लहान बहिणीसोबत आलिया भट्टचं कसं आहे नातं, दोघींचे व्हॉट्सॲप चॅट लीक
Alia Bhatt : आलिया भट्ट - शाहीन भट्ट यांचे व्हॉट्सॲप चॅट लीक, कोणत्या विषयावर सुरु आहे दोघी बहिणींमध्ये चर्चा...; आलिया कायम असते कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत... पण बहिणीसोबत असलेल्या अतूट नात्यामुळे अभिनेत्री चर्चेत...
मुंबई : 28 ऑक्टोबर 2023 : अभिनेत्री आलिया भट्ट हिला नुकताच राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. दिग्दर्शक संजय लिला भंसाळी यांच्या ‘गंगूबाई काठियावाडी’ सिनेमासाठी अभिनेत्रीला पुरस्कार मिळाला आहे. आलिया हित्याबद्दल सांगायचं झालं तर, आलिया बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्रींच्या यादीत अव्वल स्थानी आहे. त्यामुळे आलिया हिच्याबद्दल अनेक गोष्टी जाणून घेण्यासाठी देखील चाहते उत्सुक असतात. आता आलिया आणि तिची लहान बहीण शाहीन भट्ट यांच्या नात्याबद्दल मोठं सत्य समोर आलं आहे. सध्या आलिया आणि शाहीन यांचे व्हॉट्सॲप चॅट लीक झाले आहेत.
आलिया आणि शाहीन यांच्यामध्ये प्रेमळ नातं आहे. दोघी कायम एकत्र दिसतात. दोघींचे फोटो आणि व्हिडीओ देखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल होताना दिसतात. दरम्यान, आलिया आणि शाहीन यांचे व्हॉट्सॲप चॅट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.
आलिया आता एका मुलीची आई झाली आहे, तरी देखील अभिनेत्री कायम तिच्या लहान बहिणीवर अवलंबून असते. व्हॉट्सॲप चॅटमध्ये दोघी पदार्थांबद्दल बोलताना दिसत आहेत. शाहीन, आलिया हिला सांगत आहे की, तिने काय खाल्ल पाहिजे…
आलिया लहान बहिणीला मेसेज करत म्हणाली, मला आता पोहे खायला हवेत.. यावर शाहीन म्हणते, ‘तुला आता दही – भात आणि तळलेली बटाटी खायला हवीत… पोहे तू ब्रेकफास्टसाठी खाऊ शकतेस…’ आलिया हिला देखील बहिणीने सल्ला आवडला. आलिया हिने व्हॉट्सॲप चॅटचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.
आलिया सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते. चाहते देखील अभिनेत्रीच्या प्रत्येक फोटोवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत असतात.
आलिया आणि शाहीन यांच्याबद्दल सांगायचं झालं तर, दोघी निर्माते महेश भट्ट आणि अभिनेत्री सोनी राजदान यांच्या मुली आहे. सोनी राजदान या महेश भट्ट यांच्या दुसऱ्या पत्नी आहेत. महेश भट्ट यांचं पहिलं लग्न किरण भट्ट यांच्यासोबत केलं होतं.