Pushpa 2 OTT Release: प्रतीक्षा संपली, ओटीटीवर प्रदर्शित होणार ‘पुष्पा 2’, कधी आणि कुठे येईल पाहता?
Pushpa 2 OTT Release: अखेर प्रतीक्षा संपली... घरबसल्या पाहता येणार अल्लू अर्जुन स्टारर 'पुष्पा 2' सिनेमा... ओटीटीवर होणार प्रदर्शित, पण कधी आणि कुठे येईल पाहता? जाणून घ्या...
Pushpa 2 OTT Release: ‘पुष्पा 2: द रूल’ सिनेमापुढे सध्या अनेक सिनेमे फेल ठरताना दिसत आहे. आभिनेता अल्लू अर्जुन आणि अभिनेत्री रश्मिका मंदाना यांच्या ‘पुष्पा 2’ सिनेमाला चाहत्यांनी डोक्यावर घेतलं आहे. बॉक्स ऑफिसवर सिनेमा तगडी कमाई देखील करताना दिसत आहे. ‘पुष्पा 2’ सिनेमाने जगभरात आतापर्यंत 1100 कोटी रुपयांची कमाई केली आहे. सिनेमा प्रदर्शित होऊन 10 दिवस झाले आहेत, असं असताना देखील चित्रपटगृहात चाहत्यांची गर्दी जमताना दिसत आहे.
चित्रपटगृहानंतर सिनेमा आता ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. याबद्दल मोठी अपडेट देखील समोर आली आहे. ‘पुष्पा 2’ सिनेमा पुढच्या वर्षी म्हणजे 9 जानेवारी 2025 मध्ये प्रदर्शित होणार असल्याची माहिती समोर येत आहे. नेटफ्लिक्सवर अनेक भाषांमध्ये सिनेमा प्रदर्शित होणार असल्याची माहिती मिळत आहे. पण यावर निर्मात्यांनी कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही.
View this post on Instagram
सांगायचं झालं तर, सिनेमा मोठ्या पडद्यावर प्रदर्शित झाल्यानंतर जवळपास 40 ते 50 दिवसांमध्ये ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होतो. त्यामुळे सिनेमा कधी ओटीटीवर प्रदर्शित होणार… या प्रतीक्षेत चाहते आहेत. ज्यामुळे चाहत्यांना घर बसल्या सिनेमाचा आनंद घेता येईल…
‘पुष्पा 2: द रूल’ सिनेमाबद्दल सांगायचं झालं तर, दिग्दर्शक सुकुमार दिग्दर्शित ‘पुष्पा 2’ सिनेमा अल्लू अर्जुन मुख्य भूमिकेत आहे. सिनेमातील अभिनेत्याच्या भूमिकेचं आणि सिनेमाच्या कथेचं सर्वच स्तरातून कौतुक होत आहे. ‘पुष्पा 2’ सिनेमात अल्लू अर्जुन याच्यासोबत रश्मिका मंदाना, फहद फासिल, सुनील, राव रमेश आणि जगपती बाबू यांनी मुख्य भूमिका साकारली आहे.
View this post on Instagram
सांगायचं झालं तर, 550 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये सिनेमाची निर्मिती करण्यात आली आहे. तर सिनेमाने तर 3 – 4 दिवसांमध्ये खर्च भरुन काढला आहे. तर 10 दिवसांमध्ये सिनेमाने जगभरात 1100 कोटी रुपयांचा गल्ला जमा केला आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त ‘पुष्पा 2’ सिनेमाची चर्चा रंगली आहे. ‘पुष्पा’ सिनेमाच्या पहिल्या भागाला देखील चाहत्यांनी भरभरुन प्रेम दिलं.