Alia Bhatt | गरोदर असताना आलिया भट्टने हवेत लटकून केले स्टंट्स; व्हिडीओ पाहून तुम्हीही व्हाल थक्क!

आलिया आणि रणबीरने गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात लग्न केलं. त्यानंतर नोव्हेंबर महिन्यात आलियाने मुलीला जन्म दिला. राहा कपूर सध्या आठ महिन्यांची आहे. आई झाल्यानंतर आयुष्यातील प्राधान्यक्रम कशा पद्धतीने बदलत गेले, याविषयी आलिया विविध मुलाखतींमध्ये मोकळेपणे व्यक्त झाली.

Alia Bhatt | गरोदर असताना आलिया भट्टने हवेत लटकून केले स्टंट्स; व्हिडीओ पाहून तुम्हीही व्हाल थक्क!
Alia BhattImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Aug 15, 2023 | 3:41 PM

मुंबई | 15 ऑगस्ट 2023 : अभिनेत्री आलिया भट्टची जादू केवळ बॉलिवूडमध्येच नाही तर हॉलिवूडमध्येही चालली आहे. यामागचं कारण म्हणजे तिचा नुकताच प्रदर्शित झालेला पहिलावहिला हॉलिवूड चित्रपट. ‘हार्ट ऑफ स्टोन’ या चित्रपटात आलियाने महत्त्वपूर्ण भूमिका साकारली आहे. याच चित्रपटात तिने काही स्टंट्ससुद्धा केले आहेत. विशेष म्हणजे या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान आलिया गरोदर होती. तरीही शूटिंगसाठी तिने पूर्ण मेहनत घेतली होती. याचा पुरावा सोशल मीडियावरील एका व्हिडीओमध्ये दिसत आहे. या व्हिडीओमध्ये आलिया ही हॉलिवूड अभिनेत्री गल गडॉट आणि जेमी डॉर्ननसोबत स्टंट सीन शूट करताना दिसतेय.

चित्रपटातील एका अॅक्शन सीनदरम्यान आलिया आणि गल गडॉट हवेत लटकलेले दिसत आहेत. तर एका सीनमध्ये आलिया स्कायडायव्हिंग करताना दिसतेय. आलियाने या चित्रपटाविषयी आणि शूटिंगविषयी अनुभव सांगताना म्हटलं की, “चित्रपटासोबतच बऱ्याच गोष्टी माझ्या आयुष्यात नव्याने होत आहेत. हा माझा पहिलाच हॉलिवूड चित्रपट आहे.” आलिया गरोदर असताना या चित्रपटाची शूटिंग पार पडली होती.

हे सुद्धा वाचा

आलियाने तिच्या प्रेग्नंसीविषयी सर्वांत आधी गल गडॉटलाच सांगितलं होतं. त्यानंतर सेटवर सर्वांनी तिची खूप काळजी घेतली होती. ‘हार्ट ऑफ स्टोन’ हा एक स्पाय थ्रिलर चित्रपट आहे. टॉम हार्पर दिग्दर्शित या चित्रपटात आलियासोबत गल गडॉट आणि जेमी डॉर्नन यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. दुसरीकडे आलियाचा ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ हा चित्रपटसुद्धा बॉक्स ऑफिसवर हिट ठरला. करण जोहर दिग्दर्शित या चित्रपटाने दमदार कमाई केली आहे.

आलिया आणि रणबीरने गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात लग्न केलं. त्यानंतर नोव्हेंबर महिन्यात आलियाने मुलीला जन्म दिला. राहा कपूर सध्या आठ महिन्यांची आहे. आई झाल्यानंतर आयुष्यातील प्राधान्यक्रम कशा पद्धतीने बदलत गेले, याविषयी आलिया विविध मुलाखतींमध्ये मोकळेपणे व्यक्त झाली. आलियाने स्पष्ट केलंय की आता ती तिच्या कुटुंबाला आणि मुलीला प्राधान्य देणार आहे. मात्र त्याचसोबत ती फिल्म इंडस्ट्री सोडणार नाही.

राहाच्या जन्मापासून रणबीर आणि आलिया तिच्या फोटोंबद्दल महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. तिचे फोटो कुठेच पोस्ट करायचे नाहीत किंवा पापाराझींना क्लिक करू द्यायचे नाहीत, असा त्यांचा आग्रह आहे. राहाचा चेहरा अद्याप कोणाला दाखवायचना नाही, असा निर्णय रणबीर आणि आलियाने घेतला आहे.

श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.