Allu Arjun | जे कुणी करु शकलं नाही, ते ‘पुष्पा’ ने करुन दाखवलं, राष्ट्रीय पुरस्कार जिंकल्यानंतर अल्लू अर्जुन याच्या घरी जल्लोष

69th National Film Awards | अल्लू अर्जुन याला 'पुष्पा द राइज' सिनेमासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेता हा पुरस्कार जाहीर झाला आहे. अल्लु अर्जुन हा बहुमान मिळवणारा पहिलाच तेलगू अभिनेता ठरला आहे.

Allu Arjun | जे कुणी करु शकलं नाही, ते 'पुष्पा' ने करुन दाखवलं, राष्ट्रीय पुरस्कार जिंकल्यानंतर अल्लू अर्जुन याच्या घरी जल्लोष
Follow us
| Updated on: Aug 25, 2023 | 2:05 AM

मुंबई | एकोणसत्तरावे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार जाहीर करण्यात आले. साऊथ सुपरस्टार अल्लू अर्जुन याला पुष्पा (द राइज पार्ट 1) साठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार जाहीर करण्यात आला. ‘पुष्पा’ सिनेमाने चाहत्यांच्या मनावर आपली छाप सोडली. पुष्पा या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर घवघवीत यश मिळवलं. पुष्पा सिनेमाने कोटींचा गल्ला जमवला. अनेक रेकॉर्ड केले. मात्र या सिनेमाने असा कारनामा केला जे सिनेसृष्टीत गेल्या 7 दशकात कधीच होऊ शकलं नाही. अनेक तेलगू सिनेमांना राष्ट्रीय पुरस्कार जाहीर करण्यात आला. मात्र आतापर्यंत एकाही तेलगू अभिनेत्याला हा पुरस्कार मिळवता आला नव्हता. आता पुष्पा सिनेमासाठी अल्लू अर्जुन याला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. त्यामुळे अल्लू अर्जुन याच्या घरी एकच जल्लोष साजरा केला जात आहे.

सोशल मीडियावर असंख्य व्हीडिओ व्हायरल होत आहेत. या व्हायरल व्हीडिओत अल्लू अर्जुन याला राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाल्यानंतर अनेक जण शुभेच्छा देण्यासाठी त्याच्या घरी पोहचत आहेत. या व्हीडिओत अनेक जण अल्लूला मिठी मारताना दिसत आहेत, तसेच पुरस्कार जाहीर झाल्याने अभिनंदन करत आहेत. अल्लू अर्जुन याच्या घराबाहेर अनेक चाहत्यांनी एकच गर्दी केली.

Allu Arjun House

हे सुद्धा वाचा

बाप बेट्याची एकमेकांना गळाभेट

आपल्या लेकाला राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाल्याचं समजल्यानंतर अल्लू अरविंद यांचा उर अभिमानाने भरुन आला. अल्लू अरविंद यांनी लेक अल्लू अर्जुन याला कडकडून मिठी मारली. दोघांच्या आनंदाला पारवार उरला नाही. तसेच दिगदर्शक सुकुमार हे देखील उपस्थित होते. सुकुमार यांनी अल्लू अर्जुन याला मिठी मारली. तसेच अनेक जण अल्लू अर्जुन याला भेटायला येत आहेत. तसेच अल्लू अर्जुन याच्या चेहऱ्यावरही राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाल्यानंतरचा आनंद स्पष्टपणे दिसून येत आहे.

बॉक्स ऑफिसवर रग्गड कमाई

दरम्यान पुष्पा या सुपरहिट ठरलेल्या सिनेमाने बॉक्स ऑफीसवर जोरदार कमाई केली. पुष्पाने जगभरात जवळपास 400 कोटींपेक्षा अधिकची कमाई केली. पुष्पा सिनेमाला मिळालेल्या घवघवीत यशानंतर दुसऱ्या पार्टसाठी मेहनत घेतली जात आहे. मीडिया रिपोर्टनुसार, अल्लू अर्जुन याने पुष्पा या सिनेमासाठी 45 कोटी रुपये घेतले होते. तर आता दुसऱ्या पार्टसाठी 85 कोटी रुपये ठरले असल्याचं म्हटलं जात आहे.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.