रचनेचं काम गेल्या तीन वर्षांपासून सुरू होतं. या बंगल्याचं इंटेरिअर पूर्णपणे नव्याने बनवण्यात आलं आहे. यातील छोट्यातल्या छोट्या गोष्टीकडे आलिया-रणबीरने लक्ष दिलं होतं.

आलिया आणि रणबीर आपल्या मुलीसह या नव्या घरात प्रवेश करणार असल्याचं कळतंय. नीतू कपूर, रणबीर कपूर, आलिया भट्ट आणि तिची मुलगी यांच्यासोबतच रिद्धिमा कपूर आणि तिची मुलगी समारा या आठ मजल्यांच्या इमारतीत राहायला जाणार आहेत.

हे सुद्धा वाचा

या इमारतीत नीतू कपूर यांच्यासाठी एक मजला, रणबीर-आलियासोबत त्यांच्या मुलीसाठी एक मजला, रणबीरची बहीण रिद्धिमासाठी एक मजला असेल. रिद्धिमा सध्या तिच्या पतीसोबत दिल्लीत राहते. मात्र मुंबईत आल्यानंतर राहण्यासाठी तिच्यासाठी या इमारतीतील एक मजला राखीव ठेवण्यात आला आहे.

इतकंच नव्हे तर आलिया-रणबीरची मुलगी मोठी झाल्यानंतर तिच्यासाठी वेगळी राहण्याची जागासुद्धा आतापासूनच या इमारतीत राखीव म्हणून ठेवण्यात आली आहे. या इमारतीत एक मोठा स्विमिंग पूल आणि एक ऑफिससुद्धा असेल. तर एक मजला पूर्णपणे ऋषी कपूर यांच्या आठवणी जपण्यासाठी ठेवण्यात आला आहे.

रविवारी सकाळी आलियाला मुंबईतील एच. एन. रिलायन्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. याच दिवशी तिने मुलीला जन्म दिला. गेल्या तीन दिवसांपासून आलिया रुग्णालयातच आहे. आलिया आणि चिमुकलीची प्रकृती एकदम स्वस्थ असल्याची माहिती आहे.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.