Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अलिया भट्टच्या गंगुबाई काठियावाडीचा ट्रेलर होणार रिलीज, गंगुबाईच्या घरच्यांचा आक्षेप; चित्रपट रिलीजची तारिख ठरली

आलिया भट्टच्या या चित्रपटाची चर्चा अनेक दिवसांपासून सुरू आहे. या चित्रपटात आलिया मुंबईची माफिया क्वीन गंगूबाईची भूमिका साकारत आहे. तर या चित्रपटात अजय देवगणही महत्त्वाच्या भूमिकेत आहे. गेल्या वर्षी या चित्रपटाचा फक्त टीझर रिलीज झाला होता ज्यामध्ये आलियाचा बोल्ड लुक सगळ्यांना पाहायला मिळाला होता.

अलिया भट्टच्या गंगुबाई काठियावाडीचा ट्रेलर होणार रिलीज, गंगुबाईच्या घरच्यांचा आक्षेप; चित्रपट रिलीजची तारिख ठरली
गंगुबाई काठियावाडी चित्रपटाचं पोस्टर
Follow us
| Updated on: Feb 02, 2022 | 2:19 PM

मुंबई – कोरोनाच्या काळात रखडलेले अनेक चित्रपट तयार झाले असून ते रिलीज होण्याच्या तयारीत आहेत. काही चित्रपटांनी आपल्या चित्रपट प्रदर्शित करण्याच्या तारखा जाहीर केल्या असून या महिन्यात अधिक चित्रपट प्रदर्शित होणार असल्याच पाहावयास मिळतंय. अलिया भट्टचा (Alia Bhatt) ‘गंगुबाई काठियावाडी’ (Gangubai Kathiawadi) या चित्रपटाचे ट्रेलर दोन दिवसांनी रिलीज होणार असल्याने चाहत्यांमध्ये सोशल मीडियावर मोठी चर्चा पाहायला मिळत आहे. मुळात चित्रपट कसा असेल, त्याची कथा कशी असेल, असा सगळा गप्पाचा फड रंगत आहे. 4 तारखेला ‘गंगुबाई काठियावाडी’ या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज होईल, अशी इंन्स्टाग्राम अलिया भट्ट यांनी पोस्ट केली आहे. या चित्रपटाचे डायरेक्टर संजय लीला भन्साली (Sanjay Leela Bhansali) असून हा चित्रपट 25 फेब्रुवारीला चित्रपटातगृहात पाहायला मिळेल.

आलियाचा बोल्ड लुक

आलिया भट्टच्या या चित्रपटाची चर्चा अनेक दिवसांपासून सुरू आहे. या चित्रपटात आलिया मुंबईची माफिया क्वीन गंगूबाईची भूमिका साकारत आहे. तर या चित्रपटात अजय देवगणही महत्त्वाच्या भूमिकेत आहे. गेल्या वर्षी या चित्रपटाचा फक्त टीझर रिलीज झाला होता ज्यामध्ये आलियाचा बोल्ड लुक सगळ्यांना पाहायला मिळाला होता. या चित्रपटात आलिया दमदार संवाद बोलताना दिसेल. तर संजय लीला भन्साळी या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत. हा चित्रपट सत्य घटनेवर आधारीत असल्याने गंगुबाईच्या घरच्यांनी त्यावर आक्षेप घेतला होता.

यासोबतच तो या चित्रपटाची निर्मितीही करत आहे. या चित्रपटावरून वादही निर्माण झाला होता. गंगूबाईंच्या कुटुंबातील काही लोकांनी या चित्रपटावर आक्षेप घेतला होता. असं असलं तरी संजयच्या चित्रपटांवरून वादाचा मोठा इतिहास आहे. त्यांचा प्रत्येक चित्रपट नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने वादात सापडतो.

हा चित्रपट 18 फेब्रुवारीला रिलीज होणार होता

संजय लीला भन्साळी दिग्दर्शित गंगूबाई काठियावाडी हा चित्रपट बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहे. चित्रपट दिग्दर्शक संजय लीला भन्साळी, आलिया भट्ट आणि चित्रपटातील इतर कलाकारंना कोरोना झाला होता. त्यामुळे चित्रपटाचे शूटिंग पूर्ण होण्यास प्रचंड वेळ लागला होता. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये या चित्रपटाची रिलीज डेट 18 फेब्रुवारी 2022 निश्चित करण्यात आली होती, मात्र, कोरोनाची वाढती प्रकरणे पाहता त्याची रिलीज डेट ठेवण्यात आली होती.

माझ्यासोबत ट्रीपला चला, ब्लॅक बिकिनीमधला फोटो पोस्ट करत नोरा फतेहीची चाहत्यांना भन्नाट ऑफर!

Kangana Ranaut : ‘परी म्हणू की सुंदरा’ नवाजुद्दीन सिद्दीकीच्या पार्टीत कंगनाचा लूक पाहून हेच म्हणाल, पाहा व्हायरल फोटो!

Spotted : श्वेता तिवारीची मुलगी पलकचा वरुण धवनसोबत स्टायलिश लूक!

त्याच्या जीवाला धोका तर..,कामराच्या जबाब नोंदवण्यावरुन कोर्टाचा निर्णय
त्याच्या जीवाला धोका तर..,कामराच्या जबाब नोंदवण्यावरुन कोर्टाचा निर्णय.
'..तर शिवजयंतीला देशभर सुट्टी द्या',निर्धार मेळाव्यातून ठाकरेंची मागणी
'..तर शिवजयंतीला देशभर सुट्टी द्या',निर्धार मेळाव्यातून ठाकरेंची मागणी.
'ती बाई साधी नाही...मोदींची बहीण, नाव लक्षात ठेवा...', राऊतांचा घणाघात
'ती बाई साधी नाही...मोदींची बहीण, नाव लक्षात ठेवा...', राऊतांचा घणाघात.
'...उनपर है धिक्कार', नाशिकच्या निर्धार शिबिरातून संजय राऊत म्हणाले...
'...उनपर है धिक्कार', नाशिकच्या निर्धार शिबिरातून संजय राऊत म्हणाले....
'चावलेला कुत्रा 'वाघ्या' तर..', मिटकरींची भिडेंवर नाव न घेता खोचक टीका
'चावलेला कुत्रा 'वाघ्या' तर..', मिटकरींची भिडेंवर नाव न घेता खोचक टीका.
अजितदादांनी 2024 ची निवडणूक 'गद्दार'वर लढवली...कामराच्या वकिलांचा सवाल
अजितदादांनी 2024 ची निवडणूक 'गद्दार'वर लढवली...कामराच्या वकिलांचा सवाल.
भिडेंना चावणारं कुत्रं शोधण्यासाठी यंत्रणेची अहोरात्र मेहनत
भिडेंना चावणारं कुत्रं शोधण्यासाठी यंत्रणेची अहोरात्र मेहनत.
संभाजीनगरमध्ये मध्यरात्री 2 गटात राडा
संभाजीनगरमध्ये मध्यरात्री 2 गटात राडा.
सामंत अन् भुमरेंनी घेतली जरांगेंची भेट, कारण काय? काय झाली चर्चा?
सामंत अन् भुमरेंनी घेतली जरांगेंची भेट, कारण काय? काय झाली चर्चा?.
वर्ष अखेरपर्यंत मुंबईकरांच्या सेवेत आणखी एक मेट्रो येणार
वर्ष अखेरपर्यंत मुंबईकरांच्या सेवेत आणखी एक मेट्रो येणार.