Alia Bhatt | आलिया भट्टची मुलगी फिल्म इंडस्ट्रीत पाऊल ठेवणार नाही? राहा कपूरच्या करिअर प्लॅनचा खुलासा

आई झाल्यानंतर आयुष्यातील प्राधान्यक्रम कशा पद्धतीने बदलत गेले, याविषयीही आलिया विविध मुलाखतींमध्ये व्यक्त झाली. आलियाने स्पष्ट केलंय की आता ती तिच्या कुटुंबाला आणि मुलीला प्राधान्य देणार आहे. मात्र त्याचसोबत ती फिल्म इंडस्ट्री सोडणार नाही.

Alia Bhatt | आलिया भट्टची मुलगी फिल्म इंडस्ट्रीत पाऊल ठेवणार नाही? राहा कपूरच्या करिअर प्लॅनचा खुलासा
Alia Bhatt Image Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Jul 21, 2023 | 4:01 PM

मुंबई | 21 जुलै 2023 : अभिनेत्री आलिया भट्ट सध्या तिच्या ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ या चित्रपटाचं जोरदार प्रमोशन करतेय. यामध्ये ती रणवीर सिंगसोबत मुख्य भूमिका साकारतेय. रणवीर आणि आलिया मिळून विविध शहरांमध्ये या चित्रपटाचं प्रमोशन करत आहेत. या प्रमोशननिमित्त दिलेल्या मुलाखतींमध्ये आलिया तिच्या खासगी आयुष्याबद्दलही मोकळेपणे व्यक्त होतेय. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिने तिची मुलगी राहा कपूरच्या करिअर प्लॅनविषयी खुलासा केला. आपल्या आईवडिलांच्या पावलांवर पाऊल टाकत राहा अभिनेत्री होणार नसल्याचं आलिया यावेळी म्हणाली. इतकंच नव्हे तर आलियाने राहासाठी कोणतं करिअर निवडलंय, हेसुद्धा तिने सांगितलं.

आलिया आणि रणबीरने गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात लग्न केलं. त्यानंतर नोव्हेंबर महिन्यात आलियाने मुलीला जन्म दिला. राहा कपूर सध्या आठ महिन्यांची आहे. मात्र आलियाने आताच तिच्या करिअरसाठी प्लॅनिंग करून ठेवली आहे. अनेकदा बॉलिवूड सेलिब्रिटींची मुलं ही फिल्म इंडस्ट्रीतच करिअर करताना दिसतात. रणबीर आणि आलिया यांनीसुद्धा हेच केलं होतं. मात्र राहासाठी आलियाचा वेगळाच प्लॅन आहे.

हे सुद्धा वाचा

आलिया भट्टचं म्हणणं आहे की तिची मुलगी शास्त्रज्ञ बनेल. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत आलिया म्हणाली, “मी तिला म्हणते, तू तर शास्त्रज्ञच बनशील.” तिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. त्यावर नेटकऱ्यांकडून विविध प्रतिक्रिया येत आहेत. ‘म्हणजे ती चित्रपटात शास्त्रज्ञची भूमिका साकारणार’, असं एकाने उपरोधिकपणे लिहिलं. तर करण जोहरच आलियाच्या मुलीला बॉलिवूडमध्ये लाँच करणार, अशी भविष्यवाणीच दुसऱ्या युजरने केली.

आई झाल्यानंतर आयुष्यातील प्राधान्यक्रम कशा पद्धतीने बदलत गेले, याविषयीही आलिया विविध मुलाखतींमध्ये व्यक्त झाली. आलियाने स्पष्ट केलंय की आता ती तिच्या कुटुंबाला आणि मुलीला प्राधान्य देणार आहे. मात्र त्याचसोबत ती फिल्म इंडस्ट्री सोडणार नाही.

राहाच्या जन्मापासून रणबीर आणि आलिया तिच्या फोटोंबद्दल महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. तिचे फोटो कुठेच पोस्ट करायचे नाहीत किंवा पापाराझींना क्लिक करू द्यायचे नाहीत, असा त्यांचा आग्रह आहे. राहाचा चेहरा अद्याप कोणाला दाखवायचना नाही, असा निर्णय रणबीर आणि आलियाने घेतला आहे. “माझ्या मुलीबद्दल कोणतीच गोष्ट बोलण्यासाठी मी सध्या कम्फर्टेबल नाही. अनेकांकडून मला शुभेच्छा आणि आशीर्वाद मिळत आहेत. मला राहाची आई अशी हाक मारली जात आहे, जे मला खूपच क्युट वाटतं. पण ज्यांच्यावर मी प्रेम करते, त्यांच्याबाबत मी फार प्रोटेक्टिव्ह आहे. मला खरंच असं वाटतं की बाळाने पब्लिक पर्सनॅलिटी व्हायची काही गरज नाही. हे माझं वैयक्तिक मत आहे”, असं आलिया एका मुलाखतीत म्हणाली होती.

सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.