Alia Bhatt | ‘सीता जी’ नावाने हाक मारताच आलिया भट्ट हिची थेट अशी प्रतिक्रिया, व्हिडीओ व्हायरल

बाॅलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट ही कायमच चर्चेत राहणारी अभिनेत्री आहे. काही दिवसांपूर्वीच अभिनेता रणवीर सिंह याच्यासोबत आपल्या आगामी चित्रपटाचे शूटिंग करण्यासाठी आलिया कश्मीर येथे गेली होती. विशेष म्हणजे यावेळी आलिया हिच्यासोबत तिची मुलगी देखील होती.

Alia Bhatt | 'सीता जी' नावाने हाक मारताच आलिया भट्ट हिची थेट अशी प्रतिक्रिया, व्हिडीओ व्हायरल
Follow us
| Updated on: Jun 15, 2023 | 2:23 PM

मुंबई : रामायण हा चित्रपट गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. या चित्रपटात आलिया भट्ट (Alia Bhatt) ही माता सीतेच्या भूमिकेत आणि अभिनेता रणबीर कपूर हा भगवान राम यांच्या भूमिकेत दिसणार असल्याची चर्चा आहे. विशेष म्हणजे रणबीर कपूर आणि आलिया भट्ट या दोघांनीही चित्रपट साईन केल्याचे सांगितले जात आहे. या चित्रपटात साऊथ स्टार यश हा देखील मुख्य भूमिकेत असणार असल्याची चर्चा होती. यश हा रावणाच्या भूमिकेत असल्याचे सांगितले जात होते. मात्र, काही दिवसांपूर्वीच आलेल्या रिपोर्टनुसार यश हा रावणाच्या भूमिकेत दिसणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. यश याने रावणाची नकारात्मक भूमिका करण्यास नकार दिल्याचे सांगितले जात आहे.

यश याने रावणाची भूमिका करण्यास नकार दिल्याने हा एकप्रकारे मोठा झटका चित्रपट निर्मात्यांना असल्याचे सांगितले जात आहे. रामायण चित्रपटात रणबीर कपूर आणि आलिया भट्ट हे दिसणार असल्याचे कळल्यापासून त्यांच्या चाहत्यांमध्ये प्रचंड असा उत्साह हा बघायला मिळतोय. रामायण हा बहुचर्चित चित्रपट नक्कीच ठरणार आहे.

रामायण चित्रपटात रणबीर कपूर हा दिसणार असल्याचे कळताच कंगना राणावत हिने जाहिर नाराजी व्यक्त केली. इतकेच नाही तर कंगना राणावत हिने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत रणबीर कपूर याच्यावर थेट टीका देखील केली. या पोस्टमध्ये कंगना राणावत हिने रणबीर कपूर याच्यावर काही गंभीर आरोप देखील लावले.

आता नुकताच आलिया भट्ट ही विमानतळावर स्पाॅट झाली. आलिया भट्ट हिला पाहताच पापाराझी यांनी सीता मॅडम, सीता जी म्हणून आलिया भट्ट हिला आवाज देण्यास सुरूवात केली. सीता जी हे ऐकताच आलिया भट्ट ही लाजताना दिसली. इतकेच नाही तर आलिया भट्ट हिने लगेचच आपल्या चेहऱ्यावर हात लावला. पापाराझी यांच्याकडे पाहून हसताना देखील आलिया दिसली.

पुढे आलिया भट्ट हिने पापाराझी यांना फोटोसाठी काही पोज देखील दिल्या. आता आलिया भट्ट हिचा विमानतळावरील हा व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसत आहे. आलिया भट्ट ही नेहमीच चर्चेत असणारी अभिनेत्री आहे. आलिया भट्ट हिने काही दिवसांपूर्वीच कश्मीर येथे आपल्या आगामी चित्रपटाची शूटिंग पूर्ण केली. यावेळी आलिया हिच्यासोबत मुलगी राहा ही देखील होती. रामायण या चित्रपटाची शूटिंग यंदाच डिसेंबर महिन्यात होणार असल्याचे सांगितले जात आहे.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.