आलिया भट्ट मेंटल हेल्थसाठी करते असं काम, राहा हिच्या जन्मानंतर झालेल्या बदलांबद्दल म्हणाली…
Alia Bhatt | 'प्रत्येकासाठी आयुष्य कठीण असतं, कारण...', गेल्या अनेक वर्षांपासून आलिया भट्ट स्वतःला आनंदी ठेवण्यासाठी करतेय असं काम, लेकीच्या जन्मानंतर मेंटल हेल्थबद्दल अभिनेत्री म्हणाली..., आलिया कायम तिच्या खासगी आयुष्यातील अनेक गोष्टी चाहत्यांसोबत शेअर करत असते...
अभिनेत्री आलिया भट्ट हिला आज कोणत्याही ओळखीची गरज आहे. सिनेमांच्या माध्यमातून आलिया हिने बॉलिवूडमध्ये आणि चाहत्यांच्या मनात स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केलं आहे. आलिया फक्त तिच्या प्रोफेशनल आयुष्यामुळे नाहीतर, खासगी आयुष्यामुळे देखील चर्चेत असते. आलिया भट्ट हिने 2021 मध्ये अभिनेता रणबीर कपूर याच्यासोबत लग्न केलं. त्यानंतर अभिनेत्रीने 2022 मध्ये लेक राहा कपूर हिला जन्म दिला. आई झाल्यानंतर आलिया हिच्या आयुष्यात अनेक बदल झाले आहेत. नुकताच झालेल्या एका मुलाखतीत आलियाने मातृत्वाच्या प्रवासापासून ते मानसिक आरोग्याची काळजी घेण्यापर्यंत अनेक गोष्टींचा खुलासा केला आहे.
आलिया हिने सांगितल्यानुसार, अभिनेत्री गेल्या अनेक वर्षांपासून प्रत्येक आठवड्यात थेरेपी क्लाससाठी जाते. ज्यामुळे अभिनेत्रीला स्वतःमध्ये झालेले अनेक बदल जाणवले आहेत. कशाप्रकारे आलिया आई होण्याचे कर्तव्य पार पाडते… आयुष्यातील प्रत्येक गोष्ट आपल्या मानसिक आरोग्यावर आधारलेली आहे…
अभिनेत्री म्हणाली, ‘मला कायम असं वाटत असते लोकं काय विचार करत असतील, मी सर्वकाही योग्य प्रकारे सांभाळू शकते का? असा विचार लोकं करत असतील… पण कोणीच तुमच्याबद्दल विचार करत नाही. तरी देखील काही गोष्टींचा विचार आपण स्वतःच स्वतःसाठी करत असतो… मी माझ्या मानसिक आरोग्यावर काम करत असते…’
पुढे अभिनेत्री म्हणाली, ‘मी प्रत्येक आठवड्यात थेरेपी सेशनसाठी जाते. जेथे मी स्वतःला वाटणाऱ्या भीतीबद्दल बोलत असते. मनात असलेल्या भीतीचा सामना करते. ही गोष्ट तुमच्या लवकर लक्षात येत नाही… ही फार मोठी प्रोसेस आहे. तुम्ही स्वतःला रोज एक नवीन व्यक्ती बनवण्याचा प्रयत्न करता…’
‘जीवनात कोणीही परफेक्ट नसतं… कोणीच प्रत्येक गोष्ट उत्तम प्रकारे सांभाळू शकत नाही. प्रत्येक वेळी तुम्हाला तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं मिळणार नाहीत.. मी कामासोबत राहा हिचा देखील उत्तम प्रकारे सांभाळ करते… प्रत्येकाचं आयुष्य कठीण असतं… आपण फक्त बसून तक्रारी करू शकत नाही. मार्ग आणि पर्याय आपल्यालाच शोधायचे असतात…’ असं देखील आलिया भट्ट म्हणाली..
आलिया भट्ट हिच्या आगामी सिनेमाबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्री लवकरच ‘जिगरा’ सिनेमाच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस येणार आहे. सिनेमाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी दिग्दर्शक वसन बाला यांच्या खांद्यावर आहे. सिनेमा सप्टेंबर 2024 मध्ये प्रदर्शित होणार आहे. शिवाय, आलिया दिग्दर्शक संजय लिला भन्साळी यांच्या ‘लव्ह अॅन्ड वॉर’ सिनेमात देखील मुख्य भूमिका साकारताना दिसणार आहे.