Bigg Boss OTT 2 | पूजा भट्ट ‘तिकिट टू फिनाले’ हरताच बहीण आलियाची प्रतिक्रिया समोर; म्हणाली “ती तिथे..”

बिग बॉस ओटीटीच्या या दुसऱ्या सिझनमध्ये अभिषेक मल्हान आणि पूजा भट्ट यांच्यात 'तिकिट टू फिनाले'ची शर्यत रंगली होती. घरातील स्पर्धकांना दोन भागांमध्ये विभागलं गेलं होतं. खेळाडूंना अभिषेक आणि पूजासाठी फळं गोळा करायची होती.

Bigg Boss OTT 2 | पूजा भट्ट 'तिकिट टू फिनाले' हरताच बहीण आलियाची प्रतिक्रिया समोर; म्हणाली ती तिथे..
Pooja and Alia BhattImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Aug 04, 2023 | 11:19 AM

मुंबई | 4 ऑगस्ट 2023 : सलमान खान सूत्रसंचालन करत असलेला ‘बिग बॉस ओटीटी 2’ हा शो सध्या अंतिम टप्प्यावर पोहोचला आहे. येत्या 17 ऑगस्ट रोजी या शोचा ग्रँड फिनाले पार पडणार आहे. या शोमध्ये दररोज नवीन ड्रामा आणि ट्विस्ट पहायला मिळत आहेत. त्यामुळे प्रेक्षकांचंही भरभरून मनोरंजन होत आहे. सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर अभिषेक मल्हान उर्फ फुकरा इन्सान हा बिग बिगच्या घरातील शेवटचा कॅप्टन आणि या सिझनचा पहिला फायनलिस्ट ठरला आहे. अभिषेकने तगडी स्पर्धक पूजा भट्टला मात दिली आहे. तिला हरवून तो ‘तिकिट टू फिनाले’ जिंकला. आता पूजा भट्टविषयी बहीण आलिया भट्टने प्रतिक्रिया दिली आहे.

नुकतेच बिग बॉसच्या घरात पूजाचे वडील आणि दिग्दर्शक महेश भट्ट पाहुणे म्हणून पोहोचले होते. यावेळी त्यांनी पूजाला खंबीर पाठिंबा दिला. त्यानंतर आता बहीण आलियाचीही प्रतिक्रिया समोर आली आहे. आलिया नुकतीच तिच्या ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ या चित्रपटाशी संबंधित आयोजित पत्रकार परिषदेत पोहोचली होती. यावेळी तिथून निघताना पापाराझींनी तिला पूजा भट्टविषयी प्रश्न विचारला. त्यावर आलिया कारमध्ये बसण्याआधी लगेच मागे वळून म्हणाली, “वो वहा है, वो ही मेरे लिए जीतें, I love her” (ती तिथे आहे आणि माझ्यासाठी तिनेच जिंकावं. मी तिच्यावर खूप प्रेम करते.) महेश भट्ट यांच्यानंतर आलियासुद्धा बहिणीला पाठिंबा देण्यासाठी बिग बॉसच्या घरात पाहुणी म्हणून प्रवेश करणार असल्याचं कळतंय.

हे सुद्धा वाचा

पहा व्हिडीओ

बिग बॉस ओटीटीच्या या दुसऱ्या सिझनमध्ये अभिषेक मल्हान आणि पूजा भट्ट यांच्यात ‘तिकिट टू फिनाले’ची शर्यत रंगली होती. घरातील स्पर्धकांना दोन भागांमध्ये विभागलं गेलं होतं. खेळाडूंना अभिषेक आणि पूजासाठी फळं गोळा करायची होती. अखेर अभिषेक मल्हानने मनीषा राणी, एल्विश यादव आणि जिया शंकर यांच्या मदतीने हा टास्क जिंकला. या टास्कदरम्यान पूजाला दुखापतसुद्धा झाली होती. त्यानंतर जद हदिदने तिचं प्रतिनिधीत्व केलं होतं.

शहाजी बापू्ंनी केले वक्तव्य तर सुहास बापूच आमदार......
शहाजी बापू्ंनी केले वक्तव्य तर सुहास बापूच आमदार.......
विरोधकांना धारेवर धरणारे अमोल मिटकरी बनले ट्राफिक पोलीस, बघा व्हिडीओ
विरोधकांना धारेवर धरणारे अमोल मिटकरी बनले ट्राफिक पोलीस, बघा व्हिडीओ.
दादा कार्यकर्त्यांवर भडकले, 'फालतूपणा बस्स, आता तू बोलला ना तर मी...'
दादा कार्यकर्त्यांवर भडकले, 'फालतूपणा बस्स, आता तू बोलला ना तर मी...'.
नायर रुग्णालयात विद्यार्थीनीचा लैंगिक छळ, शिंदेंच्या आदेशानंतर अॅक्शन
नायर रुग्णालयात विद्यार्थीनीचा लैंगिक छळ, शिंदेंच्या आदेशानंतर अॅक्शन.
सुळेंचा भाजपवर टीका; 'चांदीच्या ताटात जेवायची वेळ येते तेव्हा...'
सुळेंचा भाजपवर टीका; 'चांदीच्या ताटात जेवायची वेळ येते तेव्हा...'.
गरबा-दांडिया खेळणाऱ्या रसिकांसाठी खुशखबर; आता मनसोक्त खेळा, कारण...
गरबा-दांडिया खेळणाऱ्या रसिकांसाठी खुशखबर; आता मनसोक्त खेळा, कारण....
'हम-हम पाच है... ', कर्जत-जामखेड मतदारसंघात निनावी बॅनरची होतेय चर्चा
'हम-हम पाच है... ', कर्जत-जामखेड मतदारसंघात निनावी बॅनरची होतेय चर्चा.
अॅट्रोसिटी दाखल झाल्यानंतर बोंबलायचं नाही, आंबेडकरांचा CM-DCMवर निशाणा
अॅट्रोसिटी दाखल झाल्यानंतर बोंबलायचं नाही, आंबेडकरांचा CM-DCMवर निशाणा.
महाविकास आघाडी सरकारकडून शेतकर्यांसाठी मोर्चा
महाविकास आघाडी सरकारकडून शेतकर्यांसाठी मोर्चा.
'लक्ष्मण हाके डान्सबारमध्ये दारू पितात, आमच्याकडे व्हिडीओ अन्...'
'लक्ष्मण हाके डान्सबारमध्ये दारू पितात, आमच्याकडे व्हिडीओ अन्...'.