लेकीला जन्म दिल्यानंतर आलिया भट्ट हिच्याकडे आणखी एक गुडन्यूज
राहा कपूर हिला जन्म दिल्यानंतर कपूर आणि भट्ट कुटुंबात आनंदाचं वातावरण असताना आलियाने चाहत्यांना आणखी एक गुडन्यूज दिली. अभिनेत्रीच्या आयुष्यात आनंदच आनंद...
मुंबई : अभिनेत्री आलिया भट्ट हिने गेल्यावर्षी एप्रिल महिन्यात अभिनेता राणबीर कपूर याच्यासोबत लग्न केलं. लग्नाच्या दोन महिन्यांनंतर आलियाने सोनोग्राफीचा एक फोटो पोस्ट करत चाहत्यांना आनंदाची बातमी दिली. आलिया हिने ६ नोव्हेंबर रोजी गोंडस मुलीला जन्म दिला. मुलीच्या जन्मानंतर कपूर आणि भट्ट कुटुंबात आनंदाचं वातावरण असताना आलियाने चाहत्यांना आणखी एक गुडन्यूज दिली आहे. बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाने चाहत्यांना घायाळ करणारी आलिया आता हॉलिवूडमध्ये देखील दिसणार आहे.
आलिया लवकरच ‘Heart of stone’ या हॉलिवूड सिनेमातून चाहत्यांच्या भेटीस येणार आहे. अभिनेत्री आलिया भट्ट स्टारर ‘Heart of stone’सिनेमा ११ ऑगस्ट २०२३ मध्ये प्रदर्शित होणार आहे. ओटीटी प्लॅटफॉर्मवर आलियाचा ‘Heart of stone’सिनेमा प्रदर्शित होणार आहे.
बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाची छाप सोडल्यानंतर आलिया हॉलिवूडमध्ये आता स्वतःचं नशीब आजमावणार आहे. आलिया भट्टचा ‘Heart of stone’ सिनेमा नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. आलियाच्या आगामी सिनेमाबद्दल चाहत्यांच्या मनात उत्सुकता आहे. सध्या सर्वत्र आलियाच्या आगामी सिनेमाची चर्चा आहे.
View this post on Instagram
आई झाल्यानंतर आलियाचा पहिला सिनेमा प्रदर्शित होणार असल्यामुळे चाहत्यांच्या मनातील उत्सुकता शिगेला पोहोचणार आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे ११ ऑगस्ट २०२३ मध्ये अभिनेता रणबीर कपूर याचा एनीमल सिनेमा देखील प्रदर्शित होणार आहे. अशात चाहते कोणाच्या सिनेमाला अधिक प्रेम देतील हे सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर कळेल.
View this post on Instagram
आलिया आणि रणबीर यांनी ‘ब्रह्मास्त्र’ सिनेमातून एकत्र स्क्रिन शेअर केली. चाहत्यांनी देखील दोघांच्या सिनेमाला प्रचंड प्रेम दिलं. बॉक्स ऑफिसवर देखील सिनेमाने तगडी कमाई केली. आता चाहते आलिया हिच्या ‘Heart of stone’ आणि रणबीरच्या एनिमल सिनेमाच्या प्रतीक्षेत आहेत.