अल्का याज्ञिक यांना आता कधीच ऐकू येणार नाही? काय म्हणाले डॉक्टर?

बॉलिवूडच्या प्रसिद्ध गायिका अल्का याज्ञिक यांच्या एका पोस्टने सर्वांनाच मोठा धक्का बसला. अल्का यांनी सोशल मीडियावर भलीमोठी पोस्ट लिहित त्यांना दुर्मिळ सेन्सरी न्यूरल नर्व्ह हिअरिंग लॉसची समस्या असल्याचा खुलासा केला आहे.

अल्का याज्ञिक यांना आता कधीच ऐकू येणार नाही? काय म्हणाले डॉक्टर?
गायिका अल्का याज्ञिकImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Jun 20, 2024 | 12:30 PM

सर्वसामान्यपणे कोणत्याही व्यक्तीची श्रवणक्षमता वयानुसार हळूहळू कमी होत जाते. वयाची साठी किंवा सत्तरी ओलांडली की ऐकू येणं कमी होतं. मात्र काही प्रकरणांमध्ये एखाद्या आजारपणामुळे किंवा व्हायरल अटॅकमुळेही श्रवणक्षमता कमी होऊ शकते. बॉलिवूडची प्रसिद्ध गायिका अल्का याज्ञिक यांना सध्या अशीच समस्या उद्भवली आहे. काही आठवड्यांपूर्वी विमानातून उतरल्यानंतर त्यांना अचानक ऐकू येणं बंद झालं. यानंतर त्यांना दुर्मिळ सेन्सरी न्यूरल नर्व्ह हिअरिंग लॉसचं (rare sensorineural nerve hearing loss) निदान झालं. व्हायरल अटॅकमुळे त्यांना ऐकू येत नसल्याचं डॉक्टर म्हणाले. पण यामुळे त्यांना पुन्हा पहिल्यासारखं ऐकू येईल का, असा प्रश्न अनेकांना पडला आहे. याविषयी तज्ज्ञ काय म्हणतायत, ते जाणून घेऊयात..

भारतातील कॉक्लियर इम्प्लांटचे जनक पद्मश्री डॉ. जेएम हंस हे याविषयी ‘टीव्ही 9 भारतवर्ष’शी बोलताना म्हणाले की अल्का याज्ञिक यांना आतासुद्धा ऐकू येऊ शकतं. त्यांनी सांगितलं की याबाबतीत अजूनही आशेचा किरण पहायला मिळू शकतो. “सर्वसामान्यपणे लोकांना असं वाटतं की एकदा ऐकू यायचं बंद झालं की पुन्हा श्रवणक्षमता पूर्ववत होत नाही. पण असं काहीच नसतं”, असं त्यांनी स्पष्ट केलं.

हे सुद्धा वाचा

उपचार शक्य आहे का?

आर्टिमिस रुग्णालयातील न्यूरो डिपार्टमेंटचे प्रमुख डॉ. सुमित सिंहने ‘टीव्ही 9 भारतवर्ष’शी बोलताना म्हणाले, “ही एक अशी समस्या आहे, ज्यामध्ये कोणत्याही व्यक्तीच्या श्रवणक्षमतेवर परिणाम होऊ शकतो. आपल्या कानाच्या आतील भागात जे पॅथॉलॉजी आणि कॉक्लियर नर्व्ह असतात, ते आपल्या मेंदूपर्यंत ऑडिओ सिग्नल पोहोचवण्याचं काम करतात. हे नर्व्ह डॅमेज झाल्यास ऐकू येणं बंद होतं. यावरील सर्वांत सहज आणि उत्तम उपाय म्हणजे सर्जरी. कॉक्लियर इम्प्लांटची ही सर्जरी केली जाते. यानंतर अवघ्या आठ ते दहा दिवसांत रुग्ण बरा होतो.”

लक्षणे कोणती?

सेन्सरी न्यूरल नर्व्ह हिअरिंग लॉसची लक्षणं ही त्याच्या तीव्रता आणि स्थितीवर अवलंबून असतात. काही सर्वसामान्य लक्षणं पुढील असू शकतात.. – इतरांचं बोलणं समजण्यात अडचण – भुनभुनणारा किंवा घुमणारा आवाज – कानात सतत काहीतरी वाजल्यासारखं ऐकू येणं, गुंजणं किंवा हिसक्याचा आवाज – मोठा आवाज ऐकण्यात अडचण – संतुलनात समस्या

एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.
खातेवाटपानंतर पालकमंत्रिपदासाठी रस्सीखेच, कोणत्या जिल्ह्यात स्पर्धा?
खातेवाटपानंतर पालकमंत्रिपदासाठी रस्सीखेच, कोणत्या जिल्ह्यात स्पर्धा?.
महायुतीचं खातेवाटप जाहीर, फडणवीस-दादा अन् शिंदेंच्या वाटेला कोणत खातं?
महायुतीचं खातेवाटप जाहीर, फडणवीस-दादा अन् शिंदेंच्या वाटेला कोणत खातं?.
250 कोटींचा पीकविमा घोटाळ्याचा पॅटर्न, धस अण्णा यांचे मुंडेंवर निशाणा
250 कोटींचा पीकविमा घोटाळ्याचा पॅटर्न, धस अण्णा यांचे मुंडेंवर निशाणा.
'माझ्या मुलाचा मर्डर..', सोमनाथ सूर्यवंशीच्या आईच्या पवारांसमोरच संताप
'माझ्या मुलाचा मर्डर..', सोमनाथ सूर्यवंशीच्या आईच्या पवारांसमोरच संताप.
Mumbai Boat Accident कसा झाला, त्याला जबाबदार कोण?
Mumbai Boat Accident कसा झाला, त्याला जबाबदार कोण?.
'दादा, त्याला मंत्रिमंडळातून काढा..',अजित पवारांसमोर गावकऱ्यांचा संताप
'दादा, त्याला मंत्रिमंडळातून काढा..',अजित पवारांसमोर गावकऱ्यांचा संताप.
हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार
हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार.
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार.