अलका याज्ञिक पतीपासून का राहतात विभक्त? फार कमी लोकांना माहितेय कारण…
Alka yagnik marriage life | लग्नानंतर तब्बल 27 वर्षे अलका याज्ञिक यांना पतीपासून का दूर रहावं लागलं? दोघांमध्ये वाद नाही 'हे' होतं कारण... मुलीचा देखील त्यांनी एकट्यांनी केलाय सांभाळ... सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त अलका यांच्या खासगी आयुष्याची चर्चा...

‘रब करे’, ‘ओढणी’, ‘उडजा काले कावान’, ‘साजन साजन तेरी दुल्हन’, ‘कितना प्यारा तुझे…’ यांसारखी असंख्य गाणी गायिका अलका याज्ञिक (Alka yagnik ) यांनी गायली आहेत. आज देखील त्यांची गाणी कोणत्याही महत्त्वाची क्षणी वाजतात. अलका याज्ञिक कायम त्यांच्या गोड आवाजामुळे आणि एकापेक्षा एक गाण्यांमुळे चर्चेत राहिल्या… आज अलका याज्ञिक यांना कोणत्याही ओळखीची गरज नाही. पण स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठी अलका याज्ञिक यांना खासगी आयुष्यात अनेक गोष्टींचा त्याग करावा लागला.
अलका याज्ञिक यांचं लग्न 1989 मध्ये उद्योगपती नीरज कपूर यांच्याशी झालं. लग्नानंतर देखील दोघांना एक -दोन नाही तर तब्बल 27 वर्षे एकमेकांपासून दूर रहावं लागलं. ज्यामागे कारण देखील फार मोठं आहे. अलका आणि नीरज यांना पती – पत्नीच्या नात्यात होणाऱ्या वादांमुळे नाहीतर, करियरमुळे अनेक वर्ष एकमेकांपासून दूर व्हावं लागलं.
अलका याज्ञिक यांचे पती नीरज कपूर हे शिलाँगला बिजनसमॅन होते. त्यांचा सगळा व्यवसाय तिथेच होता. तर अलका यांचं संपूर्ण करियर फक्त मुंबईत होतं. त्यांमुळे त्यांना मुंबईत रहावं लागायचं. अशात अलका यांच्या पतीने मुंबईत देखील व्यवसाय करण्याचा प्रयत्न केला. पण त्यांना यश मिळालं नाही.




मुंबईत यश मिळत नसल्यामुळे शेवटी अलका यांच्याच सांगण्यावरून ते परत शिलाँगला गेले आणि तिथंच व्यवसाय केला. अधूनमधून ते मुंबईत यायचे. अशाप्रकारे लग्नानंतर देखील अलका याज्ञिक आणि पती नीरज कपूर एकमेकांपासून दूर होते. रिपोर्टनुसार, 27 वर्षे एकमेकांसोबत लग्न होऊनही लाँग डिस्टन्स रिलेशिनशिपमध्ये रहावं लागलं. अलका याज्ञिक आणि नीरज कपूर यांना एक मुलगी देखील आहे. पती कामासाठी परदेशात असल्यामुळे अलका यांनी एकहाती मुलीचा सांभाळ केला.
अलका याज्ञिक यांचा संगीत विश्वातील प्रवास
लहानपणापासूनच अलका याज्ञिक यांनी संगीताचे धडे गिरवायला सुरुवात केली. वयाच्या सहाव्या वर्षापासून त्या भजन किर्तन गायच्या. वयाच्या 14 व्या वर्षी त्यांनी म्युझिक इंडस्ट्रीत पाऊल ठेवलं. त्यांनी आतापर्यंत जवळपास दोन हजार गाणी त्यांच्या नावावर आहेत. त्यांनी फक्त हिंदीच नाही तर 16 वेगवेगळ्या भाषांमध्ये गाणी गायली आहेत. आज अलका याज्ञिक बॉलिवूडच्या प्रसिद्ध आणि लोकप्रिय गायिका आहेत.