Allu Arjun: अल्लू अर्जुनचा लेकीसोबत ‘सुपर डान्स’; गणपती विसर्जनादरम्यानचा व्हिडीओ व्हायरल

अल्लू अर्जुनने त्याच्या स्टाफसोबत गणपतीचं विसर्जन केलं. यावेळी त्याने मुलीला खांद्यावर उचलून घेतलं होतं. गणपतीसमोर त्याने नारळ फोडलं आणि त्यानंतर जयघोष केला. आऱ्हानेही 'गणपती बाप्पा मोरया' असा जयजयकार केला. यावेळी दोघं आनंदाने नाचताना दिसले.

Allu Arjun: अल्लू अर्जुनचा लेकीसोबत 'सुपर डान्स'; गणपती विसर्जनादरम्यानचा व्हिडीओ व्हायरल
Allu ArjunImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Sep 06, 2022 | 2:07 PM

सध्या देशभरात गणेशोत्सवचा उत्साह पहायला मिळतोय. सर्वसामान्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत अनेकजण या उत्साहाचा पुरेपूर आनंद लुटत आहेत. बॉलिवूड सेलिब्रिटींच्या पाठोपाठ आता गणपती विसर्जनादरम्यानचे साऊथच्या सेलिब्रिटींचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. ‘पुष्पा’ (Pushpa) फेम अभिनेता अल्लू अर्जुनचा (Allu Arjun) त्याच्या मुलीसोबतचा एक व्हिडीओ समोर आला आहे. अल्लू अर्जुनच्या गणपतीचं विसर्जन (Ganapati visarjan) नुकतंच पार पडलं. मुलगी आऱ्हासोबत त्याने गणपतीचं धूमधडाक्यात विसर्जन केलं. यावेळी बापलेकींचा डान्ससुद्धा पहायला मिळाला.

अल्लू अर्जुनने त्याच्या स्टाफसोबत गणपतीचं विसर्जन केलं. यावेळी त्याने मुलीला खांद्यावर उचलून घेतलं होतं. गणपतीसमोर त्याने नारळ फोडलं आणि त्यानंतर जयघोष केला. आऱ्हानेही ‘गणपती बाप्पा मोरया’ असा जयजयकार केला. यावेळी दोघं आनंदाने नाचताना दिसले.

हे सुद्धा वाचा

अल्लू अर्जुन आणि स्नेहाने 2011 मध्ये लग्न केलं. या दोघांना अयान आणि आऱ्हा ही दोन मुलं आहेत. स्नेहानेही इन्स्टाग्रामवर गणपतीचे फोटो पोस्ट केले होते. अल्लू अर्जुनने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर विसर्जनाचा व्हिडीओ पोस्ट केला. या व्हिडीओवर नेटकऱ्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे.

‘सुपर’ असं एका चाहत्याने लिहिलं. तर अनेकांनी कमेंट सेक्शनमध्ये हृदयाचे इमोजी पोस्ट केले आहेत. अल्लू अर्जुनने काही दिवसांपूर्वीच ‘पुष्पा 2’च्या शूटिंगला सुरुवात केली. त्याच्या ‘पुष्पा: द राईज’ या चित्रपटाने जगभरात तब्बल 300 कोटींचा गल्ला जमवला होता. या चित्रपटाची क्रेझ देशभरात पहायला मिळाली. यातील समंथा रुथ प्रभूचा ‘ऊ अंटावा’ हे गाणंसुद्धा तुफान गाजलं.

‘पुष्पा: द राईज’नंतर आता ‘पुष्पा: द रूल’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यामध्येही अल्लू अर्जुनसोबत रश्मिका मंदाना मुख्य भूमिकेत झळकणार आहे. या सीक्वेलचंही लेखन आणि दिग्दर्शन सुकुमार यांनी केलंय.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.