OTT वरील अश्लील कंटेटवर सलमानने उपस्थित केले प्रश्न; म्हणाला “तुमच्या मुलीने पाहिलं तर कसं वाटेल?”

"मला खरंच वाटतं की ओटीटीवर सेन्सॉरशिप असायला हवं. अश्लीलता, न्युडिटी, शिवीगाळ हे सर्व बंद झालं पाहिजे. आता सर्वकाही फोनवर उपलब्ध झालंय", असं तो म्हणाला. चित्रपटांपासून टीव्हीपर्यंत जर सेन्सॉरशिप असेल तर ओटीटीसाठी का नाही, असाही सवाल त्याने उपस्थित केला.

OTT वरील अश्लील कंटेटवर सलमानने उपस्थित केले प्रश्न; म्हणाला तुमच्या मुलीने पाहिलं तर कसं वाटेल?
Salman Khan
Follow us
| Updated on: Apr 07, 2023 | 8:08 AM

मुंबई : अभिनेता सलमान खान नेहमीच असे चित्रपट करण्यावर भर देतो, ज्यांना प्रेक्षक कुटुंबीय आणि मुलांसोबत सहज पाहू शकतील. सलमान त्याच्या चित्रपटांमध्ये आवर्जून किसिंग सीन आणि इंटिमेट सीन टाळतो. इतकंच नव्हे तर त्याने त्याच्या करारात ‘नो किसिंग’ पॉलिसीसुद्धा समाविष्ट केली आहे. आता त्याने ओटीटी आणि डिजिटल प्लॅटफॉर्मवरील बोल्ड आणि इंटिमेट सीन्स दाखवण्यावर आक्षेप घेतला आहे. अनेक वेब सीरिज किंवा ओटीटीवरील चित्रपटांमध्ये असे सीन्स किंवा डायलॉग्स असतात, ज्यांना कुटुंबीयांसोबत बसून पाहू शकत नाही. याचविरोधात सलमानने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत वक्तव्य केलं आहे. ओटीटीवर सेन्सॉरशिप असली पाहिजे आणि अशा सीन्सवर लगाम बसला पाहिजे, असं मत त्याने नोंदवलं आहे.

फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्याविषयी आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत सलमान खान ओटीटी प्लॅटफॉर्मबद्दल मोकळेपणे व्यक्त झाला. “मला खरंच वाटतं की ओटीटीवर सेन्सॉरशिप असायला हवं. अश्लीलता, न्युडिटी, शिवीगाळ हे सर्व बंद झालं पाहिजे. आता सर्वकाही फोनवर उपलब्ध झालंय. 15 किंवा 16 वर्षीय मुलाने पाहिलं तर आपण समजू शकतो. पण तुमच्या छोट्या अभ्यास करणाऱ्या मुलीने हे सर्व पाहिलं तर कसं वाटेल? त्यामुळे ओटीटीवर जो कंटेट स्ट्रीम होतो, त्याला एकदं तपासलं पाहिजे, असं माझं मत आहे. हा कंटेट जितका साफ असेल, तितकं चांगलं”, असं तो म्हणाला.

चित्रपटांपासून टीव्हीपर्यंत जर सेन्सॉरशिप असेल तर ओटीटीसाठी का नाही, असाही सवाल त्याने उपस्थित केला. ओटीटीवर काम करणाऱ्या कलाकारांना तो पुढे म्हणाला, “तुम्ही सर्वकाही करून बसलात. लव्हमेकिंग सीन्ससुद्धा केले. किसिंग सीन्स करत बरंच काही एक्सपोज केलं. जेव्हा तुम्ही तुमच्या इमारतीत जाता, तेव्हा तुमचा वॉचमॅन तुमचं काम पाहत असतो. हे सर्व मला ठीक वाटत नाही. सुरक्षेच्या दृष्टीकोनातूनही हे ठीक नाही. आपल्याला हे सर्व करायची गरज नाही. आपण हिंदुस्तानमध्ये राहतो. थोडंफार ठीक आहे पण इतका भडीमार असू नये.”

हे सुद्धा वाचा

सलमान लवकरच ‘किसी का भाई किसी की जान’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. येत्या 21 एप्रिल रोजी हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. याशिवाय त्याचा ‘टायगर 3’ हा चित्रपटसुद्धा प्रदर्शनाच्या प्रतीक्षेत आहे.

Non Stop LIVE Update
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या...
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या....
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?.
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला.
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका.
'राणे पिता-पुत्र हे गाडग्यासारखे..', ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची टीका
'राणे पिता-पुत्र हे गाडग्यासारखे..', ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची टीका.
भाजपच्या किती जागा येणार?,कोण होणार CM?; विनोद तावडेंनी थेट सांगितलं..
भाजपच्या किती जागा येणार?,कोण होणार CM?; विनोद तावडेंनी थेट सांगितलं...
डोंबिवलीत भाजपचं कार्यालय फोडल, कोणी केल्ला हल्ला? घटना CCTV मध्ये कैद
डोंबिवलीत भाजपचं कार्यालय फोडल, कोणी केल्ला हल्ला? घटना CCTV मध्ये कैद.
एकनाथ शिंदेंच्या आमदारानं पैसे वाटले? विधानसभेच्या तोंडावर अडचणी वाढल्
एकनाथ शिंदेंच्या आमदारानं पैसे वाटले? विधानसभेच्या तोंडावर अडचणी वाढल्.
पंकजा मुंडेंकडून भाऊ धनंजय मुंडेंना खास गिफ्ट, सभेतून काय केली घोषणा?
पंकजा मुंडेंकडून भाऊ धनंजय मुंडेंना खास गिफ्ट, सभेतून काय केली घोषणा?.
पवार कुटुंबातील कटुता भविष्यात दूर होणार? अजित पवारांचं मोठं वक्तव्य
पवार कुटुंबातील कटुता भविष्यात दूर होणार? अजित पवारांचं मोठं वक्तव्य.