Allu Arjun जगतो रॉयल लाईफ, १०० कोटींचा बंगला, प्रायव्हेट जेट, गडगंज संपत्ती आणि इतकी महागडी व्हॅनिटी व्हॅन

१०० कोटी रुपयांच्या बंगल्यात राहणाऱ्या अल्लू अर्जुन याच्या व्हॅनिटी व्हॅन प्रचंड महागडी; 'पुष्पा' फेम अभिनेत्याच्या संपत्तीचा आकडा थक्क करणारा

Allu Arjun जगतो रॉयल लाईफ, १०० कोटींचा बंगला, प्रायव्हेट जेट, गडगंज संपत्ती आणि इतकी महागडी व्हॅनिटी व्हॅन
Follow us
| Updated on: Apr 08, 2023 | 3:09 PM

मुंबई : ‘पुष्पा राज… मैं झुकेगा नहीं साला’ या डायलॉगने अभिनेता अल्लू अर्जुन (Allu Arjun) याने लहान मुलांसह अनेकांना वेड लावलं. आजही सिनेमातील अनेक डायलॉग चाहत्यांमध्ये प्रसिद्ध आहेत. अभिनेत्याच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे, पण ‘पुष्पा’ सिनेमाच्या यशानंतर अभिनेत्याच्या लोकप्रियेत प्रचंड वाढ झाली आहे. अभिनेत्याने अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत चाहत्यांच्या मनात राज्य केलं. अल्लू अर्जुन दाक्षिणात्य सिनेविश्वातील प्रसिद्ध अभिनेत्यांपैकी एक आहे, शिवाय तो हाय पेड अभिनेता देखील आहे. आज अभिनेत्याचा ४१ वा वाढदिवस आहे. चाहते सोशल मीडियाच्या माध्यमातून अभिनेत्याला शुभेच्छा देत आहेत.

अल्लू अर्जन याच्या वाढदिवसाच्या मुहूर्तावर त्याच्याबद्दल अनेक महत्त्वाच्या गोष्टी जाणू घेवू. साऊथ विश्वातील प्रसिद्ध अभिनेता अल्लू अर्जुन अत्यंत रॉयल आयुष्य जगतो. अभिनेत्याच्या महागड्या घरात अनेक महागड्या वस्तू आहे. अभिनेता आज यशाच्या उच्च शिखरावर आहे. अभिनेता कायम त्याच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यामुळे चर्चेत असतो.

अल्लू अर्जुन याचं हैदराबाद याठिकाणी असलेलं आलिशान घर एखाद्या महलापेक्षा कमी नाही. रिपोर्टनुसार, अभिनेत्याचं हे स्वप्नातील घर १०० कोटी रुपयांपेक्षा अधिक महाग आहे. अभिनेत्याने भव्य बंगल्याची सजावट अनेक महागड्या देखाव्याच्या वस्तूंनी केली आहे.

हे सुद्धा वाचा

अल्लू अर्जुन कुटुंबासोबत एका भव्य घरात राहतो. त्याच्या घरात स्विमिंग पूल, जिम, होम थियेटर, सुंदर गार्डन पासून मुलांना खेळण्यासाठी देखील एक वेगळी जागा आहे. अल्लू अर्जुन आई-वडील, पत्नी स्नेहा, मुलगी आरहा आणि मुलगा अयान यांच्यासोबत भव्य घरात राहतो.

काही दिवसांपूर्वी अल्लू अर्जुन याने त्याच्या व्हॅनिटी वॅनचे फोटो देखील सोशल मीडियावर शेअर केले होते. अभिनेत्याची सोय लक्षात घेऊन ही व्हॅनिटी व्हॅन तयार करण्यात आली आहे. रिपोर्ट्सनुसार, त्याच्या व्हॅनिटी व्हॅनची किंमत सुमारे 7 कोटी रुपये आहे.

अभिनेत्याकडे एक प्रायव्हेट जेट देखील आहे. शिवाय अल्लू अर्जून याच्याकडे महागड्या गाड्यांचं देखील कलेक्शन आहे. त्याच्याकडे रेंज रोव्हर व्होग ब्लॅक आहे. अभिनेत्यामे त्याच्या कारचं नाव बीस्ट ठेवले आहे. ‘ज्यावेळी मी एवढ्या महागड्या वस्तू पाहतो तेव्हा द बीस्ट माझ्या विचारात येते… धन्यवाद.’ असं अभिनेता गाडीचे फोटो पोस्ट करत म्हणाला होता.

एवढंच नाही तर, अल्लू अर्जुन याच्याकडे Hummer H2 देखील आहे. ज्याची किंमत सुमारे 75 लाख रुपये आहे. अभिनेत्याकडे आणखी अनेक महागडी वहाने आहेत, ज्यामुळे अभिनेत्याच्या गॅरेजची शोभा वाढते…

... अन् एकटी महिला भिडली, छेड काढणाऱ्याला चांगलंच चोपल, बघा व्हिडीओ
... अन् एकटी महिला भिडली, छेड काढणाऱ्याला चांगलंच चोपल, बघा व्हिडीओ.
मुंबईतील काँग्रेस कार्यालयात घुसून आंदोलन करणं 'भाजप युवा'च्या अंगाशी
मुंबईतील काँग्रेस कार्यालयात घुसून आंदोलन करणं 'भाजप युवा'च्या अंगाशी.
'ए अंबादास खाली बस...', शिंदेंनी विरोधकांना फटकारलं, सभागृहात काय झाल?
'ए अंबादास खाली बस...', शिंदेंनी विरोधकांना फटकारलं, सभागृहात काय झाल?.
'.. आता भाजपची वाट', सुषमा अंधारे यांचा नेमका कोणाला खोचक टोला?
'.. आता भाजपची वाट', सुषमा अंधारे यांचा नेमका कोणाला खोचक टोला?.
बीड सरपंच संतोष देशमुखांची हत्या, शवविच्छेदन अहवालातून काय आलं समोर?
बीड सरपंच संतोष देशमुखांची हत्या, शवविच्छेदन अहवालातून काय आलं समोर?.
अचानक संध्याकाळी 17 लाख मतं वाढली? EVMच्या आरोपांवर फडणवीसांचं उत्तर
अचानक संध्याकाळी 17 लाख मतं वाढली? EVMच्या आरोपांवर फडणवीसांचं उत्तर.
'लाडक्या बहिणीं'नो तुमच्यासाठी मोठी बातमी, डिसेंबरचा हफ्ता कधी मिळणार?
'लाडक्या बहिणीं'नो तुमच्यासाठी मोठी बातमी, डिसेंबरचा हफ्ता कधी मिळणार?.
अध्यक्ष महोदय बोट दुर्घटना तुमच्याच मतदारसंघातील, दादा असं का म्हणाले?
अध्यक्ष महोदय बोट दुर्घटना तुमच्याच मतदारसंघातील, दादा असं का म्हणाले?.
'बहुमत मिळाल्यानं गांगरून गेलेत', मनसे नेत्याची महायुतीवर सडकून टीका
'बहुमत मिळाल्यानं गांगरून गेलेत', मनसे नेत्याची महायुतीवर सडकून टीका.
...म्हणून भूजबळांना महायुतीच्या मंत्रिमंडळातून डावललं, कारणं आली समोर
...म्हणून भूजबळांना महायुतीच्या मंत्रिमंडळातून डावललं, कारणं आली समोर.